अबब.! किती मोठा हा जुगार.! 44 लाखांचा मुद्देमाल व 41 जणांना अटक.!

 

 सार्वभौम (अहमदनगर) :-

                        राहाता तालुक्यातील कोल्हार बु. येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. लोणी ते कोल्हार रोडलगत असणार्‍या एका बिल्डींगच्या टेरेसवर चालु असलेल्या जुगार आड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यात 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर एक ना दोन तब्बल 41 जणांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भलेभले प्रतिष्ठीत व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी देखील असल्याचे बोलले जात आहे. ही एक सर्वात मोठी जुगारावर केलेली कारवाई असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, इतके मोठाला जुगार आड्डे राहता तालुक्यात चालतात हे कोणाच्या आशिर्वादाने हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक पोलिसांना डोळा चुकवून झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना एक गोपनिय माहिती मिळाली होती. की, कोल्हार परिसरात मुददसर शकील शेख (रा. कोल्हार बु) हा कय्युम करीम शेख यांच्या इमारतीच्या टेरेसवर 25 ते 30 लोकांना घेऊन तिरट नावाचा जुगार खेळवत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांनी एक टिम तयार करुन संबंधित इमारतीला घेरले. तर काही कर्मचार्‍यांनी थेट टेरेस गाठले. त्यावेळी तेथे एक-दोन नव्हे चार डाव सुरू होते. त्यामुळे, हा एक टाईम्पास गेम नव्हे तर एक प्रकारचा क्लब सुरू असल्याचे त्यांचे लक्षात आले. तेव्हा या पथकाने तेथे असणार्‍या सर्वांना ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख तर अन्य मुद्देमाल धरुन 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईत चितेन विजय वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता), मुददत शकील शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), सागर सवंत बेदाडे, अश्पाक जमीर शेख (रा. मनमाड, जि. नाशिक), दिलावर मन्सुर शेख, (रा. कोल्हार बु. ता. राहाता), आरबाज राजू पठाण (रा. राहाता), माहिद कय्युम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), बुबेरखान निसारखान पठाण (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर), असिफ तस्लिम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), अर्शद रशीद मोमीन (रा. येवला, जि. नाशिक), वसंत लक्ष्मण वडे (रा. येवला. जि. नाशिक), अमित हरिभाऊ गाडेकर (रा. राहाता), कय्युम गुलाब पठाण (रा. विसापूर. ता श्रीगोंदा), नवाब हुसेन शेख (रा. लोणी, ता. राहाता), जाहिद दिलावर सय्यद (अंबिकानगर, कोल्हार, ता. राहाता), सय्यद अली महंम्मद (रा. वांबोरी, ता. राहुरी), सतिष हनुमांत वैष्णव (रा. अकोले) रविंद्र सुभाष चकोर (रा. माधवनगर, मनमाड), मुनावर सलिम शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी), दिपक रामदास उंबरे (रा. येवला), परवेज शेख अब्दुल रहेमान (रा. मनमाड) अब्बास राजू शेख (रा. मनमाड), चाँद इब्राहीम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), जयहिंद गोविंद माळी (रा. राहुरी बु), विलास दत्तात्रय चोथे (रा. वांबोरी) सागर मदनलाला वर्मा (रा. बेलापूर बु, ता. श्रीरामपूर), गणेश विठ्ठल जेजूरकर (रा. शिर्डी ता. राहाता), इम्रान याकुब मोमीन (रा. मनमाड), शकील सलीम शेख (रा. अंबिकानगर, कोल्हार बु.) नजीर आजीज शेख (रा. राहूरी बु),  शकील जब्बर शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), संजय कांतीलाल पटेल (रा. कोल्हार बु. ता. राहाता), नुमान सत्तार शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), संकलेन कैय्यम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), भाऊसाहेब रामराव चौधरी (रा. रुई, ता. राहाता), सचिन बाळाराम पवार (रा. कोल्हार बु. ता. राहाता), अमोल भास्करराव वाघमारे (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा), गणेश रंगनाथ सोमासे (रा. येवला), महेश अण्णा बुरकुल (रा. मनमाड) अशा 41 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील बहुतांशी लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, लोणी, राहुरी, राहता, अकोले, संगमनेर, श्रींगोंदा, श्रीरामपूर, मनमाड, येवला अशा विविध तालुक्यातून राहाता पोलीस ठाण्याच्या हाद्दीत असे प्रकार चालतात आणि त्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला मिळत नाही. ही मोठी शोकांतीका आहे. या करवाईने जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे, एकीकडे देशावर कोविडचे संकट सुरू असताना अशा पद्धतीने लाके एकत्र येत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई झाली पाहिजे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ही एक उल्लेखनिय कारवाई म्हणावी लागेल. ही कारवाई पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.