धिक्कार.! अकोल्यात आदिवासींच्या अन्नाची तस्करी! 255 गोण्यांच्या तांदुळासह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त.! यांना अभय कोणाचा?

सार्वभौम (अकोले) :- 

                 अकोले तालुक्यात आदिवसी जनतेच्या मुळावर नक्की कोण उठले आहे याचे आत्मचिंतन करण्याची आज नित्तांत गरजे आहे. कारण, एकीकडे आदिवासी भागातील डोंगर दर्‍यातून धान्य मिळत नाही अशा तक्रारी येत असताना राजूर येथून 13 ते 14 लाखांचा रेशनचा तांदुळ संगमनेरकडे जातो म्हणजे यांना नेमकी कोण सपोर्ट करत आहे याचा शोध घेतला पाहिजे. आज साडेपाच महिण्यांपुर्वी म्हणजे दि. 4 एप्रिल 2020 रोजी संगमनेर पंचायत समितीच्या समोरच 600 गोण्या हडप करण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब रोखठोक सार्वभौमने सगळ्यांची समोर आणली होती. त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर आज चार महिन्यानंतर ही टोळी पुन्हा सक्रीय झाली आहे. विशेष म्हणजे यात राजुरचाच एक दलाल मध्यस्ती असून गोरगरिबांच्या चोचीतला दाणा घेऊन हे लोक पैसा कमवितात यांना सुख समाधान लाभतेे तरी कसे? आता अकोले पोलिसांनी पुन्हा मनोहरपूर फाटा येथे 255 गोण्यांचा तांदुळ पकडला आहे. म्हणजे हा जवळजवळ 18 लाख रुपयांचा मुद्देमाल आहे. हे धाडस कोणीही सहज करणार नाही. त्यांच्या दिमतीला सरकारी खात्यातले कोणीतरी बांडगुळ असल्याशिवाय अशी चोरी अशक्य आहे. मात्र, दुर्दैवाने अशा गुन्ह्यांचा शोध अंतीम व्यक्तीपर्यंत पोहचत नाही. येथे कुंपनच शेत खात असल्याचे लक्षात येते. मात्र, करणार तरी काय? झाकली मुठ सव्वा लाखाची. अशा लोकांना पुढारीच पाठीशी घालतात आणि वरवर कारवाई होऊन अशा गुन्ह्यांवर पडदा पडतो. एरव्ही आदिवासी सामज्यावर राजकारण होते. मात्र, त्यांच्या ताटातल्या घासाची तस्कारी होते. याकडे कोणी कटाक्षाने लक्ष घालत नाही अणि नेते तर प्रत्येकजण आमदार होण्यासाठी धडपडताना दिसत आहे. हक्क आणि अधिकार हे अशा पद्धतीने ट्रका भरून येथून विकले जात आहेत हेच मोठे दुर्दैव.! 

                याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी एक ट्रक राजूर येथून संगमनेरकडे जाणार असून त्यात रेशनिंगचे तांदुळ असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांना मिळाली  होती. त्यांनी तत्काळ एक टिम तयार करुन मनोहरपूर फाटा येथे सापळा रचला. ठरलेली ट्रक आली असता त्यांनी ती अडविली आणि वाहन चालक शाहबाज अहमद मनियार (रा. संगमनेर) यास गाडीत काय आहे? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने सर्व उडवाउडविची उत्तरे दिली. त्यामुळे, पोलीस स्वत: गाडीत चढले आणि त्यांनी चौकशी केली असता त्यात चक्क 255 तांदळाच्या गोण्या मिळून आल्या. त्यास याबाबत विचारणा केली असता त्यांचे सांगितले की, गाडीतील तांदुळ हे रेशनिंगचे आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह गाडी ताब्यात घेऊन थेट अकोले पोलीस ठाण्यात लावली. आता या गुन्ह्यात अन्न औषध पुरवठा विभाग किती वेळाने दखल घेते देवाला माहिती. परंतु दोन दिवस तर यांना गुन्हा दाखल करायला लागतील मग यांची गहाळ वाजवणी सुरू होईल. 

                             

                         खरंतर शासनाच्या गोदामातून अशा प्रकारची तस्कारी होते आणि त्यात सरकारी कोणीच नाही रतर ठेकेदार सुद्धा यात आरोपी केला जात नाही. हे फार मोठे दुर्दैव आहे. आता तरी आदिवासी संघटनांनी जागे झाले पाहिजे. या घटनेची सखोल तपासणी करण्यासाठी कायदेशीर मार्गाने जे काही बंड पुकारायचे ते पुकारले पाहिजे. यात अनेकांना विश्वास आहे की, यात भल्याभल्या अधिकार्‍यांचे हात आहे. तर या धान्याचा पाठपुरावा केला तर तुम्हाला लॉकडाऊन ते धान्याचे तुटवडा असा देखील सदर्भ मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, दुर्दैवाने लोक फक्त दोन दिवस आरडाओरड करतात आणि नंतर झाकली मुठ सव्वा लाखाची. मागच्या वेळी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाकडून अकोले तालुक्यासाठी प्रशासनाने 600 पोते तांदुळ पाठविण्यात आले होते. त्या पोत्यांचा मध्येच गाळा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार उघड झाला होता. यात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याचा पाठपुरावा देखील कोणी केला नाही. त्यात एक भयंकर मोठा प्रकार  नंतर समोर आला होता. तो कालांतराने दडपला देखील गेला. मात्र, ज्यांचे जाते त्यांना रग लागत नाही, मग आपण का त्यावर वारंवार आवाज उठवायचा? असा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे, तेव्हाच जर त्या गुन्ह्याचा सखोल तपास झाला असता तर आज असे गुन्हे पुन्हा समोर आले नसते. पण, येथे प्रत्येकाचे हात बरबटलेले आहेत. तेव्हातर रोखठोक सार्वभौमने गाडी, ट्रक, राजुरचा तो दलाल आणि बरीच काहीं माहिती समोर मांडली होती. मात्र, त्याचा पाठपुरावा कोणाला करु वाटला नाही.

खरंतर या गुन्ह्यात वाहन चालक, गाडीचा मालक, गोदामाचा रक्षक, स्थानिक पुरवठा अधिकारी, किंवा सब डिलर अशा अनेकांना आरोपी केले पाहिजे. मात्र, यात तसे होत नाही. कारण, जहाँ हातोंमे मलिदे मिलते हैं! वहाँ कानुन के हाथ लंबे नही, तर आखूड होते हैं! असे म्हटले जाते. त्यामुळे यात आता नेमके काय होते. राम जाणे! खरंतर हा प्रकार समोर आल्यानंतर स्वत: रोषन पंडीत यांनी अकोले पोलीस ठाण्यात भेट देऊन मुद्देमालाची पाहणी केली, तसेच चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मनियारची चौकशी केली. यापुर्वी देखील जो गुन्हा दाखल झाला होता ते आरोपी रशिद फकीर पठाण, योगेश चंद्रभान भडांगे (रा. अकोले रोड, देवाचा मळा, संगमनेर), विजय कचेश्वर सोनार (रा. राहणे मळा, संगमनेर) हे देखील संगमनेरचेच होते आणि हे महाशय देखील संगमनेरचेच आहे. त्यामुळे, यांचे हात कुठवर पोेहचलेले आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी ही फार मोठी कारवाई केली आहे. तर याचा तपास देखील ते स्वत:कडे घेणार आहेत. त्यामुळे, शक्यतो या गुन्ह्यात सहआरोपी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या या कारवाईमुळे तालुक्यातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.