वाघ बलात्कार करुन पसार झाला.! गर्भपात व अत्याचाराचा गुन्हा दाखल.!
सार्वभौम (अहमदनगर) :-
नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे व कायम तोफेच्या तोंडी असणार्या कोतवाली पोलीस ठाण्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी एका तक्रारदार तरुणीवर अत्याचार करुन तिचे गर्भपात केला. याबाबत गेल्या कित्तेक दिवसांपासून एक तक्रार कोतवाली पोलीस ठाणे व पोलीस अधिक्षक कार्यालयात खेळत होती. मात्र, आज अखेर हा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपुर्वी पोलीस निरीक्षक विकास वाघ हे कोतवाली पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. या दरम्यान तेथे एक 26 वर्षीय तरुणी एका तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली होती. तिने आपली तक्रार दाखल केल्यानंतर तिची व वाघ यांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर वाघ हे तिच्या घरी गेली असता तिच्याशी लगट करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या तरुणीने त्यास नकार दिला असता त्यांनी तिला पिस्तुलचा धाक दाखवून कंबर्याच्या पट्ट्याने मारहाण केली. तर तिला शिवीगाळ दमदाटी करीत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या दरम्यान संबंधित तरुणी गर्भवती राहीली असता तिचा गर्भपात करण्यात आला. असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक वाघ यांचे चाळे येथेच थांबले नाही तर आंमळनेर येथे देखील एका महिलेने वाघ यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती. मात्र, या दोन महिलांमध्ये झिंज्या धराधरी झाली आणि त्यानंतर आंमळनेरच्या महिलेने कालांतराने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच वाघ यांचे दुसरे कृत्य बाहेर आले आहे. त्यामुळे, एक जबाबदार पोलीस खाते जर असे करीत असेल तर त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खरंतर पोलीस अधिकारी म्हणजे एक जबाबदार घटक आहे. संविधानाच्या आयपीसी कालमांचा तो रक्षक आहे. असे असताना त्याने असला प्रकार करावा हे फार मोठे दुर्दैव आहे. यात आणखी दुर्दैवाची बाब अशी की, या घटनेतील महिलेवर अत्याचार झाल्याचे आरोप होत आहे. जर वाघ यात दोषी निघाले तर त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तर अर्थातच पोलीस निरीक्षक वाघ हे चुक असून गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या निलंबनाला नवे एसपी साहेब मुहूत काढणार का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.