अकोल्यात नगरसेवकासह 35 रुग्ण, पुन्हा एक बळी, संगमनेरात 62 रुग्णांची भर..!
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर मध्ये काल दि. 29 फेब्रुवारी रोजी उशिरा आलेल्या अहवालात 62 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे रोजचा वाढणारा आकडा आता प्रशासना पुढे चिंतेचा विषय ठरत आहे. येथे प्रशासकीय कार्यलयातील कोविड योध्यांना व अधिकार्यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. ऐवढेच नव्हेतर पोलीस ठाण्याच्या कैद्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. यापुढे कोरोनाचा संसर्ग थांबावा यासाठी संगमनेर प्रशासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा अभिनव उपक्रम तालुक्यात राबवला. यामध्ये शहरासह ग्रामीण भागात ग्राउंडवर काम करणार्या सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि व्यवस्थपणाची देखील टेस्ट करण्यात आली आहे.
आता ग्रामीण भागातील सरपंच, दुकानदार, सलून पार्लर, शिक्षक, तंटामुक्ती, वायरमन, अंगणवाडी सेविका, स्वस्तधान्य दुकानदार सर्व व्यापारी यांची सर्वांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा वाढणारा संसर्ग लवकरच आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. लवकरच ठप्प झालेली सुविधा सुरळीत करण्यासाठी संगमनेर प्रशासन आपली जीवाची बाजी लावताना दिसत आहे. तर अकोले तालुक्यात एका नगरसेवकास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात असणारे अनेकजण व्हेटीलेटरवर आहेत. तसेच गणोरे येथे एका व्यक्तीचा संशयितास मृत्यू झाला आहे. त्यामुळे, गावकर्यांनी आज गाव बंद ठेवले होते. तर उद्या दि. 1 ऑक्टोबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मनुष्यबळाच्या आभावी संगमनेरची आकडेवारी आता रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत येत नाही. त्यामुुळे, तालुक्यातून अनेकांचे मेसेज येऊन पडतात.! आजची अपडेट काय आहे. लोक गाढ झोपल्यानंतर प्रशासनाची आकडेवारी येते. त्यामुळे, वाचकांनी त्याची दखल घ्यावी. फोन करुन किंवा मेसेज टाकून आम्ही कोणतीही माहिती देऊ. काल मंगळवार दि. 29 रोजी संगमनेर शहरातील मालदड रोड येथे 32 वर्षीय पुरुष तर घुलेवाडी येथे 25 वर्षीय युवक व पावबाकी रोड येथे 27 वर्षीय युवक तर देवाचामळा येथे 43 वर्षीय पुरुष व घुलेवाडी येथे 30 वर्षीय युवक व गुंजाळवाडी येथे 34 वर्षीय पुरुष तर साईनगर येथे 45 वर्षीय महिला तर गुंजाळवाडी येथे 62 वर्षीय 35 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगी तर 34 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, समनापूर येथे 34 वर्षीय पुरुष तर शिवाजीनगर येथे 49 वर्षीय महिला तर निमगावपागा येथे 64 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय मुलगी तर धांदरफळ खुर्द येथे 25 वर्षीय महिला तर निमगाव पागा येथे 19 वर्षीय व 15 वर्षीय युवती तर संगमनेर खुर्द येथे 26 वर्षीय युवक तर घारगाव येथे 18 वर्षीय युवक तर कौठे बु येथे 60 वर्षीय व 40 वर्षीय पुरुष तर 55 वर्षीय आणि 35 वर्षीय महिला व 80 वर्षीय वयोवृद्ध तर जवळेकडलग येथे 12 वर्षीय मुलगी तर उंबरी बाळापूर येथे 16 वर्षीय मुलगा तर प्रतापपुर येथे 45 वर्षीय महिला तर चिचपूर येथे 84 वर्षीय वयोवृद्ध व 36 वर्षीय महिला अशा 62 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
अकोले तालुक्यात आज बुधवारी दि. 30 सप्टेंबर रोजी 35 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. त्यात माळीझाप येथे 17 वर्षीय तरूण, कोतुळ येथे 75 वर्षीय महीला, 51 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला, सावंतवाडी येथे 17 वर्षीय तरूण, तांभोळ येथे 60 वर्षीय महीला, 33 वर्षीय महीला, 05 वर्षीय मुलगा, कळस येथे 49 वर्षीय पुरूष 55 वर्षीय महीला, 42 वर्षीय महीला, पानसरवाडी येथे 19 वर्षीय तरूण, शहरातील शिवाजी चौक येथे 65 वर्षीय महीला, राजुर येथे 43 वर्षीय महीला, 11 वर्षीय युवती, जुन्नर येथीलन आलेली 73 वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथे 53 वर्षीय महीला, 41 वर्षीय पुरूष, 68 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय तरूण, चितळवेढे येथे 51 वर्षीय पुरूष, 21 वर्षीय महीला, शेंडी येथे 25 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय महीला, टाहाकारी येथे 50 वर्षीय महीला, 80 वर्षीय महीला, 25 वर्षीय तरूण, 21 वर्षीय तरुण, 30 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, राजुर येथे 41 वर्षीय महीला, सुगाव बु येथे 57 वर्षीय पुरूष, कुंभेफळ येथे 33 वर्षीय पुरूष अशा 35 व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर आजवर तालुक्याची संख्या आता 1 हजार 539 इतकी झाली आहे. तर अकोले तालुक्यातील गाणोरे येथे एक संशयित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, गणोरे हे गाव एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले १२, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७,
अकोले ०८, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण २६, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी २०, संगमनेर २७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३७७ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ३२, अकोले १८, जामखेड ३०, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ५२, नेवासा ४०, पारनेर ११, पाथर्डी १९, राहाता ३६, राहुरी १६, संगमनेर ३९, शेवगाव २१, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ४७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे. आजवर बरे झालेली रुग्ण संख्या ३८ हजार ८३८ असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ४६७ इतकी आहे. तर ७१८ रुग्णांचा आजवर मृत्यू झालेला आहे. तसेच एकूण रूग्ण संख्या ४४ हजार ०२३ इतकी आहे.
- सुशांत आरोटे (गणोरे)