अकोले तालुक्यात एकाच दिवशी दोन तर आठवड्यात तीन मयत.! मयतांची माहिती काही कळेना.!

सार्वभौम ( अकोले) :- 

                    संगमनेर व अकोले तालुक्यात आजकाल जितक्यात तपासण्या केेल्या जात आहे, तितके लोक पॉझिटीव्ह येऊ लागले आहेत. खरंतर रुग्ण बाधित होणे हे साहजिक आहे. परंतु, मृत्युदर कमी होणे अपेक्षित आहे. मात्र, वास्तवत: आजकाल लोक मृत्यु पावतात मात्र, त्याची माहिती दिली जात नाही. किंवा ती माध्यमांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे, बाधित रुग्ण मिळतात खरे परंतु मयतांची माहिती मिळत नाही. त्यामुळे, कोविड मृत्युचे गुढ एक प्रकारे तेरी भी चूप व मेरी भी चुप. खरंतर माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर घाबरणारे काही लोक असतील देखील. मात्र, बातमी वाचून अनेक लोक सावध होतात, स्वत:ची काळजी घेतात, बाधित व्यक्तींच्या संपर्कात आपण आलो होतो का याचे चिंतन करतात, आपले कुटुंब, नातेवाईक यांना सुचना करतात. त्यामुळे, बातम्यांकडे कोणी निगेटीव्ह दृष्टीने किंवा प्रशासनाने देखील अशी माहिती देणे चुक वाटते आहे. खरंतर एक विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यात एक कोरोना बाधित व्यक्ती एका डॉक्टरांनी निमोनिया म्हणून मयत घोषीत केला आणि त्यास घरी देखील सोडले. मात्र, तो व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, त्या विधिला जे-जे हजर होते. ते सर्वच पॉझिटीव्ह आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे, ही जबाबदारी कोणाची? त्यामुळे, मयतांची माहिती प्रशासनाने समोर मांडली पाहिजे. अन्यथा संगमनेरच्या धांदरफळ येथूनच ही सुरूवात झाल्याचे विसरून चालणार नाही.

आता अकोले तालुक्यात सध्या तरी कोरोना चाचणीची टंगळमंगळ सुरू आहे की काय! असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, आज तीन दिवस उलटून गेले आहे. तरी येथे पुरेेशा रॅपीड अँन्टीजन टेस्टच्या किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे, संगमनेर तालुक्यात रोज शेकडो टेस्ट घेतल्या जातात तेव्हा त्यात 70,80 किंवा रोजी 40 ते 50 रुग्ण मिळून येतात. ही संख्या खर्‍या अर्थाने तालुक्याला कोरोना मुक्तीकडे घेऊन चालली आहे असे म्हटले तर काही वावघे ठरणार नाही. मात्र, सुदैवाने आता मृत्युदर कमी झालेला दिसत आहे. त्या तुलनेत अकोल तालुक्यात आता एकाच दिवशी दोन तर याच आठवण्यात तीन जणांनी आपला जीव गमविला आहे. त्यामुळे, येथील मयत संख्या 14 वर जाऊन पोहचली आहे. तर संगमनेरात 30 संख्या ओलांडली आहे. दरम्यान अकोले तालुक्यात चार दिवसांपुर्वी एका 55 वर्षीय व्यक्तीचा नाशिक येथे मृत्यु झाला होता. तर काल राजूर येथे एका 57 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला त्यानंतर पाडाळणे येथे 75 वर्षीय पुरुषाचा संगमनेर येथे उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तर या पलिकडे काही रुग्ण मयत झाले तरी त्यांची नोंद झालेली नाही.  

तर गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी अकोले तालुक्यात 16 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात राजूूर येथे घेण्यात आलेेल्या रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये पाडाळणे येथे 17 वर्षीय तरुणी, 26 वर्षीय तरुण, 75 वर्षीय तरुण, शेंडी येथे 25 वर्षीय तरुण, अकोले शहरात शाहुनगर येथे 32 वर्षीय तरुण, टाहाकारी येथे 21 वर्षीय तरुण, 45 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय तरुणी, समशेरपूर येथे, 55 वर्षीय पुरुष 36 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 80 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 27 वर्षीय तरुणी, 64 वर्षीय पुरुष, वरखडवाडी देवठाण येथे 26 वर्षीय तरुण, टाकळी येथे 41 वर्षीय पुरूष, तांभोळ येथे 40 वर्षीय पुरुष, अशा 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 

तर संगमनेरात कौठे मलकापुर येथे 25 वर्षीय तरुण, कौठे बु येथे 38 वर्षीय महिला, साकुर येथे 32 वर्षीय पुरुष,  वनकुटे येथे 27 वर्षीय पुरुष,  संगमनेर खुर्द 24 वर्षीय तरुणी, 50 व 70 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ 20 तरुण, 25 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, मालदाड रोड संगमनेर येथे 46 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 71 वर्षीय महिला, 71 व 38 वर्षीय महिला, 64 व 46 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 12 वर्षीय मुलगा, 20 व 19 वर्षीय मुली, जोर्वे 26 वर्षीय तरुणी, वडगाव पान 50 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे 80 वर्षीय महिला, चैतन्यनगर संगमनेर, 27 वर्षीय तरुण, पेटकर हॉस्पिटल 40 वर्षीय पुरुष,  जे.पी रोड संगमनेर 56 वर्षीय महिला, निर्मलनगर गुंजाळवाडी 57 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे 57 वर्षीय पुरुष, अकोले नाका येथे 76 वर्षीय पुरुष,  जवळे कडलग 44 वर्षीय पुरुष, बोटा 23 वर्षीय तरूणी, अकलापूर येथे 70 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, 22, 24 व 26 वर्षीय तरुण मुली, 65 वर्षीय महिला, आश्वी खुर्द 58 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे 35 वर्षीय महिला, हसन नगर येथे 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालिका, सादतपूर 36 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगी, देवकौठे येथे 8 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय महिला, कोल्हेवाडीत 60 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 33 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला 59 वर्षीय पुरुष, धांदरफळ बु 22 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे 75 वर्षीय पुरुष,  70 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, जवळे कडलग येथे 41 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 26 वर्षीय तरुणी, 62 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय मुलगी, कसारा दुमाला येथे 40 वर्षीय महिला, घुलेवाडीत 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण, 15 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष, सोनेवाडीत 45 वर्षीय महिला, गोविंदनगर येथे 31 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 56 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथे 33 वर्षीय महिला, कुरण येथे 23 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 43 वर्षीय महिला, ताजणे मळा येथे 46 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथे 31 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, धांदरफळ बु 76 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 44 वर्षीय महिला, चैतन्य नगर येथे 70 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 34 वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन येथे 32 वर्षीय पुरुष, चिकणीत 66 वर्षीय पुरुष, खांजपूर येथे 30 वर्षीय महिला अशा 80 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. 

                  

                     तर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज 909 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 हजार 150 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.28 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 781 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 80 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 204, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 258 आणि अँटीजेन चाचणीत 319 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 56, संगमनेर 28, राहता 03,  पाथर्डी 21,, नगर ग्रामीण 07, श्रीरामपूर 08, कँटोन्मेंट 21,  नेवासा 10, श्रीगोंदा 05, पारनेर 08, राहुरी 02, शेवगाव 13, कोपरगाव 01,  जामखेड 02, मिलिटरी हॉस्पिटल 17 इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

                         खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 258 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 79, संगमनेर 16, राहाता 35, पाथर्डी 08,  नगर ग्रामीण 27, श्रीरामपुर 07,  कँटोन्मेंट 02, नेवासा 08, श्रीगोंदा 03,  पारनेर 32,अकोले 07, राहुरी 20,  शेवगाव 01, कोपरगांव 08, जामखेड 02 आणि कर्जत 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 319 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 86, संगमनेर 37, राहाता 18, पाथर्डी 17, श्रीरामपूर 22, नेवासा 38, श्रीगोंदा 26, पारनेर 16, अकोले 09, शेवगाव 16, कोपरगाव 15, जामखेड 05 आणि कर्जत 14 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 909 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 322, संगमनेर 71, राहाता 59, पाथर्डी 21, नगर ग्रा.95, श्रीरामपूर 23, कँटोन्मेंट 13,  नेवासा 55, श्रीगोंदा 32, पारनेर 20, अकोले 37, राहुरी 43, शेवगाव 14,  कोपरगाव 26, जामखेड 17, कर्जत 13, मिलिटरी हॉस्पिटल 10 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या 24 हजार 150 झाली असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या 4 हजार 80 वर गेली आहे. तर मृत्यू झालेले रुग्ण 426 असून आजवर कूण रूग्ण संख्या 28 हजार 656 इतकी झाली आहे.