अकोल्यात 16 रुग्ण तर दोघांचा मृत्यू.! संगमनेरात चक्क 80 रुग्णांची भर.!

सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-

                  अकोले तालुक्यात कॉलेजचे प्राचार्य पॉझिटीव्ह आढळून येऊ लागले आहे. त्यामुळे, जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. ज्यांना काही सिमटन्स वाटत असेल तर त्यांनी स्वत:हून तपासणी केली पाहिजे, तर ज्यांना शंका असेल त्यांनी स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतले पाहिजे. सध्या प्राचार्यांच्या संपर्कात जे कर्मचारी आले होते त्यापैकी आठ जणांचे स्वॅब घेऊन ते जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. तर राजूर येथे एका 57 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर गेल्या दोन दिवसांपुर्वी राजूर येथील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. ते नाशिक येथे अ‍ॅडमिट होते. त्यामुळे या दोन मृत्युने आता मृत्युची संख्या 13 वर गेली आहे.


                     तर आज गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी अकोले तालुक्यात 16 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात राजूूर येथे घेण्यात आलेेल्या रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये पाडाळणे येथे 17 वर्षीय तरुणी, 26 वर्षीय तरुण, 75 वर्षीय तरुण, शेंडी येथे 25 वर्षीय तरुण, अकोले शहरात शाहुनगर येथे 32 वर्षीय तरुण, टाहाकारी येथे 21 वर्षीय तरुण, 45 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय तरुणी, समशेरपूर येथे, 55 वर्षीय पुरुष 36 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 80 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 27 वर्षीय तरुणी, 64 वर्षीय पुरुष, वरखडवाडी देवठाण येथे 26 वर्षीय तरुण, टाकळी येथे 41 वर्षीय पुरूष, तांभोळ येथे 40 वर्षीय पुरुष, अशा 16 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर राजूर येथे एका 57 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

तर संगमनेरात कौठे मलकापुर येथे 25 वर्षीय तरुण, कौठे बु येथे 38 वर्षीय महिला, साकुर येथे 32 वर्षीय पुरुष,  वनकुटे येथे 27 वर्षीय पुरुष,  संगमनेर खुर्द 24 वर्षीय तरुणी, 50 व 70 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ 20 तरुण, 25 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, मालदाड रोड संगमनेर येथे 46 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 71 वर्षीय महिला, 71 व 38 वर्षीय महिला, 64 व 46 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 12 वर्षीय मुलगा, 20 व 19 वर्षीय मुली, जोर्वे 26 वर्षीय तरुणी, वडगाव पान 50 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे 80 वर्षीय महिला, चैतन्यनगर संगमनेर, 27 वर्षीय तरुण, पेटकर हॉस्पिटल 40 वर्षीय पुरुष,  जे.पी रोड संगमनेर 56 वर्षीय महिला, निर्मलनगर गुंजाळवाडी 57 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे 57 वर्षीय पुरुष, अकोले नाका येथे 76 वर्षीय पुरुष,  जवळे कडलग 44 वर्षीय पुरुष, बोटा 23 वर्षीय तरूणी, अकलापूर येथे 70 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, 22, 24 व 26 वर्षीय तरुण मुली, 65 वर्षीय महिला, आश्वी खुर्द 58 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे 35 वर्षीय महिला, हसन नगर येथे 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालिका, सादतपूर 36 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगी, देवकौठे येथे 8 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय महिला, कोल्हेवाडीत 60 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 33 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला 59 वर्षीय पुरुष, धांदरफळ बु 22 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे 75 वर्षीय पुरुष,  70 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, जवळे कडलग येथे 41 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 26 वर्षीय तरुणी, 62 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय मुलगी, कसारा दुमाला येथे 40 वर्षीय महिला, घुलेवाडीत 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण, 15 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय पुरुष, सोनेवाडीत 45 वर्षीय महिला, गोविंदनगर येथे 31 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 56 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथे 33 वर्षीय महिला, कुरण येथे 23 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 43 वर्षीय महिला, ताजणे मळा येथे 46 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथे 31 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, धांदरफळ बु 76 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 44 वर्षीय महिला, चैतन्य नगर येथे 70 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 34 वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन येथे 32 वर्षीय पुरुष, चिकणीत 66 वर्षीय पुरुष, खांजपूर येथे 30 वर्षीय महिला अशा 80 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. 


                  जसजसे कोरोनाचे सावट वाढत चालले आहे. तसतसे प्रशासनाचे काम वाढत असल्याचे दिसते आहे. जोवर टेस्ट वाढत नाही तोवर रुग्ण सापडत नाहीत आणि रुग्ण संपत नाही तोवर कोरोना हद्दपार होत नाही. मात्र, राज्यात काही ठिकाणी कोरोनाची आकडेवारी वाढू नये यासाठी टेस्टचे प्रमाण कमी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, राजकारण उभे करण्यासाठी कोरोनाला घरात दडपविण्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. त्याचा तोटा म्हणजे बाधितांचे प्रमाण आणि मृत्युदर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे, अकोल्यात लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी रॅपीड अ‍ॅन्टीजनच्या टेस्ट जास्तीत जास्त कशा होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मृत्युदर कमी होणार आहे. अर्थात अकोले तालुक्यात तहसिलदार मुकेश कांबळे आणि आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे तसेच श्याम शेटे यांच्यासह प्रशासनाचे नियोजन उत्तम आहे. त्यामुळे, येथे कोरोनाचा अतिरेक कधी पहावयास मिळाला नाही. मात्र, वेळोवेळी तपासणी किट उपलब्ध करुन करु देणे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ. अजित नवले यांनी अकोल्यात कोरोना तपासणीची सुसज्ज लॅब व्हावी अशी मागणी केली आहे. तर त्यानंतर रिपाईचे राजू गावंदे व सामजसेवक तात्यसाहेब देशमुख यांनी देखील त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या महत्वपुर्ण गरजा तालुक्याला मिळाव्यात यासाठी कोणी फारसे अग्रही नसल्याचे दिसते आहे. मात्र, तालुक्यात समाजकारण कमी आणि द्वेषाचे राजकारण व ऊणीधुणी करण्यात लोक माहिर झाल्याचे दिसू लागले आहे. 

           तर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज 909 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 हजार 150 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.28 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 781 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 80 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 204, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 258 आणि अँटीजेन चाचणीत 319 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 56, संगमनेर 28, राहता 03,  पाथर्डी 21,, नगर ग्रामीण 07, श्रीरामपूर 08, कँटोन्मेंट 21,  नेवासा 10, श्रीगोंदा 05, पारनेर 08, राहुरी 02, शेवगाव 13, कोपरगाव 01,  जामखेड 02, मिलिटरी हॉस्पिटल 17 इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 258 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 79, संगमनेर 16, राहाता 35, पाथर्डी 08,  नगर ग्रामीण 27, श्रीरामपुर 07,  कँटोन्मेंट 02, नेवासा 08, श्रीगोंदा 03,  पारनेर 32,अकोले 07, राहुरी 20,  शेवगाव 01, कोपरगांव 08, जामखेड 02 आणि कर्जत 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 319 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 86, संगमनेर 37, राहाता 18, पाथर्डी 17, श्रीरामपूर 22, नेवासा 38, श्रीगोंदा 26, पारनेर 16, अकोले 09, शेवगाव 16, कोपरगाव 15, जामखेड 05 आणि कर्जत 14 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 909 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 322, संगमनेर 71, राहाता 59, पाथर्डी 21, नगर ग्रा.95, श्रीरामपूर 23, कँटोन्मेंट 13,  नेवासा 55, श्रीगोंदा 32, पारनेर 20, अकोले 37, राहुरी 43, शेवगाव 14,  कोपरगाव 26, जामखेड 17, कर्जत 13, मिलिटरी हॉस्पिटल 10 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या 24 हजार 150 झाली असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या 4 हजार 80 वर गेली आहे. तर मृत्यू झालेले रुग्ण 426 असून आजवर कूण रूग्ण संख्या 28 हजार 656 इतकी झाली आहे.