एका संघर्षातून जन्मलेला शतकरी कार्यकर्ता...!

सार्वाभौम (अकोले) : 

                   राष्ट्रवादी म्हटलं की, संघर्षमय शुन्याला देखील क्षणात लाखाची किंमत प्राप्त करुण देणारा पक्ष अशी याची ओळख आहे. म्हणून तर शरद पवार या खुल्या आकाशाखाली अनेकांना राजकीय आश्रय मिळाले आहेत. जो लोभ ठेऊन काम करतो, त्याचे वलय फार काळ टिकत नाही. मात्र, जो निर्मळ वृत्तीने एकनिष्ठ राहतो त्याला बारामतीच्या कोठ्यातून अचानक एखादे पत्र येते आणि आजवर कसलेल्या आयुष्याचे चिज होऊन जाते. अशा एका संघर्षशिल तरुणाची कहाणी आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. ते म्हणजे युवक तालुकाध्यक्ष अकोले रविंद्र खंडू मालुंजकर (रा.रुंभोडी) होय!

खरंतर रविंद्र मालुंजकर हे अगदी सामान्य कुटुंबातील व्यक्तीमत्व. आई वडील आपल्या काळ्या मातीशी एकनिष्ठ होऊन रोज शेतात राबतात, राजकारणाचा कोणताही वारसा नाही. मात्र, पक्ष म्हणून थेट निष्ठा असेल तर ती फक्त बारामतीशी. अर्थातच शरद पवार यांच्याशी! त्यामुळे, कोेणी पक्षात आले काय आणि गेले काय! काही घेणेदेणे नाही. मात्र, राष्ट्रवादी आणि मालुंजकर परिवार यांचे अगदी भावनिक व जिव्हाळ्याचे नाते. पवार साहेबांना देव म्हणून काळजाच्या देव्हार्‍यात ठेवणारे हे अगदी सामान्य कुटुंब होय.

                               


खरंतर जेव्हा 2019 च्या निवडणुका झाल्या तेव्हा राष्ट्रवादीचे जुने लाभार्थी अगदी घरोघर फिरत होते. काल घड्याळावर प्रेम करणारे मात्तबर आज कमळाच्या पाकळ्या जमा करण्यात व्यस्त झाले होते. तोच दिवस रविंद्र मालुंजकर यांच्या देखील घरावर आला होता. अगदी सकाळी-सकाळी कार्यकर्त्यांचा एका लोंढा त्यांच्या घरात शिरला. आपल्याला भाऊंचे काम करायचे आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची भाषा केली. तो काळ खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात पवार साहेबांनी काय पेरले आहे हे सिद्ध करण्याचा होता. त्याच क्षणी मालुंजकर यांची माय माऊली घराच्या आतल्या खोलीतून मोठ्या आवेशाने उत्तरली. पक्षबदलाच्या भाषा माझ्या घरात व्हाव्यात अशी माझी यत्किंचितही ईच्छा नाही. पवार साहेबांना आम्ही जाणता राजा म्हणतो, ते आमच्यासाठी आणि देशासाठी ईश्वर आहेत, त्यामुळे साहेबांच्या पुढे आम्ही जाणार नाही, पवार साहेब हाच आमचा पक्ष आहे. त्यामुळे, तुम्हा सर्वांचा मी आदर करते मात्र, माझ्या मुलास आग्रह करु नका, तो काहीही झाले तरी पक्ष बदलणार नाही. त्या दिवसापासून खर्‍या अर्थाने मालुंजकर कुटुंबाने पक्षावरील प्रेम सिद्ध केले. खरंतर पडत्या काळात जो संघर्षात साथ देतो तोच खरा सारथी असतो. त्यामुळे, अकोले तालुक्याचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी असे अनेकजण सारथी झाले आणि एक विजय रथ तयार करुन त्यात डॉक्टर किरण लहामटे यांच्यासारखे लोकाभिमूख व्यक्तीमत्व बसवून ते शरद पवार यांच्या स्वाधिन केले ही खरी राष्ट्रवादीची ताकद रवी मालुंजकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांपासून निर्माण झाली आहे.

गेल्या विधानसभेत जनतेने राष्ट्रवादीच्या पदरात अकोले मतदारसंघ टाकला. त्यानंतर पक्षाची मोट बांधण्यासाठी 14 मार्च 2020 रोजी रविंद्र मालुंजकर यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली होती. अकोले तालुक्याच्या वायव्य दिशेत वसलेल्या टाहाकारी या दुर्गम गावात जन्म घेतलेला हा धेय्यवेडा युवक तालुक्याच्या इतिहासात कधी जन्म घेईल असे कोणाला वाटले देखील नव्हते. मात्र, जेव्हापासून त्याच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी पडली अगदी त्या क्षणापासून त्यांनी आपली घोडदौड सुरू केली. खरंतर माणूस अनुभव घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळे हे उभं आयुष्य संघर्षातूनच निर्माण करावे लागले. त्या संघर्षमय जीवनाला मालुंजकर यांनी आज खर्‍या अर्थाने प्रारंभ केला आहे. कारण, घरात राजकीय बाळकडू नसताना राजकारणात पाय रोवून आणि रोखून उभे राहणे वाटते तितके सोपे नाही. मात्र, पवार साहेबांच्या आदर्शाचा एकच अजेंडा त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण याच धेय्याने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.

                                 

                        खरंतर अनेकांनी वेगवेगळ्या पक्षासाठी आपले आयुष्य वेचले आहे. पुरोगामी विचारधारा रुजविणे आणि अनिष्ट रुढी परंपरेच्या विरोधात चळवळी उभ्या करणे यात अनेकांनी आपले जीवन खर्ची घातले आहे. यात कोणी हिरो झाले तर कोणी झिरो राहिले. रवी हे देखील त्यातलेच एक व्यक्तमत्व आहे. कारण, बारामतीच्या विचारांचा वारसा चालविण्यासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या 15 वर्षापासून वसा घेतला होता. मात्र, मातब्बरांच्या धिटाईखाली दाबलेला हा तरुण आज एका ज्वालामुखीसारखा बाहेर आला आहे. प्रस्थापित गावकर्‍यांच्या शब्दांखाली सिमीत झालेल्या या तरुणास डॉ. किरण लहामटे, राजेंद्र फाळके, अशोक भांगरे, संदिप वर्पे, कपिल पवार, भानुदास तिकांडे यांच्यासारख्या नेत्यांनी संधी दिली आणि शरद पवारांना काळजात ठेवणार्‍या या तरुणास योग्य पदावर विराजमान केले याबाबत ते स्वत: ऋण व्यक्त करतात. आता नुकतेच काम सुरू केले आहे. कोविडच्या काळात देखील मालुंजकर यांनी मैदानात उतरुन काम केले आहे. आता लॉकडाऊनचे नियम देखील शिथील करण्यात येत आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात भान ठेऊन काम करणे आणि बेभान होऊन काम करणे, हेच मालुंजकर यांच्याकडून पहावयास मिळेल यात तिळमात्र शंका नाही. 


कर्तुत्वातून सार्थ ठरल.                                     
 मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. माझ्या निष्ठेची दखल घेत माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती मी सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच पुर्ण करेल. येथील आरोग्य, शिक्षण, रोजगार, गरिबांना घरे, पुनर्वसन, गाव तेथे राष्ट्रवादी व घर तेथे कार्यकर्ता अशी अनेक अजेंड्यावरील कामे मी करणार आहे. 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करणार आहे. खरंतर जनता हीच ईश्वर आणि कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो तो कणा ताठ व स्वाभिमानी राहण्यासाठी अकोले तालुक्यात अगदी वाडी वस्तीपर्यंत जाऊन मी काम करणार आहे. मी माझ्या जबाबदारीवर ठाम राहून ती कर्तुत्वातून सार्थ ठरवून दाखवेल.

- रविंद्र मालुंजकर 

(अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोले तालुका कार्यकारणीत काल ज्यांची नव्याने निवडी करण्यात आल्यात आहेत. त्यांचा अशा प्रकारचा कार्यकर्ता ते पदाधिकारी असा संघर्षमय प्रवास लेख देण्यासाठी संपर्क करा. 8888782010, 8208533006, 7020290257 या क्रमांकावर फोन करा. तसेच आपली यशोगाथा व संघर्षमय प्रवास लिहून पाठवा. याचे एक विशेष अंक काढण्याचे काम सुरू आहे.