संगमनेरात पुन्हा 66 रुग्ण.! अकोल्यातही अकोल्यातही कोरोनाचे (50) अर्धशतक .!

सार्वभौम (संगमनेर) : - 

                       काल एकाच दिवशी 80 रुग्ण मिळून आल्यानंतर आज पुन्हा 66 जणांचे अहवाल पॉझिटीव आले आहेत. तर अवघ्या 24 तासात आठरावे शतक पुर्ण करुन एकोणावीसाव्या शतकाकडे वाटचाल केली आहे. आता कोरोना अटोक्यात आणायचा असेल तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे महत्वाचे आहे.  हे लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना सांगितले आहे की, रुग्णांचा शोध घ्या. त्यामुळे, आता तपासण्या घेण्याचे काम युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. त्यामुळे, रोज बाधितांचा प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे, कोरोनाचा मोठा बाऊ करुन घाबरु नये. तर अकोले तालुक्यात देखील कोरोनाचे आज अर्धशतक पुर्ण झाले आहे. अकोले आरोग्य प्रशासनाने रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचणीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे, शोध सापडून का होऊन रूग्ण शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, अकोल्यातील कोरोना लवकरच हद्दपार होईल असे चित्र आहे. आज खाजगी रुग्णालयातील सर्व अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

                        आज शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी संगमनेरात कौठे धांदरफळ येथे 34 वर्षीय पुरुष, नऊ व सात वर्षीय बालक, बाजारपेठ येथे 70 वर्षीय पुरुष,, 42 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी तर 7 वर्षीय मुलगा, सायबन कॉलनी येथे 25 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 33 वर्षीय महिला, मंगळापूर येथे 11 वर्षीय मुलगी, रायते येथे 41 वर्षीय पुरुष, एसटी कॉलनीत 30 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथे 18 वर्षीय मुगली व 15 वर्षीय मुलगा, कौठे धांदरफळ येथे 55 व 32 वर्षीय महिला, 11 व 8 वर्षीय बालक, दाढ खु येथे 26 वर्षीय तरुणी, 48 वर्षीय महिला, निमगाव जाळीत 63 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, रहिमपूर येथे 27 वर्षीय पुरुष तर 5 वर्षीय बालक, कुरकुटवाडी येथे 80 वर्षीय पुरुष, माळेवाडीत 70 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय पुरुष, कौठे बु येथे 54 वर्षीय पुरुष, रायतेवाडीत 65 वर्षीय महिला, चोरकौठे येथे 67 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर 26 वर्षीय तरुण, कौठे बु येथे 55 वर्षीय पुरुष, लाल तारा हौसिंग 45 वर्षीय पुरुष, कसारा दुमाला 62 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत 40 वर्षीय पुरुष, निमोण येथे 65 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण, वाघापूर येथे 48 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरुष, रायतेवाडीत 52 वर्षीय पुरुष, गोल्डनसिटी गुंजाळवाडीत, 59 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी व 13 वर्षीय बालक, गुंजाळवाडीत 40 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, केळेवाडीत 52 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे 57 वर्षीय महिला, सुकेवाडीत 80 वर्षीय महिला. वडगाव पान येथे 33 वर्षीय पुरुष, चंदनापुरीत 45 वर्षीय महिला, मनोलीत 72 वर्षीय महिला, मालदाड रोड 39 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 38 वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे 55 वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे 85 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण, खराडीत 28 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 49 वर्षीय पुरुष, चंदनापुरीत 52 वर्षीय पुरुष, जनता नगर येथे 25 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय पुरुष, चंद्रशेखर चौक येथे 22 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडीत 41 वर्षीय महिला अशा 66 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

       अकोले शहरातील के. जी रोड येथे 62 वर्षीय पुरूष, कळस येथे 12 वर्षीय तरुणी व अवघ्या 7 वर्षाचा मुलगा, कोतुळ येथे 16 वर्षीय तरुणी, 39 वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथे 36 वर्षीय पुरूष, लहीत येथे 40 वर्षीय पुरूष, विठा येथे 53 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महीला, 38 वर्षीय महीला, 14 वर्षीय युवती, केळुगंण येथे 28 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण, 33 वर्षीय पुरूष, नवलेवाडीत 33 वर्षीय महिला, धुमाळवाडीत 56 वर्षीय पुरूष, अशा व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर बेलापुर येथील 58 वर्षीय महीलेचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे बेलापुरात ५८ महिला बाधित मिळून आली आहे. 

                           तर आज दुपारीच एकट्या राजूरमध्ये 69 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 17  पुरुष, 21 वर्षीय तरुणी,25 वर्षीय तरुणी, 33 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय तरुणी, 22 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगा, दोन 5  वर्षीय मुले, 12 वर्षीय मुलगी अशा एकूण 18 जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय राजूर येथील डॉ. दिघे यांनी दिली. तरीही राजूर मध्ये अजूनही सोशल डिस्टस ठेवला जात नाही, आता  खर्‍या अर्थाने राजूर येथे कोरोना पेशन्ट निघण्यास सुरुवात झाली आहे. राजूर मध्ये 5 सप्टेंबर पासून 5 दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. इथून पुढे राजूर गाव पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सोडता सर्व  दुकाने बंद राहतील. राजूर करानो सावधान काळजी घ्या ...! विनाकारण बाहेर फिरू नका...!घरी रहा... सुरक्षित रहा..! असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर कोतुळ येथे 40 वर्षीय महिला, वाशेरे येथे 40 वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 55 वर्षीय महिला, अकोले येथे 39 वर्षीय पुरुष, पिंपळवंडी येथे 26 वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथे 30 वर्षीय महिला, तर 15 वर्षाचा मुलगा चास येथे 80 वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे 42 वर्षीय पुरुष अशा आज 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.