अखेर अकोले शहर उद्या सुरू राहणार, आमदार डॉ. लहमटे यांनी केले आवाहन.! बंदचा व आमचा काही संबंध नाही - तहसिलदार
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले शहर बंद ठेवायचे की चालु याबाबत आज रात्रीपर्यत एकमत झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे, जे छोटे व्यापारी होते. त्यांनी आपले व्यवसाय चालु ठेवण्याचा निर्णय घेतला असून जे धनदांडगे व ज्यांचे रोजच्या रोज व्यवहार नाहीत असेच लोक बाजारपेठा बंद ठेवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. यात आता आमदार डॉ. किरण लहामटे यांनी जनता कर्फ्युबाबत मौन सोडला आहे. रोखठोक सार्वभौमशी बोलताना आमदार म्हणाले की, पोटाच्या प्रश्नापेक्षा कोणीच मोठे नाही. त्यामुळे, कोणावर उपासमारीचे वेळ येऊ नये त्यासाठी कोणाला बळजबरीने दुकाने बंद करण्यास कोणी भाग पडू नये. जो कोणी स्वयंस्पुर्तीने दुकान बंद करीत असेल त्याला बंद करूद्या तर ज्यांचे पोट हातावर आहे. त्यांना दोन रुपये कमविल्याशिवाय अन्न मिळणे कठीण आहे. त्यांच्याकडून बंद पाळण्याची अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे? मात्र, जे चालु ठेवणार आहेत त्यांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण जनता कर्फ्युच्या विरोधात मुळीच नाही. मात्र, शहर बंद करण्यासाठी कोणाला बळजबरी करू नये. कोरोना एक महामारी तर आहेच मात्र, त्याच बरोबर ऊपासमारी हा देखील विषय महत्वाचा आहे. त्यामुळे, शासकीय नियम पाळून दुकाने चालु ठेवायला काही हरकत नाही. असे आवाहन आमदार मोहदयांनी केले आहे.
तर या सगळ्यांमध्ये तहसिलदार मुकेश कांबळे यांनी कायदेशीर चौकटीत राहून सावध भुमिका घेतली आहे. हा बंद आणि आमचा काही एक संबंध नाही. कोणी दुकाने चालु ठेवली तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. फक्त ज्यांना दुकाने चालु ठेवायची आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन दुकाने बिनधास्त चालु ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तोंडाला मास्क, हाताला सॉनिटायझर, सोशल डिस्टन्स आणि 7 वाजता प्रत्येकाचे दुकाने बंद होणे कोणत्याही परिस्थिती अपेक्षित आहे. अन्यथा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तर या व्यतिरिक्त दुकाने बंद करण्यासाठी कोणी कोणावर दबाव आणत असेल, दादागिरी करीत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे मत साहेबांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले. त्यामुळे अकोले शहर चालु ठेवण्यासाठी आता उद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात ज्याला दुकाने बंद ठेवायची असेल त्यांनी स्वयंस्फुर्तीने बंद ठेवल्यास हरकत नाही. तर ज्यांना सुरू ठेवायचे आहे. ते नि:शंक दुकाने चालु ठेऊ शकतात. त्यांना कोणी विरोध केला तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे प्रशासनाने कळविले आहे.
खरंतर अकोले बंद ठेवताना दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे तर दुसरीकडे शेतकरी, मजूर, कामगार, दुकानदार, छोटे व्यापारी यांचे जे काही हाल होत आहे. त्यांचा विचार कोणी करताना दिसत नाही. विशेष म्हणजे आज शेतकरी जो माल शेतात पिकवितो तो थेट बाजारात आणतो. त्यातून जे दोन रुपये मिळतात त्यावर त्यांच्या कुटुंबाची गुजरान चालते. त्यांचा कोणी विचार करणार आहे का? तर दुसरीकडे हजारो लोकांच्या हाताचे काम गेले आहे. त्यांना जो सध्या तोडका रोजगार मिळतो आहे. त्यांच्या पोटाचा विचार कोणी केला आहे का? चौकाचौकात जे टपरी धारक आहेत, त्याचे कुटुंब त्या टपरीवर चालते याची कोणाला चिंता नाही. जे लोक मजूर म्हणून कामे करतात ती गरीबी कोणी अनुभविली आहे का? त्यामुळे, त्यांच्या घरी कोणी किराणा नेऊन देण्याची तसदी घेत नाही. मात्र, जे धनदांडगे आहेत, ज्याचे रोजचे व्यवसाय नाही, जे बडेबडे कमाई करतात, जे पांढरे कपडे घालुन पुढारपणा करतात त्यांनी गरिबीचे चटके आणि व्याजदर काय माहिती.? एक विशेष बाब म्हणजे शहरात अनेक भलेभले लोक सावकारीचा धंदा करतात, ते एक दिवसाचे तरी व्याज कमी घेतील का? किंवा जे लोक 10 हजार रुपये गाळ्याचे भाडे भरतात ते गाळामालक सात दिवसांचे भाडे कमी करणार आहेत का? यासाठी कोणी आवाज उठविताना दिसत नाही. त्यामुळे, आता हे बंद आणि चालुचे रडगाणे बंद केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हा भारत पुन्हा नव्याने उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेजारी संगमनेर तालुुक्यात दिड हजार रुग्न मिळून आले आहेत. तर 32 जण मयत झाले आहेत तरी देखील येेथे संगमनेर बंदचा आवाज देखील कोणी देताना दिसून येत नाही. त्या तुलनेत तर अकोले शहर फार सुरक्षित आहे. ती सुरक्षा अधिक ठेवण्यासाठी मुख्याधिकारी जरी नवे असले तरी तालुक्याचे तहसिलदार कांबळे साहेब सक्षम आहेत. त्यामुळे, अकोले बंद करणे हा आता पर्याय राहिला नाही अशा प्रतिक्रीया सजग नागरिक व व्यावसायिकांनी दिल्या आहेत. त्यामुळे, आमदार आणि प्रशासन यांच्या मतानुसार अकोले सुरू राहण्यास हरकत नाही. अशा प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे अकोले शहर उद्या स्वयंप्रेरणेने सुरू राहणार आहे.!
चालु ठेवा मात्र, नियम पाळा.!
अकोले बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. जनता कर्फ्युला आमचा विरोध नाही. मात्र, ज्याला चालु ठेवायचे त्याने चालु ठेवावे, ज्याला बंद ठेवायचे तो बंद ठेऊ शकतो. कारण, कोरोनामुळे कोणाची उपासमारी होता काम नये. मात्र, बाजारपेठा चालु ठेवताना शासकीय नियमांचे पालन नक्की करावे. यात कोणी राजकारण करु नये.
- आ. डॉ. किरण लहामटे (विधानसभा सदस्य)
----------------------------
शहर शासकीय दृष्ट्या सुरूच राहील...
ज्याला दुकाने चालु ठेवायची आहे, तो दुकाने चालु ठेऊ शकतो. फक्त जिल्हाधिकार्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे अपेक्षीत आहे. तर आमच्या नाावाने जो कोणी धमकी देत असेल त्यांची नावे आम्हाला कळविली तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. या पुर्वी नगरपंचायतीने सात वाजल्याच्या नंतर एक सर्वे केला होता. त्यात काही दुकाने उघडी मिळून आली होती. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्या कारवाईचा आणि या बंदचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे, शहर बंद की चालु ठेवायचे असा शासकीय आदेश नाही. त्यामुळे, शहर शासकीय दृष्ट्या सुरू राहणार आहे.
- मुकेश कांबळे (अकोले तहसिलदार)
--------------------------
बंद हा पर्याय नाही.!
अकोले शहर बदं ठेवणे हा योग्य पर्याय नाही. ज्यानेत्याने स्वत: काळजी घेऊन आपापले काम सुरू ठेवले पाहिजे. आपण बंद पाळून छोट्या व्यावसायिकांना वेठीस धरु शकत नाही. तर गोरगरिब लोकांचा देखील आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे. अकोले बंद करण्यापेक्षा सुरक्षेचे मार्ग शोधून बाजारपेठा सुरळी कशा होती. याचा विचार केला पाहिजे.
- भानुदास तिकांडे (राष्ट्रावादी, तालुका अध्यक्ष)
------------------------------------
दुकाने चालु ठेवावे आवाहन...
अकोले बंद करुन हे धनदांडगे लोक काय साध्य करणार आहे? उलट गेल्या सात महिन्यात जे खचलेले व्यावसायिक आहेत. त्यांना बळ दिले पाहिजे. मात्र, येथे उलटाच फंडा दिसून येत आहे. आज गाळ्यांचे भाडे कोणी थांबवत नाही, लाखो रुपयांचा माल उचलला आहे, त्यासाठी कंपनी थांबत नाही, दुकानात जे कामगार आहेत. त्यांचे पगार थांबत नाही. आणि यापुर्वी शहर बंद करुन देखील कोरोना थांबला नाही. त्यामुळे, हा बंदचा घाट कशासाठी घातला आहे? जे लोक स्थानिक आणि प्रस्तापित आहेत किंवा भांडवल गुंतविलेले नाही. त्यांना बंदचे काय वाटणार नाही. मात्र, सामान्य दुकानदारांना त्याचा किती फटका बसतो हे यांना काय माहित. त्यामुळे, अकोले हे प्रशासकीय बंद नाही. तो असता तर आपण सर्वांनी पाळला असता. मात्र, कोणीतरी एकत्र येऊन अचानक निर्णय घेणार आणि शहर बंद ठेवणार हे कोणालाच मान्य नाही. त्यामुळे, सर्वांनी दुकाने चालु ठेवावे असे माझे आवाहन आहे.
- विशाल देशमुख (व्यापारी)
---------------------------------
आमचा काही संबंध नाही.!
उद्याचा बंद आणि पोलीस प्रशासन यांचा काही एक संबंध नाही. मात्र, जो कायद्याच्या चौकटीबाहेर असेल, कोणी मास्क लावले नसेल अशा व्यक्तींवर यापुर्वी कारवाई केली आहे. व यानंतर देखील कारवाई केली जाईल. मात्र, हा बंद स्थानिकांच्या स्वयंप्रेरणेचा आहे. त्यामुळे, आम्ही कोणाला दुकाने चालु करा किंवा बंद करा असे म्हणू शकत नाही.
- आरविंद जोंधळे (पोलीस निरीक्षक अकोले)
* काय करावे?
*तोंडाला मास्क लावा
*शक्यतो बाहेर पडणे टाळा
*गर्दीची ठिकाणे टाळा
*सॅनिटायझरचा वापर करा
*दोघांत योग्य अंतर ठेवा
*बोलताना,शिंकताना काळजी घ्या
*लहान वृद्धांना सांभाळा
*प्रशासनाचे नियम पाळा
*बाधित व्यक्तींना धिर द्या
* संरक्षण म्हणून काय कराला
*शक्यतो कोमट पाणी प्या
*शंका वाटल्यास वाफ घ्या
*सकस आहार कायम ठेवा
*काढा पिण्याची सवय ठेवा
*खाण्यात थंड पदार्थ टाळा
*डॉक्टरांशी बोलून निरसन करा
*वारंवार आपले हात धूवा
- सागर शिंदे
टिप :- राजकीय जाहिराती किंवा पेडन्युज स्विकारल्या जात नाहीत.!
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------