अकोले तालुक्यात २७ रुग्णांची भर.! राजूरमध्ये १८ रुग्ण.! काल संगमनेरात ८० रुग्ण.!
सार्वभौम (राजूर) :- अकोले तालुक्यात कोरोने आजही थैमान घातले. आज अकोल्यातील राजूर येथे 66 संशयित रुग्णांची तपासणी केली होती. त्यात राजुरमध्ये 18 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तेव्हा आता तरी राजुरकरांनी बेफिकीर राहून चालणार नाही. आपली काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, अकोले तालुक्याची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. आता राजूर मध्ये एकूण रुग्ण संख्या 22 झाली आहे ..! राजूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रॉपीड अँन्टीजन टेस्ट अहवालात 18 जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.
त्यात एकट्या राजूरमध्ये 69 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 17 पुरुष, 21 वर्षीय तरुणी,25 वर्षीय तरुणी, 33 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय तरुणी, 22 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगा, दोन 5 वर्षीय मुले, 12 वर्षीय मुलगी अशा एकूण 18 जणांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय राजूर येथील डॉ. दिघे यांनी दिली. तरीही राजूर मध्ये अजूनही सोशल डिस्टस ठेवला जात नाही, आता खऱ्या अर्थाने राजूर येथे कोरोना पेशन्ट निघण्यास सुरुवात झाली आहे. राजूर मध्ये 5 सप्टेंबर पासून 5 दिवस जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. इथून पुढे राजूर गाव पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सोडता सर्व दुकाने बंद राहतील. राजूर करानो सावधान काळजी घ्या ...!विनाकारण बाहेर फिरू नका...!घरी रहा... सुरक्षित रहा..! असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तर कोतुळ येथे ४० वर्षीय महिला, वाशेरे येथे ४० वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ५५ वर्षीय महिला, अकोले येथे ३९ वर्षीय पुरुष, पिंपळवंडी येथे २६ वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथे ३० वर्षीय महिला, तर १५ वर्षाचा मुलगा चास येथे ८० वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे ४२ वर्षीय पुरुष अशा आज २७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
तर काल रात्री 80 रुग्णांची भर पडली आहे. संगमनेर शहरात दोन तर माळीवाडा येथे 45 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय तरुणी तसेच 21 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 47 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे 50 वर्षीय महिला तर 50 वर्षीय पुरूष, रायते येथे 40 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला, अवघ्या 6 वर्षीय बालिका, 45 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुणी, तर 38 वर्षीय महिला, घुलेवाडीत 43 वर्षीय महिला, चिखली येथे 70 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 41 वर्षीय पुरूष, वाडेकर गल्लीत 27 वर्षीय तरुण, गणेशनगर येथे 75 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 57 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय तरुणी, वाघापूर येथे 59 वर्षीय पुरुष 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 10 वर्षाचा बालक, साई श्रद्धा चौकात 60 वर्षीय पुरूष व 42 वर्षीय पुरूष, बाजारपेठेत 31 वर्षीय तरुण, शिवाजीनगर येथे 36 वर्षीय तरुण, गणेशनगर येथे 65 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 10 वर्षीची बालिका व 50 वर्षाचा पुरुष, मालदाड रोड येथे 32 वर्षीय तरुणी, 24 वर्षीय तरुण, नऊ वर्षाची बालिका, समनापुर येथे 39 वर्षीय पुरूष, मंगळापूर येथे 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी व 14 वर्षाचे बालक, वाघापूर येेथे 10 वर्षीय बालक व 20 वर्षीय तरुणी, निमोण येथे 90 वर्षीय महिला, 30 वर्षीय तरुणी, ढोलेवाडी येथे 38 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 58 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय तरुणी, माळीवाडा येथे 18 वर्षीय तरूण, साई श्रद्धा चौकात 44 वर्षीय पुरूष व 59 वर्षीय पुरूष, बोरबन येथे अवघ्या नऊ वर्षाचे बालक, कुरकुटवाडीत 48 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 25 वर्षीय तरुण, माळवाडी येथे 74 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, 52 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुण तर अवघ्या एक वर्षाचा चिमुरडा बालक आणि तीन वर्षाची बालिका अशा नऊ जणांना कोरोनाची बाधा झाला आहे. तर कुरकुटवाडी येथे 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, 26 व 28 वर्षीय तरुण, कोठे बु येथे येथील 80 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, 17 वर्षीय बालिका व 40 वर्षीय पुरुष, माळेगाव पठार येथे 60 वृद्ध माहिला, 21 वर्षीय तरुणी, मनोली येथे 70 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय बालक, 35 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, कोल्हेवाडीत 37 व 41 वर्षीय पुरुष असे काल एकाच दिवशी 80 रुग्ण संगमनेरात मिळून आले आहेत. त्यामुळे, आज कोरोनाची ढगफुटीप्रमाणे बारीश झाल्याचे पहायला मिळाले आहे. तर आजच जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे की, जास्तीत जास्त रुग्ण शोधा, प्रशासनाने त्यांच्यापर्यंत जा. कारण, जोवर रुग्ण टिकूण आहेत. तोवर कोविड टिकून आहे. त्यामुळे आता तपासणीचे प्रमाण वाढल्यामुळे बाधितांची संख्या देखील वाढणार आहे. आता संगमनेरात कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 895 इतकी झाली आहे.
- आकाश देशमुख