रुग्णांपर्यंत पोहचण्याचे आदेश.! संगमनेरात संख्या 80 ने वाढली तर अकोल्यात राजुरसह 11 रुग्णांची भर.!

सार्वभौम (अकोले/ संगमनेर) :- 

                      अकोले तालुक्यात आज कोरोनाचे सहावे शतक पुर्ण झाले आहे. तर संगमनेरात अकोल्याच्या तुलनेत तीन पट कोरोने रुग्ण आहेत. कारण, येथे कालच कोरोनाचे 18 वे शतक पुर्ण झाले असून 19 वे शतक एकाच दिवशी पुर्ण होत आले आहे. तर आज पुन्हा 80 रुग्ण मिळून आले आहेत. संगमनेरात कोरोनाचा प्रदुर्भाव कमी होता होत नाही. मात्र, तरी देखील गेल्या काही दिवसांपासून येथील आकडे कमी होताना दिसत होती. आज तर उच्चांकच गाठला आहे. मात्र, दोन्ही तालुक्यात लहान मुली व वृद्ध व्यक्ती यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रमाण वाढले आहे. तर आजवर मयत झालेल्या व्यक्ती वृद्धच असून अन्य व्यक्तींना बाधा झाली तरी ते बरे होतात ही प्रत्येकासाठी चांगली आहे. आता अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या 605 इतकी झाली असून आजवर 512 रुग्णांवर उपचार सुरू आहे तर 11 जणांचा आजवर मृत्यु झाला आहे. 

आता अकोल्यात वाशेरे येथे 48 वर्षीय पुरूष, तर अकोले शहरात शाहु नगर येथे 41 वर्षीय पुरूष, राजूर येथे 61 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरुणी, 57 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, विठा येथे दोन 21 वर्षीय तरुणी, तर अवघ्या 10 वर्षीय बालक, चिंचावणे येथे 60 वर्षीय महिला, टाहकारी येथे 26 वर्षीय तरुण अशा 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 

 

                          संगमनेर शहरात दोन तर माळीवाडा येथे 45 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय तरुणी तसेच 21 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 47 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे 50 वर्षीय महिला तर 50 वर्षीय पुरूष, रायते येथे 40 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला, अवघ्या 6 वर्षीय बालिका, 45 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुणी, तर 38 वर्षीय महिला, घुलेवाडीत 43 वर्षीय महिला, चिखली येथे 70 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 41 वर्षीय पुरूष, वाडेकर गल्लीत 27 वर्षीय तरुण, गणेशनगर येथे 75 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 57 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय तरुणी, वाघापूर येथे 59 वर्षीय पुरुष 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 10 वर्षाचा बालक, साई श्रद्धा चौकात 60 वर्षीय पुरूष व 42 वर्षीय पुरूष, बाजारपेठेत 31 वर्षीय तरुण, शिवाजीनगर येथे 36 वर्षीय तरुण, गणेशनगर येथे 65 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 10 वर्षीची बालिका व 50 वर्षाचा पुरुष, मालदाड रोड येथे 32 वर्षीय तरुणी, 24 वर्षीय तरुण, नऊ वर्षाची बालिका, समनापुर येथे 39 वर्षीय पुरूष, मंगळापूर येथे 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी व 14 वर्षाचे बालक, वाघापूर येेथे 10 वर्षीय बालक व 20 वर्षीय तरुणी, निमोण येथे 90 वर्षीय महिला, 30 वर्षीय तरुणी, ढोलेवाडी येथे 38 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 58 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय तरुणी, माळीवाडा येथे 18 वर्षीय तरूण, साई श्रद्धा चौकात 44 वर्षीय पुरूष व 59 वर्षीय पुरूष,  बोरबन येथे अवघ्या नऊ वर्षाचे बालक, कुरकुटवाडीत 48 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 25 वर्षीय तरुण, माळवाडी येथे 74 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, 52 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुण तर अवघ्या एक वर्षाचा चिमुरडा बालक आणि तीन वर्षाची बालिका अशा नऊ जणांना कोरोनाची बाधा झाला आहे. तर कुरकुटवाडी येथे 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, 26 व 28 वर्षीय तरुण, कोठे बु येथे येथील 80 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, 17 वर्षीय बालिका व 40 वर्षीय पुरुष, माळेगाव पठार येथे 60 वृद्ध माहिला, 21 वर्षीय तरुणी, मनोली येथे 70 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय बालक, 35 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, कोल्हेवाडीत 37 व 41 वर्षीय पुरुष असे आज एकाच दिवशी 80 रुग्ण संगमनेरात मिळून आले आहेत. त्यामुळे, आज कोरोनाची ढगफुटीप्रमाणे बारीश झाल्याचे पहायला मिळाले आहे. तर आजच जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे की, जास्तीत जास्त रुग्ण शोधा, प्रशासनाने त्यांच्यापर्यंत जा. कारण, जोवर रुग्ण टिकूण आहेत. तोवर कोविड टिकून आहे. त्यामुळे आता तपासणीचे प्रमाण वाढल्यामुळे बाधितांची संख्या देखील वाढणार आहे. आता संगमनेरात कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 895 इतकी झाली आहे.

 रुग्णांपर्यंत पोहोचावे - जिल्हाधिकारी

तर अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना  व जनतेला एक अवाहन केले आहे. की, मिशन बिगिन अगेन अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध बाबींना जिल्ह्यात परवानगी दिली आहे. मात्र, त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यामुळेच प्रत्येक तालुक्यात अधिकाधिक चाचण्या घेऊन रुग्णांपर्यंत पोहोचावे आणि संसर्गाची साखळी तुटावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्याच बरोबर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क आवश्य लावा. आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.