संगमनेरात 49 रुग्ण तर अकोल्यात 22 रूग्णांची भर!


    सार्वभौम (संगमनेर) :-

                     संगमनेर तालुक्यात कारोनाचे 2 हजार 516 रुण मिळून आले आहेत. त्यात आज 49 रुग्णांची बेरीज आहे. त्यात शहरात 818 रुग्ण मिळून आले आहेत. तर 1 हजार 649 रुग्ण ग्रामीण भागात मिळून आले आहेत. त्यात आज पुन्हा 49 रुग्ण मिळून आले आहेत. त्यत संगमनेरात 818 रुग्णांपैकी 771 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 35 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 12 जणांचा मृत्यु झाला आहे. तर संगमनेर तालुक्यात मृत्युदर 1.30 असून बरे होण्याची टक्केवारी 89.54 इतके आहे. तर तालुक्यात 2 हजार 467 संख्या असून त्यापैकी 2 हजार 209 रुग्ण बरे झालेले आहेत. तर 226 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आजवर 32 जणांचा तालुक्यात मृत्यू झाला आहेत. आजवर शहरात घुलेवाडीत 107 रग्ण असून तालुक्यातील गुंजाळवाडीत 107 रुग्ण मिळून आले आहेत. ग्रामीण भागात निमोण येथे 91 रुग्ण तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संगमनेर तालुक्यात जसे कोविडचे संकट सुरू झाले आहे. तेव्हापासून आजवर 8 हजार 603 रुग्णांचे स्वॅब तपासले आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयात 3 हजार 451 तर रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये 3 हजार 451 तसेच खाजगी लॅबमध्ये 1 हजार 446 रुग्णांनी तपासणी केली आहे. यातील पॉझिटीव्ह रेट 28.67 टक्के इतका आहे.

                  आज संगमनेर तालुक्यात 49 रुग्ण मिळून आले आहेत. घुलेवाडीत 26 वर्षीय तरुणी, मेनरोड संगमनेर येथे 75 वर्षीय महिला, मनोली येथे 58 वर्षीय पुरुष, घारगाव येथे 67 वर्षीय पुरुष, पिंपळे येथे 55 वर्षीय पुरुष, मोमिनपुरा येथे 40 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 34 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 18 वर्षीय मुलगा, वडगाव पान येथे 32 वर्षीय महिल, निमगाव टेंभी येथे 60 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 56 व 55 वर्षीय पुरुष, आभंग मळा येथे 38 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे 50 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 59 वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येते 53 वर्षीय पुरुष, कसारा दुमालात 42 वर्षीय पुरुष, विद्यानगर 55 वर्षीय महिला, घुलेवाडीत 71 वर्षीय पुरुष, वनकुटे येथे 42 वर्षीय महिला, मिर्झापूर येथे 10 वर्षीय बालक, पेमगिरीत 6 वर्षीय बालिका व 33 वर्षीय महिला, वडगाव पान येथे 53 वर्षीय पुरुष, देव कौठे येेथे 70 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालक, आश्वी बु येथे 18 वर्षीय तरूणी व 45 व 65 वर्षीय महिला, मनोली येथे 52 व 55 वर्षीय पुरुष, ओझर खुद; येथे 55 वर्षीय पुरुष,  75 वर्षीय महिला, जोर्वे येथे 35 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 46 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 13 वर्षीय बालिका व 41 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी 20 वर्षीय तरुण व 10 वर्षीय बालक, जानकी नगर येथे 65 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 26 वर्षीय तरुण, समनापूर येथे 55 वर्षीय पुरुष, साकूर येथे 65 वर्षीय महिला, मालुजे 32 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, निमोण येथे 55 वर्षीय पुरुष, आंबी दुमाला येथे 50 वर्षीय पुरुष असे 49 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.     

दरम्यान संगमनेर तालुक्यातील कोरोना हद्दपार करायचा असेल तर त्यासाठी तपासण्या होणे अपेक्षीत आहे. त्याप्रमाणे, प्रशासन जास्तीत जास्त तपासण्या करीत आहे. कधीकधी काही सामग्री कमी पडतात मात्र, तरी देखील पीएससी अंतर्गत होणार्‍या तपासण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, प्रशासन कोरोनाच्या संपर्कातील रुग्ण सापडतील तितका कोरोना तत्काळ येथून हद्दपार होईल. मात्र, कोरोनाच्या रुग्णांपेक्षा येथे तपासण्या किती होतात यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळेे, आता जिल्ह्यातील तालुक्यांमधून प्रशासन तपासण्या करण्यात सेट झाले आहे. फक्त जिल्हा प्रशासनाकडून त्यांना हवी ती साधन सामग्री पुरविणे गरजेचे आहे.                 
                   आज अकोले तालुक्यात 22 रिपोर्टमध्ये, गर्दणी येथे 75 वर्षीय पुरूष, माळीझाप येथे अवघ्या पाच वर्षीय बालिका, गणोरे येथे 30 वर्षीय पुरूष व अवघ्या 2 वर्षीय बालिका, राजूर येथे 67 वर्षीय पुरूष, मनोहरपूर येथे 54 वर्षीय पुरूष, महालक्ष्मी (शेकेईवाडी) येथे 54 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी रोड (अकोले) येथे 23 वर्षीय तरुण,   मन्याळे येथे 36 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय बालक, बेलापूर येथे 45 वर्षीय महिला, राजूर येथे 24 वर्षीय तरुणी, 41 वर्षीय पुरुष,  70 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 10 वर्षीय बालिका व 60 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 34 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 80 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 22 वर्षीय तरुण व गणोरे येथे 58 वर्षीय पुरुष अशा 14 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अकोले तालुक्यात कोरोनाची 991 झाली आहे.

                 अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून आलेल्या माहितीनुसार आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७६८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ४०७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४५ संगमनेर ०५, राहाता ०१, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१,नेवासा ०७, श्रीगोंदा ०४, अकोले ०१, राहुरी ०२, जामखेड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४०३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६३, संगमनेर १०, राहाता २३,पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ५४, श्रीरामपुर २१,  कॅंटोन्मेंट ०९, नेवासा १९,  श्रीगोंदा ०७, पारनेर २९, अकोले १३, राहुरी ३१,शेवगाव ०३,कोपरगाव ०७, जामखेड ०६ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच रॉपीड अँटीजेन चाचणीत आज ४०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १७, संगमनेर २९, राहाता ४१, पाथर्डी ३०, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर १८,  कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ६४, श्रीगोंदा २२, पारनेर १२, अकोले ०९, राहुरी ६६, शेवगाव २४, कोपरगाव २९, जामखेड १९ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ८४० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रा ५६, श्रीरामपूर ७८, कॅन्टोन्मेंट१४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७,  राहुरी ४२, शेवगाव ४६, कोपरगाव २१,जामखेड ३२, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या २८ हजार ५१२ असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ७६८ इतकी आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या ३३ हजार ८१३ पर्यंत जाऊन पोहचली आहे.

- सुशांत पावसे