संगमनेरात पावसासह कोरोनाचा थैमान.! अकोल्यात २१ रुग्णांची भर.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर व अकोले तालुक्यात पावसाने आज थैमान घातले आहे. अचानक झालेला पाऊस तालुक्याला झोडपून गेला. तर आज सायंकाळी पाऊस ओसरतो कोठे नाहीतर कोरोनाने दोन्ही तालुके झोडपून काढले. नेमके रोजरोज इतके रुग्ण येतात तरी कोठून या प्रश्नाचे उत्तर शोधणे फार गरजेचे आहे. कि लोक इतके निष्काळजीपणे वागत आहे. हे समजायला तयार नाही. कारण, पुर्वी एक रुग्ण मिळून आला तर त्याच्याभोवती किती भुंगा लागत होता. आता मात्र सहज कोणालाही कोरोना होतो आणि अवघ्या पाच सहा दिवसात तो बराही होतो. ज्याच्याकडे पैसे आहेत तो लाखो रुपये खर्च करतो तर जो गरिब आहे तो सरकारी कोविड सेंटरमध्ये जातो आणि निट होऊन घरी देखील येतो. त्यामुळे, लोकांचा कोरोनावर विश्वास राहिला नाही. आज अकोल्यात २१ तर संगमनेरातही १६ रुग्ण सापडले आहेत.
आज अकोले तालुक्यात पावसासह कोरोनाने थैमान घातल्याचे पहायला मिळाले आहे. आज बुधवार दि. 3 सप्टोंबर रोजी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात अकोले शहराच्या लगत माळेझाप येथे २६ वर्षीय महीला, कारखानारोड येथे ३४ वर्षीय महीला, १४ वर्षीय तरुणी, धुमाळवाडी येथे ५६ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, ५३ वर्षीय महीला,२५ वर्षीय तरुणी, १२ वर्षीय बालिका, कळस येथे ४० वर्षीय महीला, कुंभेफळ येथे ५६ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महीला, ४० वर्षीय महीला, विठा येथे ६० वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे ३० वर्षीय पुरूष, धामणगाव पाट येथे ३९ वर्षीय पुरूष, तर पळसुंदे येथे २९ वर्षीय तरुणी तर कोतुळ येथे ५९ वर्षीय पुरुष तसेच ब्राम्हणवाडा येथे ७० वर्षीय पुरुष अशा २१ जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत.
संगमनेरात शिवाजी नगर येथे ७८ वर्षीय महिला तर रंगारगल्ली येथे ९० वर्षीय महिला, शिवाजी नगर येथे ४८ वर्षीय महिला तर अवघ्या १ वर्षाची बालिका, गिरीराज नगर येथे ५९ वर्षीय पुरुष तर मंगलपूर येथे ६३ वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथे ७० वर्षीय महिला, शिवाजी नगर येथे ३१ व ३२ वर्षीय महिला, साकूर येथे ७५ वर्षीय पुरुष तर ६९ वर्षीय महिला, रहिमपूर येथे ५७ वर्षीय महिला तर वाघापूर येथे ४५ वर्षीय महिला तसेच संगमनेर खुर्द येथे अवघ्या ७ वर्षाची बालिका तर १६ वर्षीय तरुणी व ३८ वर्षीय महिला अशा १६ जणांचा सामावेश आहे.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधीत आढळून आलेल्या २५१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. त्यामध्ये, मनपा ११५, संगमनेर १२, राहाता २४, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ३२, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ०६, श्रीगोंदा ०२, पारनेर १२, अकोले ०३, राहुरी ०९, शेवगाव ०१, कोपरगांव ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर दरम्यान, आज ७७८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामध्ये, मनपा २९९, संगमनेर ९५, राहाता ४३, पाथर्डी ३९, नगर ग्रा.५३, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २३, श्रीगोंदा २४, पारनेर २६, अकोले १९, राहुरी १४, शेवगाव २७, कोपरगाव ४०, जामखेड ०७, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेली रुग्ण संख्या १९ हजार ९६१ झाली असून आत्तपर्यंत उपचार सुरू असलेली रूग्ण संख्या ३ हजार ४५ झाली असून ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या २३ हजार ३३६ पर्यंत जाऊन पोहचली आहे.