अकोले तालुक्यात तिघांना दांड्याने मारहाण, तिघांवर गुन्हे दाखल.!


सार्वभौम (गणोरे) :-

                    अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे इलेक्ट्रॉनिक मोटर चालु करण्याच्या कारणाहून दोन गटात हाणामार्‍या झाल्याची घटना मंगळवारी दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात विकास दशरथ चिकणे (वय 24, रा. डोगरगाव, ता. अकोले) यास तिघांना बेदम मारहाण केली आहे. त्यात तो जखमी झाला असून याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अलंकार रमेश चिकणे, सिद्धार्थ रमेश चिकणे व रमेश कचरु चिकणे (सर्व. रा. डोंगरगाव, ता. अकोले) यांना आरोपी करण्यात आले आहे.

याबाबात सविस्तर माहिती अशी की, विकास चिकणे हा त्यांच्या शेतात सर्वे नं. 98 व 5 मधील इलेक्ट्रॉनिक मोटर चालु करीत असताना आरोपी अलंकार रमेश चिकणे, सिद्धार्थ रमेश चिकणे व रमेश कचरु चिकणे हे तेथे आले व मोटर चालु केल्याच्या कारणाहून काठीने पाठीवर व डावे हातावर मारहाण केली. तसेच विकास चिकणे याचे वडील दशरथ चिकणे व भाऊ विशाल चिकणे हे हा वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील आरोपी यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली असे विकास याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर त्यानंतर तुम्ही येथे आलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. असे देखील नमुद केले आहेे. दरम्यान याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले करीत आहेत.

दरम्यान अकोले तालुक्यात जमीन व शेतीच्या कारणांहून वादांचे प्रमाण वाढत चालले आहे. अगदी किरकोळ कारणांहून गंभीर गुन्हे दाखल होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात गावपुढार्‍यांना कोठे तोटा नाही. त्यामुळे, त्यांनी किमाण किरकोळ वादावर मध्यस्ती करुन तरी हे वाद सोडविले पाहिजे. काही गावांमध्ये राजकीय स्टण्टम्हणून उलट दोन शेतकर्‍यांमध्ये वाद लावून देण्याचे प्रकार घडतात. मात्र, अकोले तालुक्यात गरिब शेतकरी बिचारा त्याला तरी कोणी राजकारणात आणू नका. त्याच्या शेतीचे प्रश्न मिटवा. पोलीस ठाणे, कोर्ट कचेर्‍या याच्या खेटा मारण्यात काही तत्थ्य नाही. उलट सामोपचाराने अशा गुन्ह्यांमध्ये मार्ग काढला पाहिजे असे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे.

 - सुशांत आरोटे