एका होमगार्ड पाण्यात बुडून मयत, एका पोलीस वाहून गेला.! खाकीवर पसरली शोककळा, अकोल्यातील एक दु:ख घटना.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात कोरोनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या राहुरी येथील गृहरक्षक दलाचा कर्मचारी प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, दुर्दैवाने त्यांना कट्टर पोहता येत असताना देखील बंधार्याच्या धारेत अडकून त्यांचा मृत्यु झाला आहे. गेली चार ते पाच तास निघून गेले तरी त्यांचा शोध लागत नव्हता. तर विठे येथील स्विमींगपट्टूंनी त्यांचा शोध लावून बॉडी प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे. ही घटना गुरूवार दि. 24 रोजी सायंकाळी उघड झाली. संदेश विटनोर (रा. राहुरी) असे या कर्मचार्याचे नाव आहे. तर पारनेर तालुक्यात मांडओहळ धरणाच्या रुईचोंढा धबधब्याजवळ काही पोलीस कर्मचारी पोहण्यासाठी गेले होते. त्यात गणेश दहिफळे या रेल्वे पोलीस वाहुन गेल्याची धक्कादायक घटना देखील याच दिवशी घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद होत्या त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी देखील बुडून मयत झाल्याचे असंख्य उदा. आहेत. मात्र, आता तर खाकी वर्दीतले कर्मचारी देखील पाण्याचे बळी ठरले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज होमगार्ड कर्मचा-यांना प्रचंड वाईट दिवस आलेले आहेत. शासन या लोकांना नोकरदार करतंय की बेरोजगार हेच कळेनासे झाले आहे. कारण जेव्हा पोलीस प्रशासनाला गरज पडते तेव्हाच होमगार्डचा वापर करून घेतला जातो. आज पोलीसबळ कमी असून अजूनही पूर्ण होमगार्ड कर्मचार्यांच्या हाताला काम नाही. एकीकडे सरकारने आरक्षणाच्या वादाचा प्रश्न ऐरणीवर असून देखील पोलीस भरतीचा घाट घातला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून होमगार्ड कर्मचार्यांना पोलीस दलात कायम करण्याचा प्रश्न हा सरकार काय हाती घ्यायला तयार नाही.
दुर्दैवाने एखादया पत्रावळीसारखी होमगार्डची अवस्था करून ठेवली आहे. आता एक घाणेरडा निर्णय शासनाने घेतला आणि बिनपगारी व फुल अधिकारी अशी अवस्था करून होमगार्ड कर्मचार्यांना स्वत:चे गाव सोडून दुसर्या तालुक्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त केले आहे. त्यामुळे या कर्मचार्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आता राहुरीचा हा कर्मचारी अकोल्यात नियुक्त केला. तो अंघोळीसाठी मित्रांसोबत नदीपात्रात गेला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी त्याच्या सोबतचे तिघे सुखरूप बाहेर पडले. मात्र हा कर्मचारी बाहेर आलाच नाही. तब्बल चार तास शोध घेऊन देखील तो मिळून आला नाही. त्यानंतर पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी विठे येथून उत्कृष्ठ पोहणारे तरूण आणले व त्यांनी आपले अथक प्रयत्न सुरू केले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह मिळून आला. परिणामी येथे सतिष नवले हे वगळता कोणी राजकीय किंवा सामाजिक व्यक्तींनी डोकून देखील पाहिले नाही.
तर दुसरीकडे पारनेर तालुक्यात मांडओहळ धरणाच्या रुईचोंढा धबधब्याजवळ चार पोलीस कर्मचारी पोहण्यासाठी गेले होते. एक पर्यटक म्हणून गेला असता ते पाण्यात उतरले. मात्र, त्यांना खोल पाण्याचा आंदाज आला नाही. या पात्रात मोठमोठी खळगी आहेत. त्यामुळे, गणेश दहिफळे हे जसे आत गेले आणि गर्त्यात सापडले तसे ते वर आलेच नाही. त्यांच्यासोबत असणारे तिघे बचावले. मात्र, दहिफळे हे कोठे व कसे वाहून गेले हे कोणालाच कळले नाही. ते रेल्वे खात्यात पोलीस म्हणून कार्यरत होते. या दोघ घटनांमुळे, खाकी वर्दीवर मोठे दु:ख कोसळले आहे.