अकोल्यात आज 36 रुग्ण, प्रशासनाला झापले नेत्यांनी व नेत्यांना झापले प्रशासनाने.! भाजपचा सभेवर फक्त काना डोळा.! संगमनेर तालुक्यात 73 जणांना कोरोनाची बाधा

 सार्वभौम (अकोले) :- 

                     अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे व प्रशासकीय अधिकारी मुकेश कांबळे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. त्यात अनेक पुढार्‍यांनी आपापली मते मांडली तर आजवर आपल्याला काय वाटते आहे? ते जोर लावून प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना प्रशासनाची दमछाक झाली खरी. मात्र, प्रशासनाने देखील नेत्यांसह तालुक्याचे काम उघडणी केली. कारण, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना देखील लोक अजिबात घाबरत नाहीत. प्रशासनाला झापले नेत्यांनी व नेत्यांना झापले प्रशासनाने. उठसुठ बाजार, भाजीपाला, गोळ्या, औषधे आणि रिकामे चोचले पुरविण्यासाठी येतात. तर बाजार करायचा असेल तर तो किमान एक महिन्याचा, पंधरा दिवसाचा किंवा आठ दिवसाचा तरी भरुन ठेवा. रोज लोक बाजाराला येतात. स्वत:ला कोरोना असो वा नसो. प्रत्येकाने मास्क लावलेच पाहिजे. मात्र, लोक किती बेजबाबदापणे वागताना दिसतात. गावा-गावांतील ग्रामपंचायती जरा देखील पैसे खर्च करण्याची मानसिकता दाखवितात नाही. याला काय म्हणायचे? असे म्हणात प्रशासनाने अनेक संदिग्ध प्रश्नांची उत्तरे दिली. तर तालुक्यातील अवैध व्यवसाय आाणि अनेक प्रश्नांवर लोक आक्रमक होताना दिसले. खरतर ही बैठक सर्वपक्षीय होती. मात्र, दुर्दैव असे की, या बैठकीला फक्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हजेरी लावली. तर साधे सीओ आणि अन्य नागरसेवक तसेच अन्य भाजपचे पदाधिकारी यांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे, एका आशा सेविकेने तर नगरपंचायतीचा बुरखाच फाडून सगळे वास्तव सगळ्यांसमोर मांडले. (याबाबत सविस्तर उद्या.)

                   


अकोले तालुक्यात आज कोरोनाचे 36 रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या एकूण 1 हजार 271 वर जाऊन पोहचली असून आजवर 1 हजार 64 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर आज अकोले शहरात 40 वर्षीय पुरूष, 32 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय पुरूष, निब्रळ येथे 35 वर्षीय महीला, 45 वर्षीय महीला,15 वर्षीय तरुणी कोतुळ येथे 62 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय महीला, 52 वर्षीय महीला, कुंभेफळ येथे 23 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महीला, 21 वर्षीय महीला, पिंपळगाव निपाणी येथे 8 वर्षीय पुरूष, 21 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महीला, सुगाव बु येथे 25 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय महीला, रुंभोडी येथे 60 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय तरुण, पिंपळगाव नाकविंदा येथे 43 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महीला, कातळापूर येथे 64 वर्षीय महीला, पाडोशी येथे 37 वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथे 70 वर्षीय पुरूष, गर्दणी येथे 45 वर्षीय महीला, नवलेवाडी येथे 48 वर्षीय महीला, इंदोरी येथे 14 वर्षीय तरुणी, निळवंडे येथे 32 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय तरूण, मेहदुंरी येथे 38 वर्षीय पुरूष, गणोरे येथे 45 वर्षीय महीला, 32 वर्षीय महीला, दिड वर्षाचा मुलगा, नवलेवाडी येथे 55 वर्षीय पुरूष, कळस येथे 50 वर्षीय पुरूष, राजुर येथे 48 वर्षीय पुरूष एकूण 36 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

दरम्यान, अकोले तालुक्यात पत्रकारांना देखील दोन बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मुकेश कांबळे व आ. डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे. त्यामुळे, पांडूरंग रायकर सारख्या पत्रकाराचा जसा उपचाराआभावी जीव गेला. तसे होऊ नये म्हणून रोखठोक सार्वभौमने फक्त पत्रकारीतेची अस्मिता असणार्‍या पत्रकारांसाठी मागणी केली. त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. असे सभेत सांगण्यात आले आहे. तर येणार्‍या काळात माजी आ. वैभव पिचड हे देखील 50 बेडची सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांनी देखील पत्रकारांचा विचार करावा. यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. 

तर संगमनेर तालुक्यात आज चिंचपूर येथे 20 वर्षीय तरुण, 40 व 65 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 40 वर्षीय पुरुष, प्रतापपूरात  51 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुष, चिखलीत 39 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथे 60 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुष, राजापुरात 43 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला 62 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथे 40 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथे 30 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे 33 वर्षीय पुरुष, सुकेवाडीत 47 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे 70 वर्षीय पुरुष, हांगेवाडीत 70 वर्षीय महिला, घुलेवाडीत 50 व 82 वर्षीय पुरुष, 73 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 68 वर्षीय पुरुष, जवळे कडलग 47 वर्षीय पुरुष, करूले येथे 26 वर्षीय पुरुष, आश्वी बु येथे 60 वर्षीय महिला, महात्मा फुले नगर येथे 62 वर्षीय महिला, निमगाव पागा येथे 42 वर्षीय महिला, मोती नगर येथे 32, 52 वर्षीय महिला, देवाकौठे येथे 38 वर्षीय पुरुष, मंगळापूरात 52 वर्षीय पुरुष, 87 वर्षीय महिला, जनता नगर 32 वर्षीय पुरुष, येथे 33 वर्षीय पुरुष, बस स्टॅण्ड समोर 63 व 60 वर्षीय पुरुष, चिखलीत 44 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 35 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कनकापूर येथष 43 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे 53 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 47 वर्षीय महिला, पालसखेडे येथे 61 वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे 34 वर्षीय महिला, गुंजाळवाडीत 46 वर्षीय पुरुष, साकूर येथे 38 वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथे 50 वर्षीय पुरुष, कनोलीत 65 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण, राजापुरात 18 वर्षीय तरुण, 6 वर्षीय बालिका, पंपिंग स्टेशन येथे 55 वर्षीय महिला, मलदाड रोड येथष 31 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 45 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय पुरुष, माळेवाडीत 70 वर्षीय पुरुष, संगमनेर खु 50, 60 वर्षीय महिला, 7 व 8 वर्षीय बालिका, नांदुरी दुमाला येथे 40 वर्षीय पुरुष, पळसखेडे येथे 12 वर्षीय मुलगी, 57 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला, निमोण येथे 23 वर्षीय तरुण, शेडगाव 26 वर्षीय तरुण, आश्वी बु 55 वर्षीय महिला अशा 73 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यात महसूल विभागातील पाच कर्मचार्‍यांना जनतेसाठी कोरोनाशी झुंजताना बाधा झाली आहे.