अकोल्यात आज 43 रुग्णांची भर.! नव्या गावांना कोरोनाची बाधा.!

सार्वभौम (अकोले) :-

                         अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते आहे. तर एकंदर एक गोष्ट लक्षात आली आहे की, गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेरात रोज 70 ते 100 रुग्ण मिळत होते. मात्र, त्या तुलनेत अकोल्यात संख्या फार कमी होती. आता मात्र येथे वेगळे चित्र पहायला मिळत आहे. येथे स्वॅबच्या तुलनेत सरासरी वाढताना दिसत आहे. तर रोजी अर्धशकतकाच्या जवळची आकडेवारी पहायला मिळत आहे. तसेही जीतके स्वॅब वाढतील तितकी चांगली गोष्ट आहे. करण, नंतर अशीच रुग्णसंख्या घटण्यास मदत होणार आहे.

तर आज अकोले तालुक्यात 43 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शिवाजी नगर अकोले येथे 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, नवलेवाडीत 57 व 32 वर्षीय महिला, 4 वर्षीय बालिका, चिरेबंदी वाडा येथे 50 वर्षीय महिला, निब्रळ 19 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय पुरुष,  80 वर्षीय महिला, तांभोळ येथे 30 वर्षीय पुरुष, बहिरवाडीत 40 वर्षीय महिला, कारखाना रोड येथे 45 वर्षीय पुरुष, टाहाकरी येथे 42 वर्षीय पुरुष, कुभेफळ येथे 40 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 50 वर्षीय महिला, कोतुळ 49 वर्षीय पुरूष, खुंटेवाडीत 60 वर्षीय पुरुष, पिंपळगाव नाकविंदा येथे 71 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला, काताळापूर येथे 47 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय तरुणी, 12 व 10 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय तरुष, 70 वर्षीय पुरुष, गुहिरे येथे 40 वर्षीय महिला, वारंघुशीत 28 वर्षीय पुरुष, देवीगल्ली (राजूर) 36 वर्षीय पुरुष, परखतपूर येथे 25 वर्षीय तरुण, राजूर येथे 40 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरूणी, 34 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 61 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालिका, 2 वर्षीय बालक, 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 43 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आजवर एकूण 1 हजार 314 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६०१ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, नगर ग्रामीण ०३, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०१, राहुरी ०१, कोपरगाव ०२ कर्जत ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा  रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा २२२, संगमनेर २४, राहाता ७६, पाथर्डी ५०, नगर ग्रा. ५४, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ८१, श्रीगोंदा ३२, पारनेर ३४, अकोले ४६, राहुरी ४३, शेवगाव ८४, कोपरगाव ३७, जामखेड २४, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ३५ हजार ६४४ इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ३ गजार ६०१ इतकी आहे. तर आजवर ६६२ मृत्यू  तर एकूण रूग्ण संख्या:३९ हजार ९०७ आहे.