प्रेयसिने लग्नास नकार दिल्याने त्याने तिच्या घरात जाऊन जाळून घेत तिला मिठी मारली. त्याचा अंत, ती जखमी.!
सार्वभौम (शिर्डी) :-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एकतर्फी प्रेमातून प्रेयसिने प्रेमास नकार दिल्यानंतर स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून स्वत:ची व प्रेमीकाची देखील हत्या करण्याचा प्रयत्न तरुणाने केला होता. त्या पाठोपाठ आता राहाता तालुक्यातील कनकुरी रोड येथे एका अजब प्रेमी पहायला मिळाला आहे. मुलीने लग्न करण्यास नका दिल्याने तो तिच्या घरी गेला आणि स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जळालेल्या अवस्थेत आपल्या प्रियसिला त्याने मिठी मारली. मी नाही तर तू देखील नाही. या हेतून स्वत:ला संपवून घेत मुलीस देखील संपविण्याचा प्रयत्न केला. यात मुलगी, तिचे वडील असे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सार्थक वसंत बनसोडे (रा. साकुरी. ता. राहाता) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काल शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी उपचार घेताना या तरूणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती तपासी अधिकारी मिथून घुगे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोक म्हणतात प्रेम अंधळं असतं, प्रेमात सर्व काही माफ असतं, प्रेमात आर नाहीतर पार, ती माझी नाही तर कोणाचीच नाही खरंतर अशा प्रेमवेड्यांच्या लवण्या हानल्या पाहिजे, असे प्रबोधनकार सांगतात. खंरतर हे कसले प्रेम जे जीव घेते, जीव घेते आणि बदनाम करते. हा एक निव्वळ मुर्खपणा आणि चुकीच्या सानिध्याचा परिणाम आहे. त्यामुळे, तरुणांना मार्गदर्शन आणि योग्य संगतगूण लाभणे गरजेचे आहे. कारण, गेल्या आठ दिवसात प्रेमास नकार देणे, लग्नास नकार देणे या कारणांहून अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील गुन्हा अगदी ताजा असताना अगदी शेजारील तालुक्यात असा प्रकार घडतो. हे किती मोठे दुर्दैव आहे. एकतर लॉकडाऊनमुळे अनेक लैला मजनु यांचे हाल झाले आहेत. त्यांना त्यांच्या प्रेमाचा विरह सहन होत नाही. त्यामुळे, करो या मरो अशा स्थितीत हे बहाद्दर थेट मुलींच्या घरात घुसू लागले आहेत. अर्थात एका हाताने टाळी वाजत नाही. मात्र, प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग नाही. असेच मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.
या प्रकरणात झाले असे की, गुरूवार दि. 17 रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास सार्थक हा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या प्रेयसिच्या घरी दुचाकीवर गेला होता. त्याने घरात जाऊन तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, हे प्रेमाचे वादळ घरी अशा पद्धतीने पोहचले की, तो एक प्रकारचा अतिरेक समोर उभा ठाकला होता. या तरुणीने त्यास सांगितले. तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. माझे तुझ्यावर प्रेम नाही. हा तमाशा घरात का उभा केला आहे. त्यामुळे, पुर्वतयारीत आलेल्या सार्थकने पेट्रोलचा ड्रम घेऊन तो स्वत:च्या अंगावर ओतून घेतला. काही क्षणात पेट्रोलने पेट घेतला असता त्याने आपल्या प्रेयसिला मिठी मारली. तर हा प्रकार मुलीच्या वडिलांनी पाहिला असता ते पुढेे झाले असता सार्थकने त्यांना देखील मिठी मारली. मी जगलो नाही तर तुम्हाला देखील जगू देणार नाही. असे म्हणत त्याने मुलीसह तिच्या वडिलांना देखील ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने हे दोघे त्याच्या तावडीतून सटकले. मात्र, हा तरुण या प्रकारात पुरता भाजून निघाला होता. त्यामुळे, काही जणांनी त्याला लागलेली आग विझवून तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. तर अन्य दोघांना देखील उपचारासाठी रुग्णालयात नेले. दरम्यान काल सकाळी सर्थकने अखेरचा श्वास घेतला आहे. मात्र, मरनोत्तर त्याच्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.