घ्या आता.! अकोल्यात आज 44 रुग्णांची भर.! मा. आ. पिचड यांचे सरकारवर ताशेरे.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज देखील कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. काल 54 रुग्णांच्या नंतर आज पुन्हा 44 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आज मात्र कोेरोनाने शहरात चांगलेच थौमान घातले आहे. अकोल्यात सगळी दुकाने बंद होती मग मटनाच्या दुकानदारांना बाधा झाली कशी? त्यामुळे, शहरात आता एकच खळबळ उडाली आहे. तर अकोले तालुक्यात जो कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. मात्र, यात प्रशासन अकोले तालुक्यात लक्ष घालत नाही. जर पालकमंत्री यांनी जिल्ह्याचा दौरा केला असता तर त्यांनी येथील परिस्थिती लक्षात आली असता. मात्र, प्रशासनात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकवाक्यता दिसत नाही. जिल्ह्यात तीन मंत्री आहे. त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्याची सुविधा पुरविली पाहिजे. अन्यथा त्यांना जसनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, हे मंत्री नेमकी कोठे फिरतात तेच लक्षात येत नाही. असे अनेक मुद्दे अजेंड्यावर घेऊन त्यांनी मंत्री महोदयांवर टिका केली.
दरम्यान आज अकोले तालुक्यात 44 रूग्णांची भर पडली आहे. त्यात अकोले शहरात 43 वर्षीय पुरुष, इंदोरीत 60 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, अकोलेत 58 वर्षीय महिला, विरगाव येथे 5 वर्षीय मुलगी, सुगाव बु येथे 45 वर्षीय महिला, निंब्रळ येथे 50 व 42 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथे 55 वर्षीय पुरुष, हॉटेल संजिवणी येथे 60 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनीत 3 वर्षीय बालिका, निब्रळ 65 वर्षीय पुरुष, बस्थानक अकोले परिसरात 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 18, 15, 13 वर्षीय मुली, 45, 40 व 35 वर्षीय महिला, तर पाच वर्षीय बालक, 42 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 24 वर्षीय तरुणी, 3 वर्षीय बालिका, 6 महिन्याची मुलगी, म्हाळदेवीत 29 वर्षीय पुरुष, राजूर येथे 21 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुणी, बोरी येथे 22 वर्षीय तरुणी, 36 वर्षीय महिला व 75 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, मोग्रस येथे 64 व 40 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 27, 18, 28 वर्षीय तरुण, 34 व 51 वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे 42 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय तरुणी, कोतुळ येथे 19 वर्षीय मुलगा अशा 44 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.