संगमनेरात आज अर्धशतक व अकोल्यात 45 रुग्णांची भर.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर तालुक्यात आज देखील कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. आज 50 रुग्णांसह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 638 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे आज कोेरोनाने शहरात आणि तालुक्यात चांगलीच दहशत घातल्याची दिसते आहे. तर अकोले तालुक्यात देखील आज शहरात कोरोनाचे 14 रुग्ण मिळून आले आहे. त्यामुळे शहरात मटनवाला, पोलीस कॉलनी आणि अन्य काही सरकारी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहे. खरंतर शहर सुरू असताना देखील येथे इतके रुग्ण कधी मिळून आले नाही, तितकी संख्या आता शहरात वाढलेली दिसत आहे. म्हणजे शहर सुरू करण्याचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे. तितके रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. 

दरम्यान आज अकोले तालुक्यात 45 रूग्णांची भर पडली आहे. तर खाजगी रुग्णालयातून एक रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात शनि मंदीर परिसरात 28 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह आले आहेत. तर पिंपळगाव निपाणी व धुमाळवाडी असे दोन रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.  अकोले तालुक्यात काही रॉपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात  अकोले तालुक्यात 45 रूग्णांची भर पडली आहे. त्यात अकोले शहरात 43 वर्षीय पुरुष, इंदोरीत 60 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, अकोलेत 58 वर्षीय महिला, विरगाव येथे 5 वर्षीय मुलगी, सुगाव बु येथे 45 वर्षीय महिला, निंब्रळ येथे 50 व 42 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथे 55 वर्षीय पुरुष, हॉटेल संजिवणी येथे 60 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनीत 3 वर्षीय बालिका, निब्रळ 65 वर्षीय पुरुष, बस्थानक अकोले परिसरात 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 18, 15, 13 वर्षीय मुली, 45, 40 व 35 वर्षीय महिला, तर पाच वर्षीय बालक, 42 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 24 वर्षीय तरुणी, 3 वर्षीय बालिका, 6 महिन्याची मुलगी, म्हाळदेवीत 29 वर्षीय पुरुष, राजूर येथे 21 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुणी, बोरी येथे 22 वर्षीय तरुणी, 36 वर्षीय महिला व 75 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, मोग्रस येथे 64 व 40 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 27, 18, 28 वर्षीय तरुण, 34 व 51 वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे 42 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय तरुणी, कोतुळ येथे 19 वर्षीय मुलगा अशा 44 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

तर संगमनेर तालुक्यात आज पुन्हा 50 रुग्णांची भर पडली आहे. त्यात रहिमपूर येथे 43 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 50 वर्षीय पुरुष, मंगळापूर यषथे 44 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत 27 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे 55 वर्षीय पुरुष, घारगावात 54 वर्षीय महिला, महात्मा फुलेनगर येथे 70 वर्षीय पुरुष, माळेगाव हवेली येथे 50 वर्षीय पुरुष, गणेश नगर येेथे 58 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत 50 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 54 वर्षीय पुरुष, पिंपळे येथे 70 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 56 वर्षीय पुरुष, मदिनानगर येथे 41 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 35 वर्षीय पुरुष, महात्मा फुले नगर येथे 63 वर्षीय महिला, कौठे बु येथे 43 वर्षीय महिला व 19 वर्षीय मुलगी, वनकुटे येथे 34 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, 16 व 10 वर्षीय मुली, 33 वर्षीय महिला, घारगावात 52 वर्षीय पुरुष, वनकुटे येथे 2 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय मुलगी, वेल्हाळे येथे 19 वर्षीय मुलगा, झोले येथे 85 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, घुलेवाडीत 48 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 22 वर्षीय तरुणी, 19 वर्षीय मुलगा, रंगार गल्लीत 35 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, पोखरी हवेलीत 32 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 52 वर्षीय पुरुष, पानोडीत 40 वर्षीय महिला, खळी येथे 50 वर्षीय पुरुष, निमगाव पागा येथे 34 व 62 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 61 वर्षीय पुरुष, लोहारे येथे 35 वर्षीय महिला, देवकौठे येथे 50 वर्षीय महिला, तळागाव दिघे येथे 50 वर्षीय महिला, वडगाव पान येथे 51 वर्षीय पुरुष, देवकौठे येथे 66 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 68 वर्षीय पुरुष, रायतेवाडीत 45 वर्षीय पुरुष अशा 50 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.