अकोल्यात कोरोना हजाराजवळ, राजूरमध्ये कोरोना, आठ दिवस कडेकोट बंद.! गणोरे पुन्हा बाधित.!
- सुशांत आरोटे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असल्याचे दिसून आले आहे. आज पुन्हा 14 रुग्णांची भर पडली आहे. त्यात नव्या गावांना कोरोनाची बाधा नसली तरी संपर्कातील बेजबादार पणामुळे त्याच-त्याच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात आकडेवारीत पुन्हा वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर आज राजुरमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळाला आहे. तर अकोले शहरात कोरोची संख्या नसली तरी काल मात्र, येथे बहुतांशी संख्या मिळून आली आहेत. त्यामुळे, त्यांच्या संपर्कातील संशयितांचा शोध सुरू आहे. तर आजपासून राजूर गाव हे येणारे आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहे. आजवर सामान्य मानसांमध्ये असणारा कोरोना आता ग्रामपंचायतीमध्ये घुसला आहे. त्यामुळे एक दक्षता म्हणून आठ दिवसांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज अकोले तालुक्यात 14 रिपोर्टमध्ये मन्याळे येथे 36 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय बालक, बेलापूर येथे 45 वर्षीय महिला, राजूर येथे 24 वर्षीय तरुणी, 41 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 10 वर्षीय बालिका व 60 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 34 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 80 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 22 वर्षीय तरुण व गणोरे येथे 58 वर्षीय पुरुष अशा 14 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अकोले तालुक्यात कोरोनाची 983 झाली आहे.
तर समशेरपूर येथे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हे गाव गुरुवार दि. 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 रोजी पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिली आहे. त्यांनी तशा प्रकारची नोटीत आणि जाहिर सुचना काढली आहे. त्यामुळे येथील कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. त्यामुळे, समशेरपूर बाजारपेठेत जे कोणी आजुबाजुच्या वाडी वस्ती व गावांतील लोक येणार असतील त्यांनी किमान आठ दिवस सहकार्य करावे असे असे आवाहन समशेरपूर ग्रामपंचायतीने केले आहे.
- आकाश देशमुख