अकोल्याचा पॉझिटीव्ह रुग्ण पळाला आणि तीन दिवस बेवारस पडला अखेर मयत झाला, 17 वा बळी, 34 रुग्णांची भर, संगमनेरात 82 रुग्ण.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात कोरोनाची परिस्थिती तशी फारशी धोक्याची नाही. मात्र, दुर्दैव असे की, देवाधर्माचे आणि निसर्गाची देण लाभलेल्या तालुक्यात कोरोनाचे योग्यवेळी उपचार होत नाही. म्हणून लोक मरण पावताना दिसून येत आहे. आज डॉ. अजित नवले आणि विनय सावंत यांनी एकत्र येऊन जी काही संकल्पना मांडली आहे. तिचा खरोखर गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण, येथे कोरोना बाधितांवर योग्य उपचार होत नाही, म्हणून स्थानिक डॉक्टर रूग्णाला संगमनेर येथे पाठवितात. परिनामी लोक घाबरुन जातात आणि हाय बीपी होऊन काही क्षणात अखेरचा श्वास घेतात. आता एक धक्कादायक प्रकार असा की, आज संगमनेर येथे एक 65 वर्षीय अजोबा कोरोनाने मयत झाले. मात्र, त्यांच्या मृत्युची पार्श्वभूमी ऐकली तर तुमच्या अंगावर काटा फुटेल. कारण, 8 सप्टेंबर रोजी विठ्याचे एक कुटुंब पॉझिटीव्ह मिळून आले होते. त्यात 65 वर्षाचे अजोबा देखील होते. आता वास्तवत: कोरोनावर कोणतेही औषध नाही. त्यामुळे स्थानिक डॉक्टर वरवर प्रत्येकाला तपासतात जे सोपस्कार करायचे ते करतात. रुग्ण झाला बरा तर ठिक अन्यथा संगमनेरला पाठवून द्यायचा. संगमनेर वाल्यांना त्यांची प्रकृती गंभीर वाटली तर ठिक नाहीतर रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवून द्यायचा. मग पुढे काय होते. हे सर्वांनाच माहित आहे. परंतु, ही सगळी पायपीट आणि हेळसांड होण्यापेक्षा अकोल्यातच एखादी सुसज्ज लॅब आणि कोविड सेंटर उभे झाले तर शेकडो लोकांचे जीव वाचतील हेच वास्तव आहे.
कारण, हे विठ्याचे अजोबा पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना अकोल्याच्या डॉक्टरांनी संगमनेरला हलविण्यास सांगितले. मात्र, हे अजोबा इतके भेदरले होते. की, त्यांनी उपचारापुर्वीच नातेवाईकांना चुकांडी मारुन पळ काढाला. त्यानंतर ते कोठे गेले याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर संगमनेरातील युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना या अज्ञात व्यक्तीबाबत माहिती मिळाली. हा वृद्ध व्यक्ती ना अन्न ना पाणी, ना निवारा अशा अवस्थेत संगमनेरच्या म्हाळुंगी पुलाच्या परिसरात पडलेला आढळून आला. त्यानंतर या समाजसेवकांनी कोणताही विचार न करता या कोविड बाधित व्यक्तीला उपचार घेण्यासाठी रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही समाजसेवकांनी पुढे होऊन आजोबास घुलेवाडी कोविड सेंटर येथे अॅडमिट केले. तेव्हा लक्षात आले की, ते कोरोना पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, तीन दिवस त्यांना योग्य उपचार मिळाला नाही. कारण, त्यांची भिती हीच त्यांना मृत्युपर्यंत घेऊन गेली. जेव्हा हरवलेले आजोबा सापडले असे त्यांच्या घरच्यांना सांगण्यात आले तेव्हा विठ्याहून एक गाडी संगमनेरकडे येत असताना वाटेतच त्यांना निरोप आला की, आजोबांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
ही झाली त्यांच्या मृत्युची कहाणी. मात्र, आता तरी अकोल्यातील लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नेते, पुढारी व कार्यकर्ते यांना जाग येणार आहे का? कारण, जर अकोल्यात चांगले उपचार असते ही पाट्या टाकू यंत्रणा नसती तर आज असे वृद्धच काय! तरुणांनी देखील इतका सहज जीव सोडला नसता. केवळ मरणाच्या भितीने पळालेला माणूस अन्नपाण्यावाचून मरतो! हे किती मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे, डॉ. अजित नवले, विनय सावंत यांच्यासह हातावर हात ठेऊन हा लढा उभा केला पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाचा गड राखताना येथील सामान्य नागरिक, कष्टकरी, मजूर व शेतकरी यांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे पाहिले होते. म्हणून हा किल्ला साबीत राहिला. आता येथे मानसे टपाटप मरु लागली आहेत. तरी देखील येथील पालकमंत्री तालुक्याला भेट द्यायला तयार नाही. जिल्हाधिकारी वेळोवेळी किट आणि साधन सामग्री द्यायला तयार नाही. लोक भितीने आयुष्य त्यागू लागले आहेत. आता यापेक्षा आणखी बिकट काय परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. कोणी बोलत नाही म्हणजे चलती का नाम गाडी. चाललय म्हणून चाललय अशीच अकोल्याची स्थिती करून ठेवली आहे. त्यामुळे, कोविड हा लढ एकोप्याने लढण्यासाठी सर्वांनी पुढे या हीच नम्र विनंती.
तर आज दि.मंगळवार दि. 15 रोजी अकोले तालुक्यात 26 जणांचे आहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात आज ग्रामीण रुग्णालय राजूर येथे रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये राजूर मधील पुन्हा एकूण 9 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. राजूर येथील 32 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 41 वर्षीय पुरुष असे एकूण 9 रूग्ण राजूर मध्ये आढळून आले आहेत. शेजारील गावामधील प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले आहे. त्यात मवेशी येथील 36 वर्षीय महिला तर पाडाळने येथील 29 वर्षीय महिला आणि विठा येथील 32 वर्षीय पुरुष अशी माहिती ग्रामीण रुग्णालय राजूर येथील डॉ. दिघे यांनी दिली. तर केळी ओतूर येथे 65 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 50 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 50 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 15 वर्षीय तरुणी, कसार गल्ली अकोले 80 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुण, नवलेवाडी येथे 26 वर्षीय तरूणी, अकोले शहरात 30 वर्षीय तरुण, 29 वर्षीय तरुण, समशेरपूर येथे 35 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, 69 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 53 वर्षीय तरुण अशा 26 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्याच्या संखेत मोठा वाढ झाली आहे. त्यात खाजगीतून आलेल्या अहवालात शाहुनगर येथे 35 वर्षीय माहिला, राजूर येथे 50 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, टाकळी येथे 34 वर्षीय महिला, आंबड येथे 44 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारी येथे 73 वर्षीय पुरुष, दोन 40 वर्षीय महिला अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर विठे येथील एक वृद्धाचा मृत्यु झाला आहे.
तर संगमनेर तालुक्यात आज दि.मंगळवार दि. 15 रोजी 82 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे येथील आकडा 2 हजार 467 इतका झाला आहे. तर आज शहरातील गणेशनगर येथे 40 वर्षीय महिला, आश्वी खु 31 वर्षीय महिला, शिबलापूर येथे 15 वर्षीय मुलगी, निमोण येथे 38 व 39 वर्षीय महिला, आठ वर्षाचा मुलगा, सोेनेवाडीत 52 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरूणी, पळसखेडे येथे 33 वर्षीय पुरुष, निमोण येथे 55 वर्षीय पुरुष, शिरापूर येथे 52 वर्षीय महिला, पेमगिरीत 68 वर्षीय पुरुष, धांदरफळ खु येथे 50 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय तरुणी व 9 वर्षीय मुलगी, सादतपूर येथे 18 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, आश्वी बु येथे 43 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 36 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे 62 वर्षीय पुरुष, अश्वी खु येथे 40 वर्षीय पुरुष, आंबी दुमाला येथे 60 वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे 70 वर्षीय महिला, घुलेवाडीत 25 वर्षीय तरुण, चंदनापूरीत 21 वर्षीय तरुण, संगमनेर येथे 49 वर्षीय पुरुष, खळी येथे 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, निळवंडे येथे 27 वर्षीय पुरुष, प्रतापपूर येथे 34 वर्षीय महिला, धांदरफळ खु 55 व 59 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरुणी, मुंजावाडीत 45 वर्षीय महिला, झोले येथे 29 वर्षीय पुरुष, साकूर येथे 60 व 40 वर्षीय पुरुष, 30 व 28 महिला, 3 वर्षीय बालक, 23 वर्षीय तरुणी, घुलेवाडीत 54 वर्षीय पुरुष, चिखलीत 23 वर्षीय तरुणी, 21 वर्षीय पुरुष, पाबळे वस्तीत 42 वर्षीय पुरुष, मालदाड रोड 5 9 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 43 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 47 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत 27 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक, डिग्रस येथे 28 वर्षीय तरुणी, मालदाड रोड येथे 34 वर्षीय पुरुष, सोनेवाडीत 63 वर्षीय पुरुष, झोले येथे 49 वर्षीय महिला, 26 वर्षीय तरुणी व 27 वर्षीय तरुण, सावरगाव तळे येथे 75 व 50 वर्षीय पुरुष, 70 व 45 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, कौठे खु येेथे 22 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीत 25 वर्षीय तरुण, स्वामी कॉलनीत 52 वर्षीय महिला, जानकी नगर येथे 60, 45 वर्षीय महिला, घुलेवाडीत 61, 50 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरुण हिवरगाव पावसा येथे 25 वर्षीय पुरुष, कुरण रोड येथे 40 वर्षीय महिला, गुंजाळवाडीत 46 व 65 वर्षीय महिला, 70 पुरूष, मालदाड रोड येथे 24 वर्षीय तरुणी, घुलेवाडीत 12 वर्षीय बालिका, गुंजाळवाडीत 42 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुणी अशा 82 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.