व्यापार्यांच्या खांद्याहून राष्ट्रवादीवर निशाणा.! अकोले पुन्हा 22 रुग्ण! राजूर, गणोरे, माळीझाप पुन्हा बाधित.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात कोरोनाचा पुन्हा नवे रुग्ण मिळून आले आहेत. आज दुपारी 14 रुग्णांची भर पडली होती. मात्र, आता पुन्हा आठ रुग्णांची भर पडली आहे. त्यात, नव्या गावांना कोरोनाची बाधा नसली तरी संपर्कातील बेजबादार पणामुळे त्याच-त्याच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात आकडेवारीत पुन्हा वाढ झाली असून आता ती संख्या 991 वर जाऊन पोहचली आहे. तर आज राजुरमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळाला आहे. दिवसभरात येथे 4 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर अकोले शहरात देखील कोरोचे दोन रुग्ण मिळून आले आहेत. आता अकोले शहर बंद असून त्या पाठोपाठ आजपासून राजूर गाव हे येणारे आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहे. तर त्यांच्या पाठोपाठ संमशेरपूर गाव देखील गुरूवारपासून आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसमितीने घेतला आहे.
तर अकोले तालुक्यात जो बंद पुकारण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे, तालुक्यातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दुकाने चालु ठेवण्याचे आवाहन केले होते. ते मात्र, हानून पडले आहे. हे असे असले तरी जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया बंद बाबत नकारात्मक येत आहे. इच्छा असून देखील सत्तेपुढे शहानपण चालत नाही. मोठ्यांनी बंद केल्यामुळे, छोट्या दुकानदारांवर दबाव आल्यामुळे हाताने रोष ओढून घेतल्यापेक्षा सात दिवस बंद ठेवलेले बरे. अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे, या लोकशाहीत प्रत्येकाला स्वतंत्र्य असले तरी मोठे मासे छोट्या माशांंना गिळून घेतात. हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. तर या व्यतिरिक्त डॉ. किरण लहामटे यांनी जे आवाहन केले होते. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील साथ दिल्याचे दिसले नाही. त्यामुळे, हे एक पद्धतीने राष्ट्रवादीचे अपयश असल्याची टिका भापच्या नेत्यांनी सार्वभौमकडे व्यक्त केली आहे. या निमित्ताने जो कोणी बेेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत की, या बंदला राजकीय किनार नाही, त्यांनी सज्जनतेचा बुरखा पांगरुन व्यापार्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अकोल्यातील राष्ट्रवादीच्या अस्तितावला गोळी मारली आहे. आता हे पडद्याआडचे राजकारण काहीही असले तरी डॉ. अजित नवले व विनय सावंत यांनी जे आवाहन केले आहे. त्यांना सर्वांना निष्पक्ष साथ दिली पाहिजे.
आज अकोले तालुक्यात 22 रिपोर्टमध्ये, गर्दणी येथे 75 वर्षीय पुरूष, माळीझाप येथे अवघ्या पाच वर्षीय बालिका, गणोरे येथे 30 वर्षीय पुरूष व अवघ्या 2 वर्षीय बालिका, राजूर येथे 67 वर्षीय पुरूष, मनोहरपूर येथे 54 वर्षीय पुरूष, महालक्ष्मी (शेकेईवाडी) येथे 54 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी रोड (अकोले) येथे 23 वर्षीय तरुण, मन्याळे येथे 36 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय बालक, बेलापूर येथे 45 वर्षीय महिला, राजूर येथे 24 वर्षीय तरुणी, 41 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 10 वर्षीय बालिका व 60 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 34 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 80 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 22 वर्षीय तरुण व गणोरे येथे 58 वर्षीय पुरुष अशा 14 जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अकोले तालुक्यात कोरोनाची 991 झाली आहे.
तर राजूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता लक्षात घेता आजपासून हे गाव पुर्ण बंद करण्यात आले आहे. येथे ग्रामपंचायत सदस्यास कोरोनाची बाधा झाली असून त्याच्या घरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे त्या कुटुंबात सर्वांना धिर देणे गरजेचे आहे. आजपासून आठ दिवस राजूर बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे, येथील बाधित होण्याचे प्रमाण आणि जी साखळी आहे ती तुटण्यास मदत होण्याची शक्यता आहे. तर राजूर बाजारपेठेत जे कोणी आजुबाजूचे लोक येतात त्यांनी आठ दिवसांसाठी सहकार्य करावे असे असे आवाहन राजुरकरांनी केले आहे. तर समशेरपूर येथे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हे गाव गुरुवार दि. 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2020 रोजी पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिली आहे. त्यांनी तशा प्रकारची जाहिर सुचना काढली आहे. त्यामुळे येथील कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. त्यामुळे, समशेरपूर बाजारपेठेत जे कोणी आजुबाजुच्या वाडी वस्ती व गावांतील लोक येणार असतील त्यांनी किमान आठ दिवस सहकार्य करावे असे असे आवाहन समशेरपूर ग्रामपंचायतीने केले आहे.