एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळ्या झाडल्या.! स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न.! त्याल बळ नेमकी कोणाचे?
सार्वभौम (अहमदनगर) :-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका वाळु तस्कराने त्याच्या प्रेयसिवर गोळ्या झाडल्याचा प्रकार आज मंगळवार दि. 15 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला. यात संबंधित तरुणीवर गोळा झाडल्यानंतर त्यांने स्वत:वर देखील गोळ्या चालवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडला तर तरुणीला गोळी चाटून गेल्यामुळे ती देखील जखमी झाली आहे. आता तरूणीवर उपचार सुरू असून या तरुणास त्याच्या मित्रांनी लोणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तप्रवाह वाहिल्यामुळे त्याची प्रकृती गंभीार असून तरूणीची प्रकृती स्थिर आहे. आज पहाटेच हे प्रकरण घडल्यामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. तर या तरुणाकडून पिस्तूल आला कोठून, याच्यात इतकी धमक आली कशी, या प्रेम प्रकरणाबाबत यापुर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावर त्यांनी कोणाती प्रतिबंधात्मक कारवाई केली, हा आरोपी पोलिसांच्या अतिषय निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. त्यामुळे, मलिद्यापोटी त्याला पाठीशी घालणार्या खाकीवर आता पोलीस अधिक्षक चौकशी करुन कारवाई करतील का? असे अनेक प्रश्न राहुरीच्या सजग नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवघ्या 30 वर्षाचा हा तरुण देवळाली प्रवरा परिसरात राहणार्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करीत होता. तिने त्याला परखडपणे सुचविले होते. माझ्यावर कौटुंबिक जाबाबदार्या आहेत. प्रेम वैगरे हे माझ्या कल्पनेच्या आणि संस्कृतीच्या पलिकडे आहे. त्यामुळे, मला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नको. मात्र, हा प्रेमवेडा ऐकेल तो मजणू कसला! त्याने गेल्या काही दिवसांपुर्वी या तरुणीबाबत फेसबुकवर काही इमेज टाकून मचकूर लिहीला होता. त्यामुळे, हा हकनाक बदनामी करीत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी अशी विनंती त्या पीडित कुटुंबाकडून करण्यात आली होती. मात्र, खाकीचे हात त्याच्या कॉलरपर्यंत पोहचू शकले नाही. कदाचित तेव्हाच कठोर भुमिका घेऊन कडक कारवाई झाली असती तर आज ना या तरुणाचा जीव धोक्यात असता ना या तरुणीला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले असते.
हा तरुण आज सकाळी आपल्या एका मित्राला घेऊन थेट संबाधित तरुणीच्या घरी गेला होता. घर जरा शेतात असल्यामुळे त्याने तिच्या बंगल्यात मागिल दाराने प्रवेश केला. ही तरुणी घरात झाडलोट करीत असताना त्याने तिला आपल्या प्रेमाची साद घातली. तू माझ्यावर प्रेम का करीत नाही? असे म्हणत तो व्यक्त झाला. मात्र, पालकत्वाचे छत्र हरपलेल्या व्यक्तीला कुटुंब महत्वाचे असते हे त्याला कोण समजून सांगणार. प्रेम अंधळं असत अशा अविर्भावात त्याने तिच्यावर प्रेमासाठी बळजबरी केली. माझे तुझ्यावर प्रेम वैगरे नाही नाही. माझ्या नादाला लागू नको. असे म्हणून तिने त्याला चालता हो! असे सुनावले. याच दरम्यान तेथे जखमी तरुणीची लहान बहिन आली. आपण जिच्यावर प्रेम करतो, तिच आपल्याला नकार देते हे त्याच्या मानसिकतेला सहन झाले नाही. त्यामुळे, त्याने कंबरेचा पिस्तूल काढून थेट तिच्यावर गोळी झाडली. ती गोळी तरुणीला चाटून गेली. त्यामुळे ती काही क्षणात जमिनिवर कोसळली. त्यानंतर स्वत: देखील जगण्यात अर्थ नाही अशी मानसिकता करीत त्याने स्वत:च्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी तो तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
दरम्यान गोळीचा आवाज झाल्यानंतर शेजारी असणारे लोक तरुणीच्या घराकडे आले. तर याच्या सोबत आलेल्या तरुणाने तेथून थेट पळ काढला. तो अद्याप मिळून आलेला नाही. तर जखमी तरुणीचे नातेवाईक एका मत्र्याकडे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात, त्यांना घरातल्या व्यक्तींनी संपर्क केला, त्यानंतर पुढील यंत्रणा हालली. तर या तरुणाला त्याच्याच ओळखीच्या तरुणांनी आणि स्थानिक व्यक्तींनी लोणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. आता या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींची पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी सखोल चौकशी केली तर या प्रकरणाचा जन्म कोठून झाला, त्याला पाटबळ कोणी दिले, त्याचे मूळ व्यवसाय काय होता. तो कोणत्या वर्दीसाठी काम करीत होता? त्याला पिस्तुल पुरविणारे कोण आहेत. ही सर्व माहिती समोर येऊ शकते. मात्र, एकमेकांना वाचविण्यासाठी झाकली मुठ सव्वा लाखाची अशी भूमिका घेतली तर यात पुढे काय होईल हे सर्वांना माहित आहे. मात्र, येथील कट्टा गँग, वाळुतस्कारी आणि रात्रीच्या लुटारू घटना ह्या कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणाचीच कसुन चौकशी होणे अपेक्षित आहे. अन्यथा येथे अवैध धंद्यावालेच अधिकार्यांच्या बोकांडी बसतात, कधी मारहाण, तर कधी अँन्टीकरप्शनचे ट्रॅप अशा विविध मार्गांचा अवलंब करुन दपशाही करतात. हे प्रकार थांबविण्यासाठी येथे विशेेष प्रकारचे कोंबिंग ऑपरेशन करणे आवश्यक आहे. अन्यथा हे प्रकार दिवसेंदिवस वाढत राहतील यात शंकाच नाही.
दरम्यान या गुन्ह्यानंतर राहुरीची गुन्हेगारी परंपरा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. येथे रस्तालुट, पोलीस व महसूल यांच्यावर प्राणघातक हल्ले आणि अकोले तालुक्यानंतर महिला अत्याचाराचे सार्वधिक गुन्हे राहुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आहे. गेल्या काही चार वर्षात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी 399 च्या गुन्ह्यांची उच्चतम पातळी पार केली आणि त्यामुळे राहुरी परिसरातील 395, 392 प्रकारचे गुन्हे कमी झाले. मात्र, गेल्या कित्तेक वर्षापासून येथील वाळुतस्करी कायम टिकून आहे. नेवाशात आण्णा लष्करे यांची हत्या झाल्यानंतर काही लोकांना धडे घेतले. मात्र, येथे हिंम्मत जाधव आणि अनेकांचे प्राण गेले तरी येथील गुन्हेगारीला शहानपण येईनासे झाले आहे. मात्र, याला खतपाणी कोण घालते आहे त्याचे मुळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय येथील गुप्त गुन्हेगारी थांबणार नाही. तर येथे परराज्यातून येणार्या गावठी कट्ट्यांची देखील आवक आता घोडेगाव, नेवासा व सोनईमार्ग सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी देखील पोलीस प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.