आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी अकोल्यात न आल्यास आत्मक्लेश करणार.! अकोल्यात पुन्हा 26 रुग्णांची भर.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   अकोले तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथे मिळणार्‍या मुलभूत सुविधा आणि संसाधणे हे अतिशय तुटपुंजे आहेत. त्यामुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून येथे नियोजन करणे व तुटवडा पडलेल्या वस्तुंचा तत्काळ पुरवठा करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास येत्या आठ दिवसात तालुक्यातील सामाजिक, राजकीय व चळवळीतील संघटना एकत्र येऊन आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबविला जाणार आहे. त्यामुळे, सध्या तरी तालुक्यातील दोन विचारवंतांनी कोविडशी लढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, त्यांना जनतेने व संस्था, दानशुर व्यक्ती आणि शक्य त्यांनी नक्कीच साथ देणे अपेक्षित आहे. तर आज अकोले तालुक्यात 26 रुग्ण मिळून आले आहेत. 

तर आज अकोले तालुक्यात 26 जणांचे आहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात आज ग्रामीण रुग्णालय राजूर येथे रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये राजूर मधील पुन्हा एकूण 9 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. राजूर येथील 32 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 41 वर्षीय पुरुष असे एकूण 9 रूग्ण राजूर मध्ये आढळून आले आहेत. शेजारील गावामधील प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले आहे. त्यात मवेशी येथील 36 वर्षीय महिला तर पाडाळने येथील 29 वर्षीय महिला आणि विठा येथील 32 वर्षीय पुरुष अशी माहिती ग्रामीण रुग्णालय राजूर येथील डॉ. दिघे यांनी दिली. तर केळी ओतूर येथे 65 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 50 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 50 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 15 वर्षीय तरुणी, कसार गल्ली अकोले 80 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुण, नवलेवाडी येथे 26 वर्षीय तरूणी, अकोले शहरात 30 वर्षीय तरुण, 29 वर्षीय तरुण, समशेरपूर येथे 35 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, 69 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 53 वर्षीय तरुण अशा 26 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत.


सामाजिक ऐकोप्याची गरज....

तालुक्यात वाढता प्रदुर्भाव लक्षात घेत येथील सहकारी संस्था, पतसंस्था, उद्योगपती यांनी सामाजिक बांधिलकी ठेवणे गरजेचे आहे. अर्थातच त्यांनी शक्यती मदत करणे अपेक्षीत आहे. येथे टेस्ट वेळेवर होत नाही, रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. सिम्टमॅटिक व्यक्तीवर येथे उपचार होत नाही. त्यासाठी संगमनेरवर आवलंबून रहावे लागते. त्यामुळे अकोले तालुक्यात एक मोठे कोविड सेंटर उभे करणे आवश्यक आहे.  येथील दानशुर व्यक्तींनी ज्या गोष्टी शक्य आहे. त्या देणे गरजेचे आहे. अकोल्यातील कोविड सेंटरची वाताहात झाली आहे. त्यामुळे, अकोल्यातील राजकीय मतभेद बाजुला ठेऊन सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, औद्यागिक व व्यावसायिक क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक योगदान आणि तालुक्याच्या सहभागातून उभे रहावे. यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मला खात्री आहे की, हे लोक पुढे येतील व तालुक्यात एका सामाजिक बांधिलकीतून कोविड सेंटर उभे राहिल.

- डॉ. अजित नवले (मार्कवादी कम्युनिष्ट पक्ष)

-------------------------------------------

आठ दिवसात अकोल्यात या...

आदिवासी भागातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोल्याचा दौरा करावा. हा कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी तातडीने बैठक घेऊन येथील यंत्रणेला जो काही वस्तुंचा तुटवडा आहे. तो पुर्ण करावा. ज्या काही तृटी आहेत त्याबाब सुचना करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता कसा येईल यासाठी उपायोजना कराव्यात. जर येणार्‍या आठ दिवसात जर समाधानकारक हलचाल दिसून आली नाही. तर तालुक्यातील सामाजिक, राजकीय व चळवळीतील संघटना एकत्र येऊन आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबविला जाईल. उपोषणाच्या माध्यमातून आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करु. मात्र, प्रशासनाने अशा कडूकाळ दिवतात अकोलकरांवर ती वेळ येऊ देऊ नये हीच विनंती आहे. आठ दिवसानंतर यावरील पुढील रुपरेषा ठरणार आहे. 

- विनय सावंत (राष्ट्रसेवा दल)

---------------------------------

- आकाश देशमुख.