दांडा डोक्यात मारला आणि तो मयत झाला.! दोघांवर गुन्हे दाखल.! हाताने आयुष्याची बरबादी.!
सार्वभौम (कोपरगाव) :-
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ तिघांमध्ये किरकोळ कारणाहून वाद झाले होते. मात्र, बोलता बोलता दोघीना एकाच्या डोक्यात दांडा मारला आणि त्याचा जीवच गेला. यात पुंजा भागाजी नरोटे (वय 60, रा. खडांगळी, ता. सिन्नर. जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दत्तात्रय किसन कोळपे (वय 45) व श्रावण कोंडाजी हलवर (वय 44, दोघे रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव. जि. अ.नगर) या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत पुंजा नरोटे हे कोपरगाव येथील कोळपेवाडी येथे गेले होते. तेव्हा त्यांचे आरोपी यांच्यासोबत वाद किरकोळ वाद झाले होते. वादाचे कारण पोलिसांना देखील अद्याप समजले नाही. मात्र, तरी देखील फिर्यादीनुसार नमुद करण्यात आले आहे की. त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी यांच्यात बाचाबाची झाली, दरम्यान आरोपी दत्तात्रय किसन कोळपे व श्रावण कोंडाजी हलवर यांनी पुंजाजी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली या दोघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर या दोन्ही आरोपींनी मयत यांच्या डोक्यात दांडा मारला असता ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर नरोटे बेशुद्द पडले असता त्यांना स्थानिक लोकांनी उपचारासाठी थेट लोणी शनिवार दि. 29 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दाखल केले होते. मात्र, त्यांच्या जिव्हरी टोला लागल्याने त्यांनी दोन दिवस मृत्युशी झुंज दिली मात्र ती अयशस्वी ठरली. त्यांनी रविवार दि. 30 रोजी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान हा प्रकार त्यांच्या मुलास माहित झाला होता. त्यामुळे, त्याने थेट पोलीस ठाणे गाठले व दत्तात्रय किसन कोळपे व श्रावण कोंडाजी हलवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस करीत आहे. तर वृद्ध व्यक्तींना मारहाण करणे, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे असे प्रकार आजकाल वाढू लागले आहे. यात एका गोष्ट तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे की, 60 नंतर प्रत्येकाचे शरिर क्षीण होत जाते तर प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे, मारामार्या झाल्या तरी कोणावर वार करताना विचार केला पाहिजे. एक घाव आणि आयुष्याचे दोन तुकडे असे अनेकदा झाल्याचे पहालया मिळते. कारण, माणूस कितीही वयस्कर असो तो मयत झाला की खुनाचा (302) गुन्हा दाखल होतो आणि हकनाक जेलची हावा खावी लागते. गेल्या महिन्यात अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात असाच एका प्रकार घडला होता. बाप दारु पिला म्हणून मुलाने एक झापड मारली आणि बाप मयत झाला. हकनाक मुलगा आत बसला आहे. त्यामुळे, असे प्रकार थांबण्यासाठी रागावर संयम ठेवला पाहिजेे.