संगमनेरात 42 रुग्ण एक मयत तर अकोल्यात नवे रुग्ण, संख्या 557 वर गेली.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

               अकोले तालुक्यात आज कोरोनाने अटोपता मार्ग अवलंबविल्याचे दिसून आले आहे. तर संगमनेरात मात्र, रोजचे पाढे तेच दिसून आले आहेत. उलट दोन्ही तालुक्यात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आले आहे की, गेल्या दहा दिवसात बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाप्पाच्या काळात लहान मुलांची पालकांनी काळजी घेतली नाही की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, एक गोष्ट आनंदाची आहे की, गणेश उत्सवात संगमनेर व अकोले तालुक्यात प्रशासनाचे नियोजन चांगले असल्याचे दिसून आले. त्यामुळे, कोरोनाची जितकी भिती वाटत होती आणि प्रादुर्भाव होण्याची शंका वाटत होती तितकी ती झाली नाही. अर्थातच हे प्रशासनाचे यश म्हणावे लागले. मात्र, तरी देखील संगमनेरातील माळीवाडी परिसरात राहणार्‍या एक 70 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यु झाला असून 43 रुग्णांची भर पडली आहे. तर अकोल्यात 6 रुग्ण मिळून आले आहेत. 

आज संगमनेर तालुक्यात कनोली येथे 60 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 33 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 38 वर्षीय महिला, माळीवाडा येथे 51 वर्षीय पुरुष, रहिमपुर येथे अवघ्या 4 व 2 वर्षीय बालक, 34 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 6 वर्षीय बालिका, ढोलेवाडी येथे 54 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथे 23 वर्षीय तरुणी, 6 वर्षीय बालक, 33 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 27 वर्षीय तरुण, 33 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुणी व 91 वर्षीय पुरुष, कुरकुटवाडी येथे 61 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 55 वर्षीय पुरुष, सायबन कॉलनीत 55 वर्षीय महिला व 58 वर्षीय पुरुष, कुंभारगल्लीत 30 वर्षीय पुरुष, घारगावात 61 वर्षीय पुरुष, मालेगाव पठार येथे 33 वर्षीय पुरुष, पिंपारणे येथे 24 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीत 67 वर्षीय पुरुष, धांदरफळ येथे 32 वर्षीय पुरुष, दाढ खुर्द येथे 53 वर्षीय पुरुष, वडगाव पान 43 वर्षीय पुरुष, गोंविंदनगर 36 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 52 वर्षीय व 37 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे 31 वर्षीय महिला, जाखुरीत 59 वर्षीय पुरुष, नायकवाडपुरा येथे 51 वर्षीय पुरुष, बाजारपेठेत 52 वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे 52 वर्षीय महिला अशा 42 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

तर अकोले तालुक्यात आज घेण्यात आलेल्या अँन्टीजन टेस्टमध्ये महालक्ष्मी कॉलणीत 37 वर्षीय पुरूष, कारखाना रोडवरील 60 वर्षीय पुरूष, 57 वर्षीय महीला, विठा येथे 40 वर्षीय पुरुष, अशा चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात कोतुळ येथील 32 वर्षीय महीला तर खाजगी प्रयोगशाळेतील आहवालात शहरातील सावरकर रोडवरील 26 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह असून आज तालुक्यात 06 व्यक्ती पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 557 वर गेली आहे. त्यापैकी 440 ठणठणीत झाले असून 11 व्यक्ती मयत झाल्या आहेत. तर आजवर 106 व्यक्तीवर उपचार सुरु आहेत..!

- सुशांत पावसे