अकोल्यात आज कोरोना डे.! 67 रुग्णांचा उच्चांक, अकोले बंद वादाच्या भोवर्‍यात.! संगमनेरात 25 रुग्णांची भर.!

सार्वभौम (संगमनेर/अकोले) :- 

                          संगमनेर तालुक्यात आज फक्त 25 रूग्ण बाधित मिळून आले आहेत. तर अकोले तालुक्यात जिल्हा रूग्णालयातील रिपोर्ट आणि आजचे रॅपीड अँन्टीजनचे रिपोट असे मिळून 68 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात आठशेचे दशक कोरोनाने पार केले असून बाधितांची संख्या 827 वर गेली आहे. सोमवार दि. 14 सप्टेंबर पासून ते रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी पर्यंत म्हणजे सात दिवस अकोले शहर आणि बाजारपेठा बंद राहणार आहे. त्यामुळे, तळागाळातून जे लोक बाजार करण्यासाठी तसेच काही अन्य खरेदी करण्यासाठी शहरात येणार असेल तर त्यांनी येऊ नये. असे आवाहन करण्यात आले आहे. तर यावेळी मेडिकल, दवाखाने चालु राहणार आहे. असे सोशल मीडियात फिरलेल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे.

                         

                       अकोल्यात आज पुन्हा 58 रुग्णांची भर पडली आहे. त्यात ब्राम्हणवाडा येथे 40 वर्षीय पुरुष, आंभोळ येथे 62 वर्षीय पुरुष, गर्दणी येथे 37 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूणी, 30 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालक, 10 वर्षीय मुलगी, 48 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरूणी, अकोले शहरात 62, 35 व 48 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय मुलगा, ढोकरी येथे 52 वर्षीय पुरुष, शेंडीत 46 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 45 वर्षीय महिला, देवठाण येथे 35 वर्षीय पुरुष, वरखडवाडी 64 वर्षीय महिला, कळस येथे 39 वर्षीय पुरुष, अकोले येथे 30 व 33 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 72 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, वृंदावन कॉलनीत 41 वर्षीय पुरुष, टाकळीत 19 वर्षीय तरुणी, सुगाव बु येथे 38 वर्षीय महिला, नवलेवाडीत 39 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 37 वर्षीय महिला, पाडाळणे येथे 64, 40 व 65 वर्षीय पुरुष, 35 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, लिंगदेव येथे 42 वर्षीय पुरुष, अकोले कोर्ट येथे 56 व 57 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 36 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 19 वर्षीय मुलगा, नवलेवाडीत 50 वर्षीय पुरुष, अकोले शिवांगी चौकात 58 वर्षीय महिला, ढोकरीत 32 वर्षीय पुरुष, अकोले इंदिरानगर 48 वर्षीय महिला, कोहणे येथे 47 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 83 वर्षीय पुरुष, विठे येथे 64 वर्षीय पुरुष, इंदोरीत 65 वर्षीय पुरुष, गणोर्‍यात 58 वर्षीय महिला, नवलेवाडीत 46 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुणी, 19 वर्षीय मुलगा, ढोकरीत 60 व 30 वर्षीय महिला अशा 57 जणांना आज कोरोनाची बाधा झाली आहे. तर रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार अकोले शहरात 23 वर्षीय तरुण, 40 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, कळस येथे 65 वर्षीय पुरुष, राजूर येथे 75 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवती, 39 वर्षीय महिला, 11 वर्षीय तरुण, 49 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय तरूणी अशा 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आता बाधितांची संख्या 68 वर गेली आहे. 

        तर संगमनेरमध्ये आज नव्याने 25 रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर मध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाची आकडेवरी झपाट्याने वाढली आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. पण, आजही सप्टेंबर महिन्याच्या सुरवाती पासुनच कोरोनाची दररोज येणारी आकडेवारी चिंताजनक आहे. कारण मागील दोन महिन्यांत  सरासरी दररोज 20 ते 25 कोरोनाबाधीत रुग्ण आढळुन येत होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात त्याचे प्रमाण वाढवून 40 ते 50 वर गेल्याचे दिसते. परंतु सुरवातीस लॉकडाऊन मध्ये ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण बोटावर मोजण्या इतक्या गावांमध्ये आढळुन आले होते. परंतु आज मितीला 127 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर कोरोना जाऊन पोहचल्याचे पाहायला मिळत आहे. तर शहरातील गल्ली-बोळात कोरोनाचा रुग्ण आढळुन आला आहे. याच भागातील प्रशासकीय कार्यलयातील कोविड योध्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

              दरम्यान,शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.शहरातील रंगारगल्ली येथे 42 वर्षीय व 22 वर्षीय महिलेला कोरोनाने ग्रासले आहे. तर चैतन्यनगर येथे 32 वर्षीय पुरुष व कोल्हेवाडी रोड येथे 24 वर्षीय युवक व 34 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे 70 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला तर कोल्हेवाडी येथे 84 वर्षीय वयोवृद्ध तर आज घुलेवाडी येथे कोरोनाने थैमान घातले आहे. घुलेवाडी येथे चार पुरुष व तीन महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आश्विखुर्द येथे 55 वर्षीय महिला व गुंजाळवाडी येथे 57 वर्षीय पुरुष तर धांदरफळ खुर्द येथे 53 वर्षीय महिला व घारगाव येथे 48 वर्षीय पुरुष तर कौठे कमळेश्वर येथे 26 वर्षीय पुरुष तर कसारा दुमाला येथे 40 वर्षीय पुरुष व मंगळापूर येथे 67 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला आणि चिखली येथे 50 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरासह तालुक्यातील एकुण संख्या 2 हजार 266 वर जाऊन पोहचली आहे.                       

तर गेल्या दिड महिन्यांपुर्वी अकोले 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बडेबडे व्यापारी पुढे येऊन छोट्या व्यापार्‍यांना विश्वासात न घेता मागिलवेळी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मोठ्या व्यापार्‍यांचे मागच्या दाराने धंदे जोमात सुरू होते तर गरिबांचे धंदे मात्र कोमात गेले होते. त्यामुळे, मनमानी बंदवर काहींनी अक्षेप घेतला होता. त्यानंतर तो बंद अपयशी ठरला. या पलिकडे कोरोनाचा काळ आहे तोवर दर शनिवारी अकोले बाजारपेठ बंद करण्याचे ठरले होते. मात्र, दोन आठवडे बर्‍यापैकी सर्वांनी नियम पाळले, त्यानंतर मात्र, तो बंदचा शनिवार कोठे गायब झाला हे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. तर वा व्यतिरिक्त या बाजारपेठा बंदमुळे राजूर येथे चांगलेच रणकंद पेटले होते. हा प्रकार थेट मंत्रालयात जाऊन पोहचला होता. आजी माजी आमदार, प्रशासन आणि सरपंच यांच्या आरोप प्रत्यारोपातून तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. मात्र, कालांतराने त्यावर पाणी फिरले गेले आणि वातावरण आपोआप थंड झाले. त्यामुळे, आता किमान सात दिसत बंदचा निर्णय घेतला आहे तर मागल्या दाराने आणि बंद शटरच्या खाली जर कोणी व्यवसाय करत असेल तर त्याचे कोण काही करणार? यावर देखील काही नियम ठरवून घेतले पाहिजे. अन्यथा छोट्या व्यवसायीकांवर हा एक प्रकारे अन्याय ठरेल. 

                         

                                तर अकोले तालुका बंद करीत असताना एकीकडे सात दिवस बंदचे मेसेज फिरत असताना किरणा दुकान व्यापारी असो.ने त्यांची भूमिका सोशल मीडियावर मांडली आहे. त्यात म्हटले आहे की, अकोले किराणा व्यापारी यांच्या वतीने निवेदन करण्यात येते की, सोमवार ते रविवार जे बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याला आमचा जाहिर विरोध आहे. तरी आम्ही आमची दुकाने चालु ठेवणार आहे. त्यामुळे, तालुक्यात एकाच एक नाही आणि बापात लेक नाही या म्हणीप्रमाणे येथे बंद बाबात एकवाक्यता दिसून आलेली नाही. त्यामुळे, सोमवार पर्यंत काय रणकंद माजते हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र, यात नागरिकांमध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे पहायला मिळाला आहे. आता दोन दिवसांनी कोणाचे पारडे जड भरते आणि कोणाचे लवते हे सिद्ध झाल्यानंतरच योग्य निर्णय काय? यावर शिक्कामुर्तब होणार आहे.

        अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली असून रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल गुरुवार दि. १० सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३३९ इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३८ आणि अँटीजेन चाचणीत २४५ रुग्ण बाधीत आढळून आले आहेत.

        तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये  बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८,  पाथर्डी ०४, नगर ग्रामीण २०, कॅंटोन्मेंट ०३,  नेवासा २३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२,  जामखेड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०८  अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४३८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६०, संगमनेर ३०, राहाता ४१, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपूर ६४,  कॅंटोन्मेंट ०७, नेवासा १६, श्रीगोंदा ०४,  पारनेर १८, अकोले ०५, राहुरी ४१,  शेवगाव ०३, कोपरगांव ०९, जामखेड ०२ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत आज २४५ जण बाधित आढळून आले असून त्यामध्ये, मनपा ४२, संगमनेर ०९, राहाता ४८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर २८, नेवासा १७, श्रीगोंदा १०, पारनेर ०७, अकोले २०, राहुरी ०३, कोपरगाव ०९, जामखेड १६ आणि कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

          दरम्यान, आज ५८१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ६८, राहाता ४६, पाथर्डी ४६, नगर ग्रा.०८, श्रीरामपूर ३८, कॅंटोन्मेंट १०,  नेवासा ४७, श्रीगोंदा ४०, पारनेर २२, अकोले ०६, राहुरी २४, शेवगाव १७,  कोपरगाव ३३, जामखेड २१, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या आता २४ हजार ७३१ झाली असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ३३९ इतकी आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ४४४ असून एकूण रूग्ण संख्या २९ हजार ५१४ इतकी आहे.