कोरोनाचा अतिरेक, अकोले सात दिवस बंद.! बंदला प्रचंड विरोध! पुन्हा 57 रुग्णांची भर.!

  

 सार्वभौम (अकोले) :-

                    अकोले तालुक्यात कालचे जिल्हा रूग्णालयातील रिपोर्ट आणि आजचे रॅपीड अँन्टीजनचे रिपोट असे मिळून 57 रुग्णांची भर तालुक्याच्या बाधित रुग्णांमध्ये झाली आहे. त्यामुळे तालुक्यात आठशेचे दशक कोरोनाने जवळ केले आहे. तर आज अगस्ति थेटर परिसरात राहणार्‍या एका तरुणाचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्कता बागळणे अपेक्षीत आहे. याच अनुषंगाने आता सोमवार दि. 14 सप्टेंबर पासून ते रविवार दि. 20 सप्टेंबर रोजी पर्यंत म्हणजे सात दिवस अकोले शहर आणि बाजारपेठा बंद राहणार आहे. त्यामुळे, तळागाळातून जे लोक बाजार करण्यासाठी तसेच काही अन्य खरेदी करण्यासाठी शहरात येणार असेल तर त्यांनी येऊ नये. असे आवाहन करण्यात आले आहे. तर यावेळी मेडिकल, दवाखाने चालु राहणार आहे. असे सोशल मीडियात फिरलेल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे.

             


अकोल्यात आज पुन्हा 58 रुग्णांची भर पडली आहे. त्यात ब्राम्हणवाडा येथे 40 वर्षीय पुरुष, आंभोळ येथे 62 वर्षीय पुरुष, गर्दणी येथे 37 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूणी, 30 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालक, 10 वर्षीय मुलगी, 48 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरूणी, अकोले शहरात 62, 35 व 48 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय मुलगा, ढोकरी येथे 52 वर्षीय पुरुष, शेंडीत 46 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 45 वर्षीय महिला, देवठाण येथे 35 वर्षीय पुरुष, वरखडवाडी 64 वर्षीय महिला, कळस येथे 39 वर्षीय पुरुष, अकोले येथे 30 व 33 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 72 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, वृंदावन कॉलनीत 41 वर्षीय पुरुष, टाकळीत 19 वर्षीय तरुणी, सुगाव बु येथे 38 वर्षीय महिला, नवलेवाडीत 39 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 37 वर्षीय महिला, पाडाळणे येथे 64, 40 व 65 वर्षीय पुरुष, 35 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक, लिंगदेव येथे 42 वर्षीय पुरुष, अकोले कोर्ट येथे 56 व 57 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 36 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 19 वर्षीय मुलगा, नवलेवाडीत 50 वर्षीय पुरुष, अकोले शिवांगी चौकात 58 वर्षीय महिला, ढोकरीत 32 वर्षीय पुरुष, अकोले इंदिरानगर 48 वर्षीय महिला, कोहणे येथे 47 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 83 वर्षीय पुरुष, विठे येथे 64 वर्षीय पुरुष, इंदोरीत 65 वर्षीय पुरुष, गणोर्‍यात 58 वर्षीय महिला, नवलेवाडीत 46 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुणी, 19 वर्षीय मुलगा, ढोकरीत 60 व 30 वर्षीय महिला अशा 57 जणांना आज कोरोनाची बाधा झाली आहे.

तर गेल्या दिड महिन्यांपुर्वी अकोले 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बडेबडे व्यापारी पुढे येऊन छोट्या व्यापार्‍यांना विश्वासात न घेता मागिलवेळी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मोठ्या व्यापार्‍यांचे मागच्या दाराने धंदे जोमात सुरू होते तर गरिबांचे धंदे मात्र कोमात गेले होते. त्यामुळे, मनमानी बंदवर काहींनी अक्षेप घेतला होता. त्यानंतर तो बंद अपयशी ठरला. या पलिकडे कोरोनाचा काळ आहे तोवर दर शनिवारी अकोले बाजारपेठ बंद करण्याचे ठरले होते. मात्र, दोन आठवडे बर्‍यापैकी सर्वांनी नियम पाळले, त्यानंतर मात्र, तो बंदचा शनिवार कोठे गायब झाला हे कोणाच्या लक्षात देखील आले नाही. तर वा व्यतिरिक्त या बाजारपेठा बंदमुळे राजूर येथे चांगलेच रणकंद पेटले होते. हा प्रकार थेट मंत्रालयात जाऊन पोहचला होता. आजी माजी आमदार, प्रशासन आणि सरपंच यांच्या आरोप प्रत्यारोपातून तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. मात्र, कालांतराने त्यावर पाणी फिरले गेले आणि वातावरण आपोआप थंड झाले. त्यामुळे, आता किमान सात दिसत बंदचा निर्णय घेतला आहे तर मागल्या दाराने आणि बंद शटरच्या खाली जर कोणी व्यवसाय करत असेल तर त्याचे कोण काही करणार? यावर देखील काही नियम ठरवून घेतले पाहिजे. अन्यथा छोट्या व्यवसायीकांवर हा एक प्रकारे अन्याय ठरेल. 

तर अकोले तालुका बंद करीत असताना एकीकडे सात दिवस बंदचे मेसेज फिरत असताना किरणा दुकान व्यापारी असो.ने त्यांची भूमिका सोशल मीडियावर मांडली आहे. त्यात म्हटले आहे की, अकोले किराणा व्यापारी यांच्या वतीने निवेदन करण्यात येते की, सोमवार ते रविवार जे बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याला आमचा जाहिर विरोध आहे. तरी आम्ही आमची दुकाने चालु ठेवणार आहे. त्यामुळे, तालुक्यात एकाच एक नाही आणि बापात लेक नाही या म्हणीप्रमाणे येथे बंद बाबात एकवाक्यता दिसून आलेली नाही. त्यामुळे, सोमवार पर्यंत काय रणकंद माजते हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र, यात नागरिकांमध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे पहायला मिळाला आहे. आता दोन दिवसांनी कोणाचे पारडे जड भरते आणि कोणाचे लवते हे सिद्ध झाल्यानंतरच योग्य निर्णय काय? यावर शिक्कामुर्तब होणार आहे.

टिप : रोखठोक सार्वभौमच्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळाव्यात यासाठी  7020290257 हा नंबर आपल्या ग्रृपला अ‍ॅड करा.