अकोल्यात 66 रुग्णांचा सर्वात उच्चांकी आकडा.! आदिवासी विकास मंत्र्यास कारोनाची लागण.!
सार्वभौम (अकोले) :-
नगर जिल्ह्यातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पहिल्यादा बाधा झाली होती. तर त्यांची विधासनभेच्या आदिवेशनासाठी पुन्हा तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आले आहे. तर आमदार मोनिकाताई राजळे यांनी देखील तपासणी केली असता त्यांचा देखील अहवाल काल पॉझिटीव्ह आला होता. आज काही आमदारांच्या तपासण्या केल्या असता त्यात तीन मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर त्यात राहुरीचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करुन माहिती दिली आहे. तर कोरोनापासून कितीतरी बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र, तरी तो झालाच अशी खंत देखील त्यांनी व्यक्त करुन दाखविली आहे. तर या पलिकडे अकोले तालुक्याचे सर्वात लकी आमदार डॉ. किरण लहामटे हे 24 तासापैकी 14 ते 16 तास जनतेत आहेत. हाक दिली तेथे आमदार अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे, ते जनतेत फिरुन देखील त्यांच्या संपर्कात अनेकदा बाधित व्यक्ती आल्याचे बोलले जाते तरी देखील चार ते पाच वेळा त्यांनी एक खबरदारी म्हणून तपासणी केली त्यात त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे, त्यांच्या जिल्हा परिषदेपासून ते आमदारकीपर्यंत त्यांचा लक त्यांना साथ देताना दिसत आहे. हेच तालुक्याचे सुदैव असल्याचे बोलले जात आहे. तर आज अकोल्यात सर्वात उच्चांक आकडा तालुक्याने गाठला आहे. आज एकाच दिवशी 66 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
काल रात्री उशिरा आलेल्या अहवालासह आजचे मिळून 66 रुग्णांची आज भर झाली असून अकोले तालुक्याने सातवे शतक ओलांडले असून आता संख्या 727 वर गेली आहे. त्यात पळसुंदे येते 26 वर्षीय तरुणी, ब्राम्हणवाडा येथे 43 व 55 वर्षीय पुरुष, धामनगाव पाट येथे 11 वर्षींय मुलगा 38 वर्षीय महिला, कोतुळ येथे 52 वर्षीय पुरुष, धामनगाव 87 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, शेंडीत 48 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 45 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष व 2 वर्षीची बालिका, शेंडी येथे 23 वर्षीय तरुण व 20 वर्षीय तरुणी, वारंघुशीत 27 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, कोतुळ येथे 40 व 39 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 21 वर्षीय तरुण व 51 वर्षीय महिला, चास येथे 30 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 45 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 55 वर्षीय महिला, बेलापूर येथे 54 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 28 वर्षीय तरुण चैतन्यपुर येथे 40 वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे 58 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, चास येथे 45 वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे 38 वर्षीय महिला, पाडाळणे येथे 56 वर्षीय पुरुष, अगस्ति मंगलकार्यालय परिसर 58 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, गर्दनी येथे 40 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 21 वर्षीय तरुणी, सुगाव बु येथे 51 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 90 व 32 वर्षीय पुरुष, भंडारदारा येथे 43 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 30 महिला, 45 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष तर 3, 5 व अवघ्या 1 वर्षीय बालक अशा आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर धुमाळवाडीत 17 वर्षीय मुलगा, पिंपळगाव नाकविंदा येथे 35 वर्षीय पुरुष, बेलापूर येथे 62 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगी व 77 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 30, 42 व 35 वर्षीय महिला, बेलापूर येथे 48 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 62 वर्षीय महिला, कोतुळ येथे 35 वर्षीय महिला, 15 व 17 वर्षीय मुलगा, वाघापूर येथे 50 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालिका, कोतुळ येथे 17 वर्षीय मुलगी व 29 वर्षीय तरुणी अशा 66 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर अकोले तालुक्याला कोरोनाबाबत काही शहानपण येताना दिसत नाही. कारण, अकोल्यात ब्राम्हणवाडा येथे लग्नामुळे अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर अकोले शहरात काही बर्थडे मुळे कोरोनाचे संकट ओढावताना दिसले. या व्यतिरिक्त अगदी काल परवा राजुरमध्ये पित्र घातल्यानंतर कोणतीही खबरदारी न बाळगता पंगती बसविल्यामुळे येथे एकाच वेळी 18 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. आता शासनाने नियम शिथिल केले म्हणजे ते कोरोना नामशेष झाला म्हणून नाही. तर देशाची आर्थिक स्थिती खालवत चालली होती. म्हणून तुमचे काहीही हो.! देश चालला पाहिचे. मात्र, लोकांना काम करताना, कष्ट कराताना, दोन वेळच्या रोजीरोटीसाठी झुंजताना कोरोना होत नाही. तर तो होतो शाही विवाह सोहळ्यात, बर्थडे आणि पार्ट्या व रिकामी गर्दी जमा करुन उभे केलेल्या समारंभात. हे लोक का समजून घेत नाही. हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे, कोरोनाला नक्कीच घाबरु नका. मात्र, कोरोनापासून काळजी घेणे अपेक्षित आहे.
टिप : रोखठोक सार्वभौमच्या बातम्या आपल्या मोबाईलवर मिळाव्यात यासाठी 7020290257 हा नंबर आपल्या ग्रृपला अॅड करा.