अकोल्यात बर्थडेच्या पार्टीत कोरोनाचा डान्स.! 11 बाधित 40 होमक्वारंटाईन 66 रुग्ण! आरोग्य विभागालाच कोरोनाने ठोकलं टाळं.! संगमनेरातही 52 रुग्ण!
सार्वभौम (संगमनेर/अकोले) :-
अकोले तालुक्यातील शेंडी परिसरात एरीगेशन कॉलनीतील एका हॉटेलमध्ये एक बर्थडेची (वाढदिवस) पार्टी करण्यात आली होती. त्यात पहिले तिघे तर नंतर आठ अशा 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे, हॉटेल चालकाची विनाशकाले विपरीत बुद्धी येथे पहायला मिळाली. देशात सर्व हॉटेल बंद असताना येथे चोरी छुपे हॉटेल व्यवसाय जोमात सुरु होता. त्यामुळे, या हॉटेल चालकाने प्रशासनाला जरी फसवले असले तरी तो कोरोनाला फसवू शकत नाही. हे देखील लक्षात आले आहे. त्यामुळे, पैसा कमविण्याच्या नादात आता या हॉटेल चालकास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आता पार्टीत असणार्या चाळीस लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असले तरी त्यांचा शोध घेऊन तपासणी होणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत भंडारादरा धरणाच्या पाणलोटात व परीसरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. पंरतु, आता एकाच वेळी अकरा रुग्ण भंडारादर्याच्या कॉलनीत मिळून आल्याने आदिवासी जनतेमध्ये घबराट पसरली आहे. तर आज संगमनेरात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर संगमनेरात पंचायत समितीत कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभाग बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आज अकोल्यात 59 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात पळसुंदे येते 26 वर्षीय तरुणी, ब्राम्हणवाडा येथे 43 व 55 वर्षीय पुरुष, धामनगाव पाट येथे 11 वर्षींय मुलगा 38 वर्षीय महिला, कोतुळ येथे 52 वर्षीय पुरुष, धामनगाव 87 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, शेंडीत 48 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 45 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष व 2 वर्षीची बालिका, शेंडी येथे 23 वर्षीय तरुण व 20 वर्षीय तरुणी, वारंघुशीत 27 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, कोतुळ येथे 40 व 39 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 21 वर्षीय तरुण व 51 वर्षीय महिला, चास येथे 30 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 45 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 55 वर्षीय महिला, बेलापूर येथे 54 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 28 वर्षीय तरुण चैतन्यपुर येथे 40 वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे 58 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, चास येथे 45 वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे 38 वर्षीय महिला, पाडाळणे येथे 56 वर्षीय पुरुष, अगस्ति मंगलकार्यालय परिसर 58 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, गर्दनी येथे 40 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 21 वर्षीय तरुणी, सुगाव बु येथे 51 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 90 व 32 वर्षीय पुरुष, भंडारदारा येथे 43 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 30 महिला, 45 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष तर 3, 5 व अवघ्या 1 वर्षीय बालक अशा आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर धुमाळवाडीत 17 वर्षीय मुलगा, पिंपळगाव नाकविंदा येथे 35 वर्षीय पुरुष, बेलापूर येथे 62 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगी व 77 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 30, 42 व 35 वर्षीय महिला, बेलापूर येथे 48 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 62 वर्षीय महिला, कोतुळ येथे 35 वर्षीय महिला, 15 व 17 वर्षीय मुलगा, वाघापूर येथे 50 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालिका, कोतुळ येथे 17 वर्षीय मुलगी व 29 वर्षीय तरुणी अशा 59 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
तर संगमनेर तालुक्यात कोरोनाचे थैमान सुुरू असताना जे कोविड योद्धे आहेत त्यांनाच कोरोनाने अजेंड्यावर घेतले आहे. आजवर डॉक्टर, नर्स, पोलीस इकेच काय! कारागृहात देखील कोरोनाने प्रवेश केला होता. आता मात्र, त्या पलिकडे कोरोनाने मजल मारली असून चक्क संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातच कोरोनाचा रुग्ण मिळून आला आहे. त्यामुळे बीडीओ सुरेश शिंदे यांनी फक्त आरोग्य विभाग चार दिवसांसाठी बंद ठेवण्याची निर्णय घेतला आहे. आता विशेष म्हणजे याच विभागातून कुरण सारख्या ठिकाणी हैदोस घालणार्या कोरोनाला मुसक्या घालण्याचे काम करण्यात आले होते. तर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर येथून कंट्रोल ठेवण्याचे काम येथूनच चोखपणे पार पाडले जाते. मात्र, दुर्दैवाने येथे दोन विस्तार अधिकारी, एक शाखा अभियंता, एक एकात्मिक बालविकासच्या अधिकारी व आता आरोग्य विभाग अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
संगमनेतर तालुक्यात चंदनापुरीत 52 वर्षीय पुरुष, पिंपळगाव ढेपात 37 वर्षीय पुरुष, बाजारपेठ संगमनेर येथे 55 वर्षीय महिला, घुलेवाडीत 55 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगा, राजापूरात 51 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्लीत 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, कुरकुटवाडीत 60 वर्षीय महिला, मांडवे बु येथे 48 वर्षीय पुरुष, साकुर येथे 60 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे 38 वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन येथे 34 वर्षीय पुरुष, नान्नज येथे 29 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 50 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 29 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुणी, रंगारगल्लीत 28 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 23 वर्षीय तरुणी, मंगळापूर येथे 68 व 62 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, बोटा येथे 11 वर्षीय मुलगा, साकुर 42 वर्षीय पुरुष, चंदनापुरीत 49 वर्षीय पुरुष, सुकेवाडीत 28 वर्षीय पुरुष, आंभोरेत 17 वर्षीय मुलगी, चिंचपूर येथे 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय मुलगी, घुलेवाडीत 73 वर्षीय पुरुष, आंबी दुमालात 8 महिन्याची चिमुरडी, 21 वर्षीय तरुणी, 47 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुणी, 31 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ 48 वर्षीय पुरुष, चंदनापुरी 65 वर्षीय पुरुष, 60 व 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 14 व पाच वर्षाचा मुलगा, माळीवाडा येथे 27 वर्षीय तरूण, कौठे बु येथे 25 वर्षीय तरुण, 36 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय बालिका व 22 वर्षीय तरुणी अशा 52 जणांची भर पडली आहे.
अर्थातच येथे कोरोनाचा रुग्ण सोपडतो काय! आणि शिरजोरी करणार्या पुढार्यांची वर्दळ कमी होते काय! हे चित्र मात्र पंचायत समितीत प्रकर्षाने पहावयास मिळते आहे. त्यामुळे, पांढरे कपडे घालुन तेथे मिरविणारे फुकट बाबुराव साधे या कोविड योद्ध्यांना तब्बेतपाणी देखील विचारायला तयार नाहीत. त्यामुळे, जर एखादा हकनाक घराबाहेर फिरून त्याला कोरोना झाला तर त्याचे काही सुखदुख नाही. मात्र, हे कर्मचारी रोज कामावर हजर राहून कडूकाळ दिवसात देखील आपले कर्तव्य बजावत आहे त्यांना खरोखर सॅल्युट केला पाहिजे. या पलिकडे जिल्हाधिकारी, सीईओ व पोलीस अधिक्षक यांनी एक उपक्रम राबविला पाहिजे. की, जे शासकीय सेवेत कार्यरत असतांना ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या सर्वांना एका कोविड वॉरियर म्हणून सन्मानित केले पाहिजे. कारण, समोर महामारीचे सावट दिसत असून देखील कर्तव्याचा ध्यास सोडला नाही. हे समाजासाठी व देशासाठी फार मोठे योगदान आहे. एकीकडे पुण्यासारख्या ठिकाणी जम्बो सेंटरमधील दिडशे लोक राजनामे लिहीतात तर दुसरीकडे प्रत्येक सरकारी कर्मचारी कोणतीही तक्रार न करता कोरोनाशी लढतो. याचे कोठेतरी मुल्यमापन झाले पाहिजे. तर यापेक्षा महत्वाचे म्हणजे जे सरकारी लोक ऑनड्युटी बाधित होतात त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवून अगदी कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार दिले पाहिजे. कारण, सरकारी कर्मचारी हा जरी प्रशासनाने प्रतिनिधीत्व करतो, तरी तो समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करतो. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा काम शासनाचे आजार स्वत:वर, आणि झळ मात्र कुटुंबाला! याची दखल जिल्हाधिकार्यांनी घेतली पाहिजे. अर्थात संगमनेरात असे कार्यालय नाही जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे, बीडीओ साहेबांनी जो निर्णय घेतला आहे. त्याचे प्रत्येकाने स्वागत केले आहे. कारण, सर सलामत तो पगडी पचास!