संगमनेरात 51 तर अकोल्यात 58 रुग्ण.! त्याने तर मेलेल्या मानसाच्या टाळुवरचं लोणी खाल्लं.!
कोरोना हे अनेकांच्या धनदौलतीचे श्रद्धास्थान ठरले आहे. तर अनेकांच्या जिवावर उठलेली महामारी. यापुर्वी काही डॉक्टर रुग्णांना लुटत होते, आता मात्र मानसाने त्याच्या निर्लज्जपणाची पातळीच घसरविली आहे. कारण, नगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण, एक महिला आजारी असल्यामुळे जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. दरम्यान या महिलेचा कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह आला होता. मात्र, उपचारा दरम्यान संबंधित महिला मयत झाली. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने संबंधित महिलेल्याच गळ्यात जे सोन्याचे दागिने होते. ते कोणीतरी काढून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, यात सखोल तपास होणार आहे. संबंधित वार्डातील सीसीटीव्ही तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर घडलेला प्रकार उघड होईल. जर असा प्रकार घडला असेल तर संबंधित दोषींवर मोठी कारवाई करण्यात येईल असे देखील जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. तर मेलेल्या मानसाच्या टाळुवरचे लोणी खाणे या म्हणीचा प्रत्येय येथे आला आहे.
तर संगमनेर तालुक्यात सुकेवाडीत 64 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथे 57 वर्षीय पुरुष 35 वर्षीय महिला, निमगाव पागा येथे 50, 38 व 60 वर्षीय महिला, 42 व 37 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 17 वर्षीय मुलगा, धांदरफळ खु येथे 53 वर्षीय महिला, झोलेत 75 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, घारगावात 39, 37, 40 70, 72 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, चिखलीत 14 वर्षीय तरुणी, 42 वर्षीय पुरुष, निमगाव जाळीत 25 वर्षीय तरुणी, उंबरीत 30 वर्षीय पुरुष, बोटा येथे 31 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 24 वर्षीय तरुणी, 5 वर्षीय बालक, साईनगर येथे 42 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय बालिका व 36 व 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडीत 37 व 65 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुणी, 31 वर्षीय महिला, गणेशनगर येथे 55 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 29 वर्षीय तरुणी, चैतन्यनगर येथे 36 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर येथे 42 वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथे 38 वर्षीय पुरुष, संगमनेर येथे 18 वर्षीय तरूणी, 15 वर्षीय मुलगा, सावरगाव तळ येथे 39 वर्षीय पुरुष, जवळे बाळेश्वर येथे 65 व 30 वर्षीय पुरुष, मालदाड येथे 19 वर्षीय तरुणी, 50 वर्षीय पुरुष अशा 51 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर संगमनेर तालुक्यात सायखिंडी येथे काल 40 पुरुषाचा बळी गेला होता. दुर्दैवाने आज तेथे पुन्हा 50 वर्षीय पुरुषाचा बळी गेला आहे.
आज अकोले तालुक्यात कोतुळ येथे 45 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 19 व 14 वर्षीय मुली, 38 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, अकोले येथे 38 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, नवलेवाडीत 45 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 29 वर्षीय तरुण, कोतुळ येथे 37 वर्षीय पुरुष, अकोले येथे 40 व 80 वर्षीय पुरुष, कळस येथे 55 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 9 वर्षीय बालिका, अकोल्यात 21 वर्षीय तरुणी, विरगाव येथे 63 वर्षीय महिला, अकोल्यात 36 वर्षीय महिला, तांभोळ येथे 29 वर्षीय महिला, अकोल्यात 29 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, पिंपळदरी येथे 32 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 17 वर्षीय तरुण, 67 वर्षीय महिला, कळंब येथे 72 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय बालिका, 36 वर्षीय पुरुष, अकोले येथे 54 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरुणी, 59 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 69 वर्षीय पुरुष, अकोल्यात 24 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, 23 व 25 वर्षीय तरुणी, 49 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुण, 49 व 50 वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे 21 वर्षीय तरुण, देवठाण येथे 30 वर्षीय पुरुष, राजूर येथे 44, 40 व 33 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 45 व 48 वर्षीय महिला, निमगाव पागा (संगमनेर) येथे 50 व 38 वर्षीय महिला, धांदरफळ येथे 37 वर्षीय पुरुष, संगमनेर धांदरफळ येथे 35 वर्षीय महिला, अशा 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले १४, जामखेड ०१, कर्जत ०२, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०३, संगमनेर ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३१,
अकोले ०३, जामखेड ०३, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०४, पारनेर ०४, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी ०९, संगमनेर ०४, शेवगाव ०६, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४१५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले ४५, जामखेड ३१, कर्जत ३३, कोपरगाव २६, नेवासा ३६, पारनेर २७, पाथर्डी १५, राहाता ५६, राहुरी १२, संगमनेर ४६, शेवगाव १४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३० आणि कॅन्टोन्मेंट ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ८५६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २३५, अकोले ४२, जामखेड ४७, कर्जत २१, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ३९, नेवासा ३९, पारनेर ४४, पाथर्डी ३५, राहाता ५४, राहुरी ५४, संगमनेर ७४, शेवगाव २९, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर ४२, कॅंटोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल २१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ३७ हजार ५३१ असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ३३४ आहे. मृत्यू झालेली संख्या ६९४ असून आजवर एकूण रूग्ण संख्या ४२ हजार ५५९ इतकी आहे.