अकोल्यात कोविडचे 15 वे शतक पुर्ण आज 58 रुग्णांची भर
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज 58 रुग्णांची भर पडली आहे. त्यात राजूर, देवठाण, अकोले शहर, नवलेवाडी यांच्यासह अन्य मोठ्या गावांचा सामावेश आहे. तर या संख्येमुळे कोविडने अकोल्यात 15 वे शतक पुर्ण केले आहे. आज तालुक्यात 1 हजार 504 रुग्ण झाले असून 20 जणांचा बळी गेला आहे. आज 482 जणांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी 58 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर अकोले शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
तर अकोले तालुक्यात आज 58 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात राजूर येते 48 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, देवठाण येथे 65 वर्षीय पुरूष, टाहाकरीत 56 वर्षीय पुरूष, देवठाण येथे 60 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरूष, औरंगपूर येथे 28 वर्षीय पुरूष, कोतुळ येथे 32 वर्षीय महिला, महादेव वाडी 19 वर्षीय तरुण, चितळवेढे येथे 18 वर्षीय तरुण, अकोल्यात 37 व 54 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, धामनगाव आवारीत 33 वर्षीय पुरूष, अकोल्यात 45 वर्षीय पुरूष, पाडाळणे येथे 19 वर्षीय तरुणी, अकोल्यात 36 वर्षीय महिला, 41 व 72 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, अकोले माळीझाप येथे 37 वर्षीय पुरूष, अकोलेत 34 वर्षीय महिला, नवलेवाडीत 21 वर्षीय तरुण, रुंभोडीत 27 वर्षीय तरुणी, नवलेवाडीत 35 वर्षीय पुरूष, अकोल्यात 26 वर्षीय तरुण, 32 वर्षीय पुरूष, 9 वर्षीय बालक, 20 वर्षीय तरुणी, 22 वर्षीय तरुण, 19 वर्षीय तरुण, नवलेवाडीत 49 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, गदर्र्नीत 34 वर्षीय पुरूष, चितळवेडेत 16 वर्षीय बालिका, 42 व 37 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरूष, 3.5 वर्षीय बालक, 12 वर्षीय मुलगा, 35 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरूष, नवलेवाडीत 19 व 15 वर्षीय दोन मुले, अकोल्यात 26 वर्षीय तरुणी, चितळवेढेत 31 वर्षीय पुरूष, शेंडीत 35 वर्षीय पुरूष, मनोहरपूर येथे 53 वर्षीय पुरूष, बाजारतळ अकोलेत 59 वर्षीय पुरूष, सातेवाडी रस्ता कोतुळ येथे 57 वर्षीय पुरूष, धामनगाव आवारी 75 वर्षीय महिला, कोतुळ येथे 25 वर्षीय तरुण, पानसरवाडीत 49 वर्षीय पुरूष, रुंभोडीत 48 वर्षीय पुरूष अशा 58 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ इतकी झाली आहे. तर बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १०, नेवासा ०१, पारनेर १०, पाथर्डी १०, शेवगाव ०८, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १५ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ८३४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १७५, अकोले ३६, जामखेड ४१, कर्जत ३१, कोपरगाव ४४, नगर ग्रामीण ८७, नेवासा ३०, पारनेर ४०, पाथर्डी ६३, राहाता ६५, राहुरी ५६, संगमनेर ५३, शेवगाव २३, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट १३, मिलिटरी हॉस्पिटल १४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ३८ हजार ३६५ असून उपचार सुरू असलेले रूग्ण ४ हजार ३९ इतकी आहेत. तर मृत्यू झालेले ६९८ रुग्ण आहेत. तसेच एकूण रूग्ण संख्या ४३ हजार १०२ इतकी आहे.
- शंकर संगारे