अकोले तालुक्यात 35 रुग्णांची भर, मी 50 बेड देतो त्यांचे प्रशासनाला पत्र.!
अकोले तालुक्यात आज नव्याने 35 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील संख्या आता 1 हजार 184 इतकी झाली आहे. तर अकोले तालुक्यात भरसाठ पावसाबरोबर भरमसाठ कोरोना पाऊस देखील पहायला मिळाला आहे. तालुक्यात साखर कारखान्याने 100 बेडची व्यवस्था केलेली असताना देखील तेथे बेड आपुर्या पडत आहे. त्यामुळे, माजी आमदार यांनी पुन्हा प्रशासनाला पत्र लिहीले आहे. तर स्वत: मी 50 बेड उपलब्ध करुन देतो. तुम्ही डॉक्टर आणि अन्य औषधोपचार द्या. तर यातील अन्य सुविधा देखील त्यांनी पुरविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
तर अकोले तालुक्यात आज कोतुळ येथे 26 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरूण, अबितखिंड येथे 50 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 21 वर्षीय तरुणी, 49 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 40 वर्षीय पुरुष,51 वर्षीय पुरुष, 66 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 22 वर्षीय तरुण, बाजारपेठ अकोले येथे 37 वर्षीय पुरुष, बेलापूर येथे 62 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 69 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 85 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 45 वर्षीय पुरुष, राजूर येथे 15 वर्षीय तरुणी, म्हाळदेवी येथे 19 वर्षीय तरुण, महालक्ष्मी रोड अकोले येथे 3 वर्षीय बालिका, नवलेवाडी येथे 56 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 57 वर्षीय पुरुष, बोरी येथे 29 वर्षीय पुरुष, कुभेफळ येथे 42 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, अकोले येथे 38 वर्षीय पुरुष, राजूर येथे 63 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, 15 वर्षीय तरुण, 56 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, निळवंडे येथे 47 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 75 वर्षीय पुरुष अशा 35 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान आज संगमनेर, अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याचे पहायला मिळाले. तर संगमनेरात नव्हे मात्र, अकोल्यात नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडले. भुयारी गटारी, उघड्यावरील गटारी आणि सांडपाण्याच्या नियोजनासह पावसाचे पाणी चक्क लोकांच्या दुकानांमध्ये गेल्याचे पहायला मिळाले. म्हणजे दुनिया कुठची कोठे गेली तरी चालेल, मात्र, आपला अकोले तालुका हा असाच मागास आणि अविकसित आहे. हे याची प्रचिती पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे.