जिल्ह्याचे पालमंत्री कोरोना बाधित.! अकोल्यात 50 रुग्णांची भर, एकट्या राजूरमध्ये 25 रुग्ण.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज कोेरोनाने चांगलेच थौमान घातले आहे. त्यात राजूर येथे एकाच दिवशी --- रुग्ण मिळून आले असून राजूर बंद करुन देखील काही फायदा झाला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागला आहे. तर राजुरसह तालुक्यातील प्रत्येक दिशेला कोरानाचे हाहाकार माजविल्याचे दिसते आहे. त्यामुळे, अकोल्यात ग्रामीण भागात लोक काळजी घेतात की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता जिल्ह्यातील शहरे आणि ग्रामीण भाग देखील कोरोनाग्रस्त होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्रीच कोरोनाची शिकार झाले आहेत. ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, व्हीआयपी सुरक्षा छेदून कोरोना अनेक मंत्र्यांच्या घशापर्यंत जाऊन पोहचला आहे. त्यामुळे, कोरोनाचे संकट पुसट नाही तर गडद होत चालल्याचे दिसू लागले आहे. पालकमंत्री यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कातील सर्वांनी आपली काळजी घ्यावी.
आज राजूर येथे 31 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरूण, 51 वर्षीय महिला, 75 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष,, 40 वर्षीय पुरुष, 35 व 38 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरूण. 22 वर्षीय तरुणी, 37,39 व 40 महिला, 23 तरुणी, आठ वर्षीय बालक, 37 वर्षीय महिला, 19 वर्षीय मुलगी, 24 वर्षीय तरुण, 9 वर्षीय बालक, 28 वर्षीय तरूण, 47 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक तर पाडळणे येथे 37 वर्षीय महिला अशा 25 जणांना राजूर विभागात कोरोनाची बाधा झाली आहे.