सरकारकडून कोविड नियमांचे विसर्जन.! आता 5 ऐवजी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार.! हॉटेल, लॉजलाही परवानगी, तर राज्यभर विनापास प्रवास.!

सार्वभौम (अहमदनगर) :-

                                 नगर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सरकारच्या सुचनेनुसार आज 1 सप्टेंबर 2020 रोजी एक महत्वाचा आदेश काढला आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योग व्यवसायीक यांना समाधान लाभले आहे. कारण, आता सर्व दुकाने पुर्वी 5 वाजता बंद होत होते. तर तो नियम शिथिल करुन ती मर्यादा 7 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवता येणार आहे. इतकेच काय.! तर हॉटेल्स आणि लॉज देखील काही नियम अटी राखून खुली करण्यात आलेले आहेत. तसेच खाजगी बस, मिनी बस व अन्य वाहतून यांना आता परवानगी राहणार आहे. त्याच बरोबर आता राज्यात संचार करण्यासाठी कोणत्याही पासची गरज लागणार नाही. त्यामुळे, आज ऐकीकडे बाप्पाचे विसर्जन झाले तर सरकारने आपल्या काही जाचक अटींचे देखील विसर्जन केल्याचे पहायला मिळाले आहे. अर्थात ही सर्व सुविधा आजपासून नाही तर उद्या बुधवार दि. 2 सप्टेंबर पासून लागू करण्यार येणार आहे. त्यामुळे, प्रत्येकासाठी ही एक प्रकारची गुडन्युज आहे. मात्र, आनंदाच्या भरात कोणी कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष देखील करु नये. त्यासाठी देखील काही सुचना करण्यात आलेल्या आहेत.                


    गेल्या सात महिन्यापासून देशाला कोरोनाचे ग्रहण लागले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य देखील पुर्णत: थांबले होते. आता मात्र, त्यास चालना मिळू लागली आहे. कारण, आता राज्य सरकारने काही नियम व अटी शिथिल करण्याचे काम सुरू केले आहे. कारण, यापुर्वी सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालु राहत होते. आता मात्र, दोन तास दुकाने उशिरापर्यंत चालु राहणार आहेत. म्हणजे 7 वाजेपर्यंत व्यावसायिकांना धंदा करता येणार आहे. तसेच गेली सहा महिने लॉज आणि हॉटेल सुरू होते. आता मात्र, त्यांच्यावरील बंदी हटली आहे. विशेषत: संचारबंदी, पर्यटन, जिल्हाबंदी असल्यामुळे लॉजचे बजेट घसरले होते. मात्र, हॉटेल चालकांना मोठा फटका बसला होते. त्यानंतर दोन महिन्यापुर्वी पार्सलच्या नावाखाली हॉटेल चालु झाले खरे. मात्र, पार्सलपेक्षा भल्याभल्या पार्ट्या हॉटेलांमध्ये होत होत्या. आता त्यांना कोणाची भिती राहीली नाही. 

या व्यतिरिक्त तालुक्यात बाजारपेठा सकाळी 9 ते 7 चालु राहतील, तसेच सरकारी कार्यालयात गट अ, गट ब अधिकारी शंभर टक्के उपस्थित राहतील, तर गट अ, गट ब व्यतिरिक्त 50 टक्के क्षमतेने किंवा 50 पेक्षा कमी क्षमतेने कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील. तर येणार्‍या व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एका दक्षता अधिकार्‍याची नेमणूक करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे. तर येणार्‍या जाणार्‍यांचे टेम्प्रेचर घेणे, हॉड वॉश, सॅनिटायझर देणे, मास्क तपासणे बंधनकारक राहिल. तसेच खाजगी कार्यालयात 30 टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतात. त्यानी देखील अशाच प्रकारची काळजी घ्यायची आहे. तसेच आता अंर्तजिल्हा हलचालींवर कोणतेही बंधन राहणार नाही. कोणाकडून ई-पासची मागणी करण्यात येणार नाही. खजगी बस, मिनीबस, आरटीओ प्रमाणीत गाड्या देखील आता काही नियम व अटी राखून सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे, ज्या महिला गरोदर आहेत, ज्यांचे वय 10 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींनी घरी राहण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
                  तर ज्या अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी ठिकाणे बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, सिनेमा हॉल, जलतरण, मनोरंजन पार्क, थिएटर, मॉल मार्केट (कॉम्प्लेक्समध्ये असलेले देखील), पेक्षागृह, असॅम्बली हॉल, हवाई प्रवासी वाहतूक, अंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक, सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, अकॅडमिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे 30 सप्टेंबर पर्यंत तथा पुढील अदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. 
- सागर शिंदे