संगमनेरात 46 रुग्णांची भर तर अकोल्यात 1 हजार 13 रुग्ण.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाची आकडेवारी 46 न वाढली आहे. येथे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रमाणाच्या बाहेर चाललेला आहे. त्यामुळे, कालपर्यंत संगमनेर तालुक्यात 2 हजार 15 रुग्ण होते. त्यात 1 हजार 649 रुग्ण निव्वळ तालुक्यात आहे. त्यामुळे, ग्रामीण भागात लोक स्वत:ची, कुटुंबाची व सामाजाची देखील काळजी घेताना दिसत नाही. त्यामुळे, तालुक्यात असून देखील लोक बेजबाबदारपणे वागत आहे. तालुक्यात कुरण गाव खरोखर एक आदर्श आहे. तर घुलेवाडी, गुंजाळवाडी, निमोण, साकुर, चंदनापुरी, सुकेवाडी, वडगाव पान, तळेगाव दिघे, संगमनेर खुर्द, राजापूर, समनापूर मंगळापूर, धंदरफळ, खर्डी, कोल्हेवाडी, कौठे धांदरफळ ढोलेवाडी, जोर्वे चिकणी, चिखली, बोटा, घारगाव अशा गावांनी दक्षता घेणे अपेक्षीत आहे. कारण, या गावांमध्ये 30 ते 40 तसेच 50 ते शंभर रुग्णसंख्या आहे. जी तालुक्यासाठी एक लाजीरवाणी बाब आहे. तर आज संगमनेर तालुक्यात 46 रुग्ण मिळून आले आहेत. तर आज 2 हजार 561 रूग्ण तालुक्यात झाले आहेत.
तर आज अकोले तालुक्यात नव्याने आठ जणांचे अहवालन जिल्हा रूग्णालयातून प्राप्त झाले आहेत. त्यात मोग्रस येथे 64 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 41 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारी येथे 22 वर्षीय पुरुष, मनोहरपूर येथे 65 वर्षीय पुरुष, पानसरवाडी येथे 71 वर्षीय पुरुष, चास येथे 45 वर्षीय पुरुष तर अकोले शेजारी असणार्या नवलेवाडीत आमृतवेल येथे 70 वर्षीय पुरुष अशा आशा आठ जणांना कोरोना झाल्याची माहिती पुढे आली आहे. आज तालुक्यात रॉपिड अँन्टीजन नुसार 23 रुग्ण सापडले होते. त्यात आता 8 जणांसह ती संख्या 30 वर जाऊन पोहचली आहे. तर अकोले तालुक्यात 23 रुग्णांची भर पडली आहे. त्यात गणोरे येथे 52 व 30 वर्षींय महिला तर अवघ्या 4 महिन्यांचा मुलगा, 33 वर्षीय पुरुष, तर 5 वर्षीय बालक, 28 तरुणी, विरगाव येथे 37 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय बालिका, नवलेवाडी 57 वर्षीय पुरुष, रेडे येथे 25 वर्षीय तरुण, कोतुळ येथे 46 वर्षीय महिला, आंभोळ येथे 35 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 52 वर्षीय पुरुष, राजूर येथे 49 व 58 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट 21 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, विरगाव येथे 36 वर्षीय महिला, राजूर येथे 55 वर्षीय पुरुष, औरंगपूर 44 वर्षीय पुरुष, राजूर 47 वर्षीय पुरुष तर गर्दणी येथे 75 वर्षीय वृद्ध व इंदोरी येथील 68 वर्षीय पुरुष अशा दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात मृत्युंची संख्या 20 वर जाऊन पोहचली आहे.त्यात आंबी दुमाला येथे 31 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरुणी, कुरकुटवाडीत 31 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरुणी, 27 वर्षीय पुरुष, चंदनापुरीत 74 वर्षीय पुरुष, निळवंडेत 22 वर्षीय तरुणी, देव कौठेत 49 वर्षीय पुरुष, लोहारेत 43 वर्षीय पुरुष, कसारेत 28 वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे 30 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुणी, 4 वर्षीय मुलगा, 2 वर्षीय बालिक, निमोण येथे 21 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, साकुर येथे 52 वर्षीय महिला, मिर्झापूर येथे 15 वर्षीय मुलगी, पंजाबी कॉलनीत 80 वर्षीय महिला, इंदिरानगर येथे 44 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 8 व 15 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय बालिका, 40 वर्षीय महिला, 75 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीत 52 वर्षीय पुरुष, निमोण येथे 58 वर्षीय महिला, सावरगाव तळे येथे 35 वर्षीय पुरुष, ऑरेंज कॉर्नर येथे 35 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 44 वर्षीय महिला, विद्यानगर येथे 46 वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथे 70 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा 56 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे 27 वर्षीय पुरुष, धांदरफळ बु येथे 40 वर्षीय महिला, निमज येथे 46 वर्षीय पुरुष, धांदरफळ बु येथे 40 वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे 59 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे 48 वर्षीय महिला, वेल्हाळे येथे 40 वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे 41 वर्षीय पुरुष अशा 46 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
तसेच अकोले तालुक्यात देखील मध्यवर्ती शहरात कमी मात्र, चार बाजुंनी वेगवेगळ्या ठिकाणी रुग्ण मिळून येत आहे. तर शहर सुरक्षित असले तरी ग्रामीण भागात मात्र, कोरोनाने थौमान घेतले आहे. ज्या लिंगदेवपासून सुरूवात झाली तेथे आजही रुग्ण टिकून आहे. तर ब्राम्हणवाड्यातील कोरोनाचे सानिध्य काही जाता जाईनासे झाले आहे. कोतुळ, आंभोळ, मन्याळे, धामनगाव पाट, अशा अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रदुर्भाव आजही कमी होत नाही. तर या पलिकडे राजूर परिसरात कमी मात्र, राजुरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता होत नाही. त्यामुळे हे गाव बंद परण्याचे वेळ आली आहे. पाडाळण्यासारख्या ठिकाणी कोरोना कहर करतो म्हणजे तेथील ग्रामस्थ, प्रशासन काही करतेय की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या पलिकडे समशेरपूर परिसरात देखील कोरोना थांबायचे नाव घेत नाही. आजुबाजुच्या वाडी वस्तीचे लोक एक-एक बाधित होताना दिसत आहे. त्यामुळे, समशेरपूर देखील बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यापुढे देवठाण गावाला मात्र मानले पाहिजे. त्यांनी गावातील कोरोनाची साखळी मोडीत काढली आहे. त्याच्याकडून कोरोनाचे वादळ खाली सरकले असून आज नव्याने विरगावात कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहे. त्यांच्या जवळच गणोर्यात मात्र कोरोनाने दमदार काम सुरू केले आहे. एकापाठोपाठ येथे रुग्णांची भर होऊ लागली आहे. काल हिवरगाव आंबरे जेव्हा कोरोना बाधित होते, तेव्हा याच गणोरे गावातील लोक त्यांना गावात येऊ देत नव्हते. त्यांची हेटाळणी करीत होते. त्यांना शेतकरी माल, औषधे आणि अन्य वस्तू देत नव्हते. अशा प्रकारच्या तक्रारी देखील आल्या होत्या. मात्र, आज हिवरगावमध्ये एकही रुग्ण नाही. तर गणोर्यात रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे, प्रत्येकाची वेळ येत असते. कोणी कोणाची हेटाळणी करु नये. प्रत्येकाला संकटात साथ द्यावी. किमान हा तरी धडा प्रत्येकाने कोरोनाकडून घेतला पाहिजे. मात्र, या दोन्ही तीन्ही गावात संटुआईचे पिंपळगाव निपाणी मात्र अगदी सेफ आहे. त्यामुळे, येथील प्रशासनाचे व समितीचे आभार मानले पाहिजे.
आज देखील कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. काल अकोल्यात कोरोनाने 991 ची मजल मारली होती. तर आज तालुक्यात कोरोना बाधितांची हजारी (1 हजार 13) पुर्ण झाली आहे. आज एकाच दिवशी 23 रुग्ण मिळून आला असून गर्दणी येथील एका 75 वर्षीय वृद्ध व इंदोरी येथील 68 वर्षीय पुरुष अशा दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मृतांचा आकडा 20 वर जाऊन पोहचला आहे. तर आजच्या 1 हजार 13 पैकी 155 रुग्ण उपचार घेत आहेत तर बाकी 841 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज घोषणा केली की, आता लॉकडाऊन करण्यात काही अर्थ नाही. तर दुसरीकडे धामनगाव पाट हे शुक्रवार दि. 18 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहे. असा संदेश सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे, एकदा गर्दनी, मग अकोले शहर, त्यानंतर राजूर आणि त्या पाठोपाठ समशेरपूर असा बंदक्रम उपक्रम तालुक्यात सुरू आहे. या बंदपेक्षा कोरोनावर उपायोजना कोणी करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८१ इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८५, संगमनेर ०३, राहाता ०१, पाथर्डी ०२, श्रीरामपूर १४, नेवासा २३, श्रीगोंदा ०४, पारनेर ०६, अकोले १५, राहुरी ०८, कोपरगाव ०७, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल २१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३३० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११३, संगमनेर ०८, राहाता ५०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण १७, श्रीरामपुर ४८, नेवासा १०, श्रीगोंदा ०८, पारनेर १४, अकोले ०९, राहुरी २३, शेवगाव ०१, कोपरगाव १६, जामखेड ०२ आणि कर्जत ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २९९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १९, संगमनेर २१, राहाता २०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ०४, श्रीगोंदा २२, पारनेर १०, अकोले १६, राहुरी ४१, शेवगाव ३८, कोपरगाव १३, जामखेड २६ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ५७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या २९ हजार ८५ इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ५ हजार ०८१ झाली असून ५४९ जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.