संगमनेरात 45 रुग्ण, 37 वा बळी, अकोल्यात 47 रुग्ण, व्यापारी आज व्हेंटीलेटरवर.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   संगमनेर तालुक्यात आज देखील 45 रुग्णांची भर पडली आहे. तर सायखिंडी येथील एक कोरोना बाधीत व्यक्ती मयत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील बाधीत 3 हजार पर्यंत जाऊन पोहचली असून 37 वा बळी गेली गेला आहे. तर आजवर कोरोना बाधितांचा आकडा 3 हजार 87 वर जाऊन पोहचला आहे. या पलिकडे अकोले तालुक्यात आज 47 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1 हजार 399 झाली आहे. तर आज तहसिलदार मुकेश कांबळे यांनी तालुक्यात एक अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यात आता सर्व व्यापार्‍यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. त्यामुळे, त्यांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम महत्वपुर्ण ठरणार आहे. तर संगमनेर तालुक्यात देखील सरकारी कार्यालये आणि सरकारी कर्मचारी यांच्यावर कोरोनाच्या तपासणीची एकप्रकारचे संक्रांतच येऊन ठेपली आहे.

आज दि. 27 सप्टेबर 2020 रोजी अकोले तालुक्यात 47 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहराच्या लागत माळीझाप येथे 58 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महीला, शेटेमळा येथे 47 वर्षीय महीला, 25 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरूण, 17 वर्षीय तरूण, इस्लामपेठ येथे 76 वर्षीय महीला, वृदांवण कॉलनीत 32 वर्षीय महीला, बसस्थानक जवळ 21 वर्षीय तरूण, तालुक्यातील सावंतवाडी येथे 46 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय महीला, औरंगपूर येथे 22 वर्षीय पुरूष, सुगाव बु येथे 29 वर्षीय महीला, कळस येथे 50 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महीला, विरगाव येथे 25 वर्षीय तरुण, हिवरगाव आंबरे येथे 36 वर्षीय पुरूष, कोतुळ येथे 57 वर्षीय महीला, 38 वर्षीय महीला, 28 वर्षीय महीला, 50 वर्षीय पुरूष, 04 वर्षीय मुलगी, अंभोळ येथे 60 वर्षीय महीला, 30 वर्षीय महीला, 19 वर्षीय तरुणी, 70 वर्षीय पुरुष,22 वर्षीय तरुण, राजूर कॉलेज रोड येथे 55 वर्षीय पुरूष, अकोले शहरातील महालक्ष्मी कॉलनीत 56 वर्षीय महीला, गणोरे येथे 71 वर्षीय पुरूष, पिंपळदरी येथे 32 वर्षीय महीला, कोतुळ येथे 74 वर्षीय पुरूष, अकोले शहरातील कारखाना रोड येथे 56 वर्षीय पुरूष, शहरात 45 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरूष, 51 वर्षीय पुरूष, कळस येथे 59 वर्षीय महीला, निब्रळ येथे 27 वर्षीय पुरूष, तांभोळ येथे 07 वर्षीय बालक, 32 वर्षीय पुरूष,28 वर्षीय महीला, 24 वर्षीय तरूण, परखतपुर येथे 45 वर्षीय महीला, गर्दणी येथे 40 वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथे 27 वर्षीय तरुण, पानसरवाडी येथे 45 वर्षीय पुरूष अशा 47 व्यक्तीचा अहवाल पॅाझिटव्ह आला आहे. त्यामुळे, अकोले तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1 हजार 399 झाली आहे.

तर संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसा येथे 19 व 17  वर्षींय तरुणी, 57 वर्षींय पुरुष, निमगाव टेंभी येथे 11 वर्षींय बालक, 16 वर्षींय तरुणी, निमगाव पागा येथे 55 वर्षींय पुरुष, 46 वर्षींय महिला, 24 वर्षींय पुरुष, शिवाजी नगर येथे 51 वर्षींय पुरुष, घुलेवाडीत 21 वर्षींय तरुण, ओझर खुर्द येथे 27 वर्षींय पुरुष, 20 वर्षींय बालिका, चिखलीत 17 व 14 वर्षींय बालक, 55 व 39 वर्षींय पुरुष, सायखिंडीत 45 वर्षींय महिला, 22 वर्षींय तरुणी, 12 वर्षींय बालिका, माळेवाडीत 65च वर्षींय पुरुष, झोले येथे 51 वर्षींय पुरुष, चंदनापुरीत 36 वर्षींय पुरुष, झोले येथे 45 वर्षींय महिला, 26 वर्षींय तरुण, 2  वर्षींय बालक, घारगाव येथे 36 व 54 वर्षींय पुरुष, प्रतापपूर येथे 50 वर्षींय महिला, तिगाव येथे 24 वर्षींय तरुणी, इंदिरानगर येथे 24, 20 वर्षींय तरुण तर 40 वर्षींय महिला, घुलेवाडीत 35 वर्षींय पुरुष, देवकौठे येथे 55 वर्षींय महिला, निमोण येथे 33 वर्षींय पुरुष, सांगवी येथे 42 वर्षींय पुरुष, गुंजाळवाडी येथे 60 वर्षींय पुरुष, साकुर येथे 35 वर्षींय पुरुष, साईनगर येथे 52 वर्षींय पुरुष, पंचायत समिती समोर संगमनेर येथे 50 वर्षींय पुरुष, बस स्थानक समोर 27 वर्षींय तरुणी, जय प्रकाश रोड येथे 73 वर्षींय पुरुष व आश्वी बु येथे 24 वर्षींय तरुण अशा 45 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आज अहमदनगर जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार आज ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४६०० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७६ आणि अँटीजेन चाचणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पाथर्डी ०३, राहुरी ०२, संगमनेर ०१, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०६, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०३  अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १७६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५२,

अकोले ०१, जामखेड ०४, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १७, नेवासा १५, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता १२, राहुरी १३, संगमनेर ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २७४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले २८, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ०४, पाथर्डी २२, राहाता २१, राहुरी ०२, संगमनेर ३८, शेवगाव २०, श्रीगोंदा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ५१८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १०१, अकोले ०३, जामखेड ४४, कर्जत २१,  कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ४५, नेवासा ४४, पारनेर ३५, पाथर्डी ०६, राहाता २८, राहुरी ३४, संगमनेर ४२, शेवगाव ०३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ६२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या आता ३६ हजार ६७५, उपचार सुरू असलेले रूग्ण ४ हजार ६०० तर मृत्यू झालेले रुग्ण ६८४ इतके आहे. तर एकूण रूग्ण संख्या ४१ हजार ९५९ इतके आहेत.