टिंग होऊन धटींग, जातीय वादातून कुर्‍हाडीने घाव घातला.! महिला जखमी गुन्हा दाखल....

सार्वभौम (संगमनेर) :- 

                   संगमनेर खुर्द येथे सिद्धकला हॉस्पिटल समोर जातीय कारणाहून दोन गटात वाद झाला. यात एका व्यक्तीने महिलांसह तरुणांना जातीय शिवीगाळ करत कुर्‍हाडीने मारहाण केली. यात कलावती दामोदर झालटे (संगमनेर खु) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तर याप्रकरणी मनिषा राजू कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर पोलीस ठाण्यात नंदु वाल्मिक गांजवे (वय 26 संगमनेर खु) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कलावती झालटे ही महिला संगमनेर खुर्द परिसरात राहते. त्यांचे नंदु वाल्मिक गांजवे याच्यासोबत किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर गांजवे यांने दारुच्या नशेत येवून कदम यांना शिवीगाळ दमदाटी सुरू केली. तो म्हणाला की, तुमच्या येथे खालच्या जातीचे लोक राहतात, त्यामुळे तुमची येथे राहण्याची लायकी नाही. ये खालच्या जातीच्या लोकांनो मला सकाळी-सकाळी तुमचे तोंड दाखवत जाऊ नका. तुमची लायकी आहे का? तुम्हाला तर येथून हाकलून दिले पाहिजे. असे म्हणत त्याने अधिक शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केली. 

दरम्यान त्याला काही लोक समजून संगत होते. मात्र, गांजवे यांने कोणाचे एकले नाही. तर तो रागाच्या भरात घरात गेला व त्याने घरातील कुर्‍हाड आणून मनिषा राजू कदम यांची आई कलावती दामोदर झालटे यांच्या पायावर वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर या घटनेची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान संबंधित जखमी महिलेस रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखळ करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत हे करीत आहेत.

दरम्यान जग कोठून कोठे चालले आहे. तरी देखील काही समाजकंठकांच्या मस्तकातून जात ही हद्दपार व्हायला तयार नाही. त्यामुळे, दुर्दैवाने अशा घटनांमुळे, समाजात तेढ निर्माण होण्यास खतपाणी मिळते आहे. हा प्रकार कोठेतरी थांबवायचा असेल तर खरोखर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तर जे लोक अशा कायद्याचा गैरवापर करतात त्यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षीत आहे. मात्र, दुर्दैवाने येथे अशा गुन्ह्यांचा सखोल तपास होत नाही. त्यामुळे, अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागण्याचे प्रमाण अगदी अत्याल्प आहे. विशेष म्हणजे हे तपास पोलीस उपाधिक्षक यांच्यासारख्या वरिष्ठ लेवलच्या दर्जाच्या अधिकार्‍यांकडेच देण्याची तरतूद आहे. मात्र, दुर्दैवाने कागदावर अधिकारी आणि वास्तवत: तपास एखादा कॉन्स्टेंबल करतो. असे देखील अनेकदा निदर्शनास आले आहे. अशा गोष्टींवर आवाज उठविण्यापेक्षा पुढारी तडजोडी करण्यात मशगुल असल्याची टिका त्यांच्यावर होताना दिसत आहे.