संगमनेरात 40 तर अकोल्यात 38 रूग्ण, तो पळून गेला आणि सापडलाही प्रशासन गुन्हा ठोकणार.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर मध्ये आज पुन्हा कोरोनाची मोठी संख्या मिळवून आली. आज तालुक्यात 35 तर शहरात 5 रुग्ण आढळुन आले आहे. मागील महिन्यात रोज 25 ते 30 रुग्ण आढळुन येत होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत 40 ते 50 च्या दरम्यान आढळुन येत आहे. त्यामुळे संगमनेर मध्ये रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीस शहरात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळुन आली होती. परंतु त्याच्या दुप्पट संख्या आजमितीला ग्रामीण भागात आढळुन येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अकोले तालुक्यात 38 रुग्णांची भर पडली आहे. तर काल मुळ औरंगपूर व सध्या इंदोरी येथे राहणार्या 44 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाल्याची माहिती हाती आली आहे. रॅपीड अॅन्टीजन टेस्टनुसार 34 तर खाजगी रुग्णालयातून चार अशा 37 जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तालुक्याची संख्या 1 हजार 278 इतकी झाली आहे.
आज शहरातील नेहरू चौक येथे 26 वर्षीय पुरुष तर स्वामी समर्थ येथे 33 वर्षीय पुरुष व गणेश नगर येथे 20 वर्षीय युवती तर नवघरगल्ली येथे 35 वर्षीय पुरुष व जनता नगर येथे 40 वर्षीय पुरुष तर तालुक्यात आज आश्वि बु येथे 35 वर्षीय महिला तर पेमरेवाडी येथे 15 वर्षीय युवती व कौठे बु येथे 55वर्षीय पुरुष तर चिंचपूर येथे 20 वर्षीय युवक व हिवरगाव पठार येथे 85 वर्षीय वयोवृद्ध तर तळेगाव येथे 46 वर्षीय, 19 वर्षीय, 15 वर्षीय पुरुष आणि 72 वर्षीय व 50 वर्षीय महिला वडगाव पान येथे 48 वर्षीय महिला रायतवाडी येथे 29 वर्षीय महिला तर पेमगिरी येथे 75 वर्षीय वयोवृद्ध व 57 वर्षीय महिला तर संगमनेर खुर्द येथे 69 वर्षीय पुरुष तर सांगवी येथे 60 वर्षीय महिला व रायतवाडी येथे 55 वर्षीय पुरुष व लोहरे येथे 73 वर्षीय पुरुष आणि घुलेवाडी येथे 40 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष तर सावरगाव तळ येथे 70 वर्षीय व 73 वर्षीय वयोवृद्ध तर मालदड येथे 54 वर्षीय पुरुष व धांदरफळ बु येथे 53 वर्षीय महिला व हिवरगाव पावसा येथे 26 वर्षीय युवक व राजापूर येथे 38 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडी येथे 37 वर्षीय व 38 वर्षीय महिला व निमगाव भोजापुर येथे 40 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला तर घुलेवाडी येथे 43 वर्षीय महिला व निमगाव भोजापुर येथे 58 वर्षीय महिला तर कनोली येथे 33 वर्षीय पुरुष व निमगाव जाळी येथे 57 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील एकुण कोरोनाबधितांची संख्या 2 हजार 806 वर जाऊन पोहचली आहे. तर 35 जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर आज अखेरपर्यंत 2 हजार 526 जणांनी उपचार घेऊन ठणठणीत झाले आहे.
दरम्यान उद्या गुरूवार दि. 24 रोजी दुपारी 12 वाजता तहसिलदार मुकेश कांबळे तसेच आ. डॉ. किरण लहमटे यांच्या समन्वयाने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात ते तालुक्यात सध्या कोविडची काय परिस्थिती सुरू आहे त्याचा वृत्तांत सर्वांसमोर मांडणार आहे. तर तालुक्यासाठी काय केले पाहिजे. यांचे सजेशन वेगवेगळ्या विचारांतून स्विकारले जाणार आहे. तालुका हे माझे कुटुंब आहे. तर ते संभाळ्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यामुळे, तालुक्यातील तमान लोकांना प्रशासन आवाहन करणार आहे. तर काल सायंकाळी एक तरुण पॉझिटीव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमधून पळून गेला होता. त्यानंतर आरोग्य विभागाची धंदळ उडाली होती. मात्र, चौकशी केल्यानंतर एक वेगळीच माहिती आती आली. दरम्यान यावर वरिष्ठांना कळविले असता त्यांना सांगितले की, तो हजर झाला नाही तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा. त्यामुळे, या तरुणावर गुन्हा दाखल होतो की नाही. हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आज अकोले तालुक्यात कळस येथे 42 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 59 वर्षीय पुरुष, अकोल्यात 56 वर्षीय पुरुष, राजूर येथे 18 वर्षीय बालक, 21 वर्षीय तरुणी, 42 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 65 वर्षीय महिला, गणोरे येथे 38 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 60 वर्षीय महिला, कोतुळ येथे 50 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 55 वर्षीय पुरुष, अकोल्यात 56 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, रुंभोडीत 45 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 55 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 31 व 30 वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे 25 वर्षीय तरुणी, अकोल्यात 21 वर्षीय तरुणी, 29 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुणी, 13 व 10 वर्षीय मुलगी, कोतुळ येथे 50 व 48 वर्षीय पुरुष, 16 व 20 वर्षीय बालिक, 45 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय बालक, 28 वर्षीय तरुणी, 60 वर्षीय महिला अशा एकूण 38 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.