संगमनेरात आज 37 रुग्ण तर एका मयत.! अकोल्यात 18 रुग्णांची भर.! शहरात पुन्हा रुग्ण.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात पुन्हा 37 रुग्णांची भर पडली आहे. तर समनापूर येथे राहणार्या एका 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच अकोल्यात 18 रुग्ण नव्याने मिळून आले आहेत. त्यामुळे येथील कोरोना बाधितांची संख्या आता 575 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान अकोले तालुक्यात जे काही स्वॅब घेतले जातात त्यापैकी आता बहुतांशी अहवाल हे निगेटीव्ह येत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे तालुक्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. तर संगमनेर तालुक्यात कोरोनाचा रोज कहर सुरूच आहे. त्यामुळे आत 37 रुग्णांसह कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 199 पर्यंत जाऊन पोहचली आहे.
संगमनेरात आज खराडीत 46 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरूणी, पिंपळगाव कोंझिरे येथे 65 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला, निमोण येथष 61 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय तरुण व 30 वर्षीय तरुण, समनापूर येथे 60 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, चार वर्षीय बालक, 35 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक, 61 वर्षीय महिला, कुरकुटवाडी येेथे 68 वर्षीय पुरुष, सारोळा पठार येथे 30 वर्षीय पुरुष, निमोण येथे 65 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे 50 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे 36 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, संगमनेर बाजारपेठ येथे 67 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 37 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुणी, जानकी नगर येथे 37 वर्षीय पुरुष, चिखली येथे 51 वर्षीय पुरुष, कामगार वसाहतीत 36 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे 66 वर्षीय पुरुष, अंभोरे येथे 36 वर्षीय पुरुष, संगमनेरच्या प्रायव्हेट लॅबमध्ये 48 वर्षीय पुरुष, वाघापुर येथे 74 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे 18 व 12 वर्षीय बालक, नांदुर खंदुरमाळ येथे 50 वर्षीय पुरुष, कुरकुटवाडी येथे 47 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय बालक तर चिंचोली गुरव येथे 34 वर्षीय पुरुष अशा 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
तर अकोले तालुक्यात आज 18 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरातील देवठाणरोड वरील 41 वर्षीय पुरूष, धामणगाव आवारी येथे 37 वर्षीय महीला, गर्दणीत 58 वर्षीय महीला, 32 वर्षीय महीला, कुंभेफळ येथे 39 वर्षीय पुरूष, 31 वर्षीय महीला, 52 वर्षीय महीला, 53 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, कळस येथे 48 वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथे 68 वर्षीय पुरुष, कारखानारोड येथे 31 वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथे 60 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला, व 09 महिण्याचा चिमुरडा, धुमाळवाडीत 62 वर्षीय पुरूष, कळस येथे 38 वर्षीय पुरूष, शहरातील पेट्रोल पंपाजवळ 58 वर्षीय पुरूष अशा एकूण 18 व्यक्ती कोरोना बाधित मिळून आल्या आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील आजवर 575 रुग्णसंख्या झाली आहे.