अकोल्यात 20 पेक्षा जास्त व्यापार्‍यांसह 58 पॉझिटीव्ह.! संगमनेरचे लोक अकोल्यात पॉझिटीव्ह.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   अकोले तालुक्यात आज भल्याभल्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. केवळ व्यापार्‍यांची तपासणी करून निव्वळ शहरात 467 संशयितांची तापासणी करण्यात आली होती. त्यात 38 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर आज संपुर्ण तालुक्यात 687 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 58 जण पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. या 58 मध्ये संगमनेर तालुक्यातील 4 असून अकोले तालुक्यात आज 54 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात आज 1 हजार 453 रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे, तालुक्यात स्वॅबच्या तुलनेत पॉझिटीव्ह संख्या कमी असल्याचे दिसते आहे.

आज अकोले तालुक्यात कोतुळ येथे 45 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 19 व 14 वर्षीय मुली, 38 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, अकोले येथे 38 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, नवलेवाडीत 45 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 29 वर्षीय तरुण, कोतुळ येथे 37 वर्षीय पुरुष, अकोले येथे 40 व 80 वर्षीय पुरुष, कळस येथे 55 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 9 वर्षीय बालिका, अकोल्यात 21 वर्षीय तरुणी, विरगाव येथे 63 वर्षीय महिला, अकोल्यात 36 वर्षीय महिला, तांभोळ येथे 29 वर्षीय महिला, अकोल्यात 29 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, पिंपळदरी येथे 32 वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे 17 वर्षीय तरुण, 67 वर्षीय महिला, कळंब येथे 72 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय बालिका, 36 वर्षीय पुरुष, अकोले येथे 54 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरुणी, 59 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 69 वर्षीय पुरुष, अकोल्यात 24 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, 23 व 25 वर्षीय तरुणी, 49 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुण, 49 व 50 वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे 21 वर्षीय तरुण, देवठाण येथे 30 वर्षीय पुरुष, राजूर येथे 44, 40 व 33 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 45 व 48 वर्षीय महिला, निमगाव पागा (संगमनेर) येथे 50 व 38 वर्षीय महिला, धांदरफळ येथे 37 वर्षीय पुरुष, संगमनेर धांदरफळ येथे 35 वर्षीय महिला, अशा 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर संगमनेर तालुक्यात सायखिंडी येथे काल 40 पुरुषाचा बळी गेला होता. दुर्दैवाने आज तेथे पुन्हा 50 वर्षीय पुरुषाचा बळी गेला आहे.

दरम्यान आज काही व्यापार्‍यांच्या तापसण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 20 पेक्षा जास्त व्यापारी पॉझिटीव्ह आले आहे. तर त्यांच्या हाताखाली जे काही कर्मचारी आहे. त्यांचे देखील अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. म्हणजे फक्त शहरात 467 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 38 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर अन्य तालुक्यातून मिळून आले आहे. विशेष म्हणजे व्यापार्‍यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याचे खरोखर कौतुक केले पाहिजे. वास्तवत: राजकीय अजेंड्याखाली बंदचा झेंडा मिरविण्यापेक्षा स्वॅब देऊन स्वत:चा आरोग्य संभाळण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ६०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४१५ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले १४, जामखेड ०१, कर्जत ०२, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०३, संगमनेर ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३१,

अकोले ०३, जामखेड ०३, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०४, पारनेर ०४, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी ०९, संगमनेर ०४, शेवगाव ०६, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४१५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले ४५, जामखेड ३१, कर्जत ३३, कोपरगाव २६, नेवासा ३६, पारनेर २७, पाथर्डी १५, राहाता ५६, राहुरी १२, संगमनेर ४६, शेवगाव १४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३० आणि कॅन्टोन्मेंट ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८५६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा २३५, अकोले ४२, जामखेड ४७, कर्जत २१,  कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ३९, नेवासा ३९, पारनेर ४४, पाथर्डी ३५, राहाता ५४, राहुरी ५४, संगमनेर ७४, शेवगाव २९, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर ४२, कॅंटोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल २१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या ३७ हजार ५३१ असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ३३४ आहे. मृत्यू झालेली संख्या ६९४ असून  आजवर एकूण रूग्ण संख्या ४२ हजार ५५९ इतकी आहे.