राजूरमध्ये कोरोनाचा 16 वा बळी.! अकोल्यात 61 रुग्ण, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व भाजपचा नगरसेवक बाधित.! संगमनेरात 64 रुग्ण वाढले.!

 सार्वभौम (अकोले) :- 

                   अकोले शहर बंद केल्यानंतर आजही कोरोनाचा हाहाकार दिसून आला. विशेष म्हणजे एका नगरसेवकास कोरोनाची बाधा होऊन देखील ते अकोले बंद करण्यात दंग होते. जेव्हा दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तेव्हा त्यांना काढता पाय घेतला. म्हणजे ज्यांनी बंदचा घाट घातला त्यांच्याकडूनच बेफीकीरी वर्तन पहावयास मिळाले. त्यामुळे, त्या नगरसेवकाच्या सानिध्यात असणारे चार पाच नगरसेवक जे दुकाने चालु ठेवणार्‍यांना बंद करण्यासाठी धिटाई करीत होते. तर कोणी विरकोळ विक्रेत्यांचे हेळसाड करताना दिसून आले. ते देखील दुपारपर्यंत या बाधित व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे दिसून आलेल्याचे बोलले जात आहे. अकोले बंद करणे ही सामजिक नव्हे तर एक प्रकारे प्रतिष्ठेची आणि आस्मितीची लढाई असल्याचे अनेकांच्या वर्तनातून दिसून आले. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, भल्याभल्यांचे धाबे दणाणले आहेत. तर या व्यतिरिक्त कोरोना आता पोलीस ठाण्यात जाऊन पोहचला आहे. अकोले पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, भल्याभल्यांना पळता भूई थोडी करणार्‍या पोलिसांना आता कोरोनाने पडता भूई थोडी केली आहे. त्यामुळे, अकोले पोलीस ठाण्यात आता प्रत्येकजण आपापली काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तर एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज 61 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून राजूरमध्ये आणखी एका कोरोना बाधित महिलाचे मृत्यू झाला आहे.

आज सोमवार दि. 14 रोजी राजूर येथे एका 75 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आजच राजूर येथे ग्रामीण रुग्णालय रुग्णालय येथे अनेक रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात राजूर येथे 47 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 86 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगी, 35 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, असे 14 रूग्ण आढळून आले आहेत. तर पाडाळणे येथे 27 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला अशे दोन रूग्ण आढळून आले आहेत. आदिवासी भागातील गोंदोशी येथे 24 वर्षीय पुरुष आढळून आला आहे. तर राजूर मध्ये जास्त रूग्ण भेटत असल्यामुळे राजूर मधील व्यापारी असोसिएशन ने 16 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2020 पर्यंत राजूर मधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी असो.च्या सदस्यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली आहे.

                     तर अकोले तालुक्यात बेलापूर येथे 45 वर्षीय पुरुष, मन्याळे येथे 32 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 45 वर्षीय पुरुष, समशेरपुर येथे 48 वर्षीय पुरुष, नागाची वाडी 52 वर्षीय पुरुष, पानसरवाडी येथे 56 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका, अकोले येथे 23 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 25 वर्षीय तरुणी, 51 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरूणी व अवघ्या 2 वर्षीय बालक, 27 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तीन तरुण, बोरी वाघापूर येथे 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मोग्रस येथे 28 वर्षीय तरुणी, शेरणखेल येथे 34 वर्षीय पुरुष, अकोले येथे 51 वर्षीय पुरुष, वाशेरे येथे 50 वर्षीय महिला, अकोले येथे 52 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय मुलगा व 22 वर्षीय तरूणी, इंदोरी येथे 38 वर्षीय पुरुष, लहित खु येथे 35 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 42 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालिका, नवलेवाडीत 36 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनीत 33 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 33 वर्षीय पुरुष, पारधे हॉस्पिटल येथे 20 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 15 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर 30 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 25 वर्षीय पुरुष अशा 61 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

दरम्यान राजूर बंद करण्याच्या निर्णयाहून वाद उभा राहिला आहे. प्रत्येकवेळी व्यापार्‍यांच्या नावाने गावं बंद करण्याचा घाट घातला जातो. मात्र, खरा बंद हा व्यापार्‍यांच्या नावाखाली नको तर तो ग्रामस्थांनी पुकारला पाहिजे. पत्रकं काढताना देखील ग्रामस्थ किंवा नागरिक यांचा बंद असायला हवा. कारण, कोणातरी चार जणांना वाटते गाव बंद करायचे, ते एका खोलीत बसतात आणि सोशल मीडियात टुमकं टाकून देतात. यापेक्षा तुम्ही जनता कर्फ्यु म्हणता मग जनतेला का विश्वासात घेत नाही? लोकप्रतिनिधी आणि काही नागरिकांना का विचारत नाही? असा सवाल पुढे आला आहे. त्यामुळे, आता जनता कर्फ्यु म्हणाल तर तो व्यापारी म्हणून नाही तर जनतेच्या नावाने पत्रक काढून आवाहन केले जावे. अशी प्रतिक्रिया राजुरकरांनी दिली आहे. त्यामुळे, अकोल्या प्रमाणे राजुरचे लॉकडाऊन देखील वादाच्या भोवर्‍यास सापडल्याचे दिसते आहे. अर्थात या मागणीला आणि मुद्द्याला अनेकांनी सपोर्ट केल्याचे दिसून आले आहे.  तर राजूर मध्ये जास्त रूग्ण भेटत असल्यामुळे राजूर मधील व्यापारी असोसिएशन ने 16 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2020 पर्यंत राजूर मधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती व्यापारी असो.च्या सदस्यांनी दिली आहे.

             तर संगमनेर तालुक्यात गुंजाळवाडीत 40 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण, 24 वर्षीय तरुण, 4 वर्षीय दोन मुले, 35 वर्षीय महिला, 7 व 5 वर्षीय मुलगा, 50 वर्षीय पुरूष, निमगाव जाळीत 50 वर्षीय पुरूष, आश्वी बु येथे 30 वर्षीय पुरूष, कनोलीत 23 वर्षीय पुरूष,  चिंचपूरात 44 वर्षीय पुरूष, 70 व 75 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 23 वर्षीय पुरूष, ओझर खुर्द येथे 37 वर्षीय पुरूष, समानापूर येथे 21 वर्षीय  तरूणी, शेडगाव येथे 21 वर्षीय पुरूष, उंबरी वाघापूर येथे 35 वर्षीय पुरूष, साकुर येथे 65 वर्षीय महिला, वनकुटे 19 वर्षीय तरुणी, जवळे कडलग येथे 39 वर्षीय महिला, वेल्हाळे येथे 50 वर्षीय महिला, 9 व 6 वर्षीय मुली, संगमनेर खुर्द 65 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय महिला, शिबलापूर येथे 38 वर्षीय पुरूष, घुलेवाडीत 65 वर्षीय महिला, रंगारगल्लीत 47 वर्षीय पुरूष, मोमिनपुरा संगमनेरात 36 वर्षीय महिला, गुंजाळवाडीत 19 वर्षीय तरुण, मेनरोड संगमनेर येथे 59 वर्षीय पुरूष, इंदिरानगर येथे 30 वर्षीय पुरूष, चंदनापुरीत 75 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय मुलगी, सावरगाव तळे येथे 43 वर्षीय पुरूष,  अकलापूर येथे 39 वर्षीय पुरूष, झोले येथे 37 वर्षीय पुरूष, कौठे खु येथे 70 व 39 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरूण, 42 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय मुलगा व 18 वर्षीय मुलगी, सादतपूर येथे 47 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, आश्वी बु येथे 37 वर्षीय पुरूष, मनोलीत 26 वर्षीय पुरूष, 16 वर्षीय मुलगा, वडगाव पान येथे 39 वर्षीय पुरूष, आंभोरे येथे 27 वर्षीय पुरूष, आश्वी बु येथे 63 वर्षीय पुरूष, गुंजाळवाडीत 41 वर्षीय पुरूष, चौव्हाणपुरा संगमनेर येथे 47 वर्षीय महिला, घुलेवाडीत 18 वर्षीय मुलगी, निमोण येथे 40 वर्षीय महिला, शिरापूर येथे 45 वर्षीय पुरूष, जवळे कडलग येथे 15 व 19 वर्षीय मुली व 45 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरूष असे एकूण 64 रुग्ण संगमनेर तालुक्यात मिळून आले आहेत. त्यामुळे येथे बाधितांची संख्या 2 हजार 385 वर गेली आहे.