बेजबाबदारपणाचा कळस.! संगमनेरात 24 तासात 84 रुग्ण.! कोरोनाचे विसर्जनासाठी जबाबदारीचे भान हवे.!
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आत्मिचिंतन करावे अशी काल एका दिवसाची (84) आकडेवारी आहे. म्हणजे काही जिल्ह्यात आजवर इतके रुग्ण नाही. तितके संगमनेर तालुक्यात एका दिवशी मिळून येऊ लागले आहे. या आकडेवारीमुळे खरोखर चिंता आणि शंकाही उपस्थित होऊ लागली आहे. मात्र, यावर आता एकच उपाय आहे. तो म्हणजे प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीची काळची घेणे. विशेष म्हणजे जेव्हा 2019 साली एच 1 एन 1 हा (स्वाईन फ्ल्यु) आला होता. तेव्हा ज्यांना कोणाला दमा, कफ, निमोनिया यांची लक्षणे दिसून येत होती. त्यांना स्वाईन फ्ल्यु झाल्याचे डिक्लेर केले जायचे. आता देखील असाच काहीसा प्रकार समोर येऊ लागला आहे. पुर्वी जे लोक वर्षानुवर्षे आजाराने ग्रासलेले आहे. त्यांना जरा देखील त्रास होऊ लागला की, त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येऊ लागले आहे. त्यामुळे, जो व्यक्ती घराबाहेर पडला नाही तो बाधित झाला कसा? तर आजकाल ज्यांना अक्षरश: कोणतेही सिमटन्स नाहीत, त्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येऊ लागले आहे. नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तरी माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली आणि ते घरी होमक्वारंटाईन होतात कोठे नाहीतर त्यांच्या बदलीचे आदेश निघतात. हे किती हस्यास्पद आहे. त्यामुळे, हा कोरोना म्हणजे एकीकडे काहींच्या कमाईचा व्यवसाय झाला आहे, तर काही ठिकाणी त्याचा राजकारण म्हणून वापर केला जात आहे. हे लोक या आजाराला कसेही ट्रीट करीत असले तरी कोरोना मात्र कोठे थांबायला तयार नाही.
आता संगमनेरसारख्या ठिकाणी 6 हजार 521 तपासण्यांमध्ये 1 हजार 515 रूग्ण मिळून यावेत ही खेदाची बाब आहे. तर एकाच दिवशी 84 रुग्ण मिळून आले म्हणजे या तालुक्यात लोकांनी कोरोनाची स्थापना केली आहे की काय? असे वाटू लागले आहे. ही अकडेवारी पाहिली तर खरोखर तालुक्यात अँन्टीजन टेस्टपेक्षा अवेरनेसची गरज आहे. त्यासाठी प्रशासन आणि स्थानिक गाव पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे वाटू लागले आहे. खरंतर रुग्ण मिळून येणे हे प्रशासनेचे आता चांगले काम म्हणावे लागेल. कारण, जोवर रूग्ण सापडत नाही, तोवर संसर्ग होण्याचे टळत नाही. त्यामुळे, ज्यांना प्रादुर्भाव झाला आहे. त्यांनी आपण कोणाच्या संपर्कात येणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. तर आजवर संगमनेरमध्ये 27 जणांची कोरोनापुढे गुढगे टेकले आहे. ही केवळ कागदावरची आकडेवारी आहे. वास्तवत: अनेकजण मयत झाले त्यांचा थांगपत्ता नाही. या दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. की, अनेक बालक, तरुण आणि वृद्धांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, तरुणांमध्ये मयत होण्याचे प्रमाण अगदी काहीच नाही तर बालकांमध्ये देखील नाही. मात्र, वयस्कर मानसे कोरोनाच्या मृत्युला सामोरे जाण्यापेक्षा त्यांचा बिपी हाय होणे, हार्टअटॅक येणे यातूनच ते मयत होणाताना दिसत आहे. त्यामुळे, या रुग्णांना डॉक्टरांनीच समजून सांगणे गरजेचे आहे.
सकाळी...
आता गेल्या 24 तासात संगमनेरात काल सकाळी 19, सायंकाळी 43 तर रात्री उशिरा 22 असे 84 रुग्ण मिळून आले आहेत. ही एका दिवसाची आकडेवारी तालुक्यासाठी फार धोकादायक आहे. काल संगमनेरात सकाळी 19 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात गोरक्षवाडी येथे 68 वर्षीय व 28 वर्षीय पुरुषाला तर 34 वर्षीय महिला व 9 वर्षीय बालीकेस कोरोनाची बाधा झाली आहे. तर रहीमपूर येथे 65 वर्षीय महिला व 11 बालिकेस कोरोनाची बाधा झाली आहे. तर चिकणी येथे 53 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर राजापूर येथे 21 दिवसाच्या चिमुरडीस कोरोनाची बाधा झाली आहे. तर संगमनेर खुर्द येथे 32 वर्षीय पुरुष व निमगाव टेंभी येथे 26 वर्षीय तरुण व 2 वर्षीय बालकास कोरोनाची बाधा झाली आहे. तर पानोडी येथे 65 वर्षीय पुरुषास व 20 वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाली आहे. तर गुंजाळवाडी येथे 52 वर्षीय व 8 वर्षीय बालक आणि 16 वर्षीय युवती व 43 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे 40 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय व 57 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर चंदनापुरी येथे पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये दोन पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे.
सायंकाळी...
तर यानंतर कालच सायंकाळी 43 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यात जनतानगर येथे 48 वर्षीय, 26 वर्षीय व 19 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर खंडोबागल्ली येथे 36 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर साळीवाडा येथे 78 वर्षीय वयोवृद्धास व चैतन्यनगर येथे 65 वर्षीय महिला तर माळीवाडा येथे 55 वर्षीय व 26 वर्षीय आणि 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर उपासनी गल्ली येथे 75 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज तालुक्यात 32 रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये कुरकुटवाडी येथे 46 वर्षीय महिला तर वडगावपान येथे 21 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर मेंढवन येथे 30 वर्षीय महिला व 34 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे.
रात्री उशिरा...
तर कालच रात्री उशिरा आलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील 22 रुग्ण नव्याने कोरोनाबाधीत आढळून आले आहे. त्यामुळे काल तब्बल 84 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहे. त्यामध्ये गीरीराज कॉलनी येथे 64 वर्षीय पुरुष तर वकील कॉलनी येथे 54 वर्षीय पुरुष व नेहरू चौक येथे 48 वर्षीय पुरुष तर रेहमतनगर येथे 70 वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर इंदिरानगर येथे 41 वर्षीय पुरुष स्वामी समर्थनगर येथे 68 वर्षीय व 69 वर्षीय पुरुष तर 60 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर गणेश विहार कॉलनी येथे 56 वर्षीय पुरुष तर श्रीराम कॉलनी येथे 57 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर इंदिरानगर येथे 46 वर्षीय व 56 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर तालुक्यात 8रुग्ण आढळुन आले आहे यामध्ये तळेगाव 72 वर्षीय पुरुष तर गुंजाळवाडी येथे 27 वर्षीय युवक व नांदुरीदुमाला येथे 35 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी पुन्हा कोरोनाच्या रडारवर आहे. घुलेवाडी येथे 69 वर्षीय महिला व55वर्षीय पुरुषाला व निमगावजाळी येथे 32 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाबधितांची संख्या दिवसागणिक वाढून 1 हजार 515 वर जाऊन पोहचली आहे.तर कोरोनाशी झुंजताना 27 जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
तर अकोले तालुक्यात अगस्ति साखर कारखाण्याच्या वतीने शंभर बेड देण्यात आली. त्याची पाहणी संचालक अशोकराव देशमुख यांच्यासह प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार मुकेश कांबळे यांच्यासह महसूल अधिकार्यांनी केली. ही तालुक्यासाठी महत्वाची बाब ठरली आहे.महत्वाचे..
अकोले शहरासाठी महत्वाची सुचना..!
तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोले नगरपंचायतीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या अकोले शहरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विनाकारण गर्दी करू नये. तसेच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. शहरात फिरताना 100 टक्के मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. शहरातील व्यापारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच वय वर्षे 60च्या पुढील नागरिक व वय वर्षे 10 च्या आतील मुलांनी घराबाहेर पडू नये. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर विसर्जनवेळी गर्दी टाळणेकरीता अकोले नगरपंचायत मार्फत शहरातील प्रमुख ठिकाणी घरगुती व सार्वजनिक गणेश मुर्तीचे एकत्रीकरण करुन विधिवत विसर्जन करणेबाबत नियोजन करणेत आलेले आहे. त्यासाठी निर्धारीत केलेल्या जागांमध्ये अकोले शहरातील महात्मा फुले चौक, अगस्ती कमान, व नवलेवाडी फाटा अशी ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. तरी अकोले नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी आपले घरातील गणेश मुर्ती या ठिकाणी आणुन द्याव्यात. अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 11.00 वाजेपासून ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत सदर ठिकाणी ट्रॅक्टर व ट्रॉली उभे केले जाणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकार विक्रम जगदाळे यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली.
सागर शिंदे
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 87 लाख वाचक)