राजुरच्या पीडब्लुडी कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू.! अकोल्याच्या कोतुळचा सहावा बळी.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील राजूर येथे पीडब्लुडी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या 34 वर्षीय युकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. आज सकाळी ही माहिती अकोले आरोग्य प्रशासनाला मिळाली असता कोतुळ आणि राजूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाच्या मृत्युनंतर अकोल्यात मृतांची संख्या सहावर गेली आहे. तर बाधित संख्या २०५ पर्यंत जाऊन पाहचली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोतुळ येथील ३४ वर्षीय तरुण राजुरच्या प्रकल्प कार्यालयात अनुकंप तत्वावर लागला होता. तोगेली चार वर्षे त्याने अगदी उल्लेखनिय कामगिरी केली होती. जेव्हा त्यास कोरोनाची बाधा झाली त्यापर्वी तो अगदी प्रामाणिकपणे फिरतीवर काम करीत होता. त्या दरम्यान किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यास कोरोनाची बाधा झाली असावी असे बोलले जात आहे. त्यामुळे कालच्या सात तारखेला त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला असता त्याने संगमनेर येथे एका खाजगी लॅबमध्ये काही तपासण्या केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, कालपासून त्यास अधिक त्रास होऊ लागल्यामुळे त्याला आज (दि.9) सकाळी मृत्युला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात कोणकोण आले होते. तो कामावर असताना कोणी संपर्कात होते का? अशा प्रकारचा शोध घेणे प्रशासनाने सुरु केले आहे. मात्र कोणीही घाबरुन जाता स्वत:ची काळजी घ्यावी, जे संपर्कात होते त्यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन होऊन घ्यावे, गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान काल राजूर येथे कॉलेज रोड परिसरातील शिक्षक कॉलनी मधील एक शिक्षक कोरोणा बाधित झाले होते. काल त्यांचा अहवाल कोरोणा पॉझीटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी पुढे हलवण्यात आले आहे ते राजूर येथील एका कॉलेज वर शिक्षक म्हणून कार्यरत होते, त्यापुर्वी त्यांची पत्नी कोरोणा बाधित झाल्याने त्यांची पण कोरोना टेस्ट केल्यावर यांचा पण अहवाल पण पॉझीटिव्ह आला होता तरी देखील राजूर येथील कॉलेज चालू आहे. फक्त प्राध्यापक व विज्ञान विभागातील परिचर यांना सूचित केले की, वर्क फ्रॉम होम करावे, महाविद्यालयात येऊ नये असे. तर बाकीचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कोरोना बाबतची सर्व प्रकारची स्वत: काळजी घेऊन कामावर उपस्थित राहावे. अशा सुचना देण्यात आल्या आहेत. या शिक्षकाला कोणीही क्वारंटाईन केले नाही तेथे आदिवासी भागातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यालयात येऊन गेले तरीही कॉलेज बंद केले नाही किंवा सॅनिटायझ केले नाही त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन केले नाही अशी माहिती स्थानिक व्यक्तींनी सार्वभौमपुढे मांडली आहे. यात कोणाची गैरसोय होऊ नये, मात्र कोरोनाचा प्रतिबंध हा सध्यातरी फार गरजेचे आहे. कारण, सर सलामत तो पगडी पचास अशा शब्दात सामान्य जनतेने राजुरकरांना सुचित केले आहे.
तर अहमदनगर जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ६ हजार २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७.३४ टक्के इतकी झाली आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ९३१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, संगमनेर ०१, राहाता ०१, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट ०१, नेवासा ०२, शेवगाव ०१ आणि कोपरगांव ०२ अशा ४१ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज एकूण ३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये, मनपा १७२, संगमनेर २३, राहाता ३, पाथर्डी २७, नगर ग्रा.१६, श्रीरामपूर १८, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २१, श्रीगोंदा १८, पारनेर १०, अकोले ४, शेवगाव १४, कोपरगाव ३९, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा ३८४ रुग्णांचा समावेश आहे. तर आजवर बरे झालेले एकूण रुग्ण ६ हजार २५० आहेत तर उपचार सुरू असलेले रूग्ण:२ हजार ९३१ आहेत. आजवर १०० रुग्णांनी आखेरचा श्वास घेतला आहे. तर एकूण रूग्ण संख्या:९ हजार २८१ इतकी झाली आहे.
- आकाश देशमुख
( ८० लाख वाचकांच्या पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा, ८८८८७८२०१०, ८२०८५३३००६)