आरे देवा.! येथे रोजच मानसे मरत आहेत, अकोले शहरात कोरोनाचा सातवा बळी.! घरातलाच गेला, कुटुंब मात्र निगेटीव्ह.!


सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात कोरोनाचा रोज एक बळी जाऊ लागला आहे. कारण, आता कारखाना रोड परिसरात राहणार्‍या 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने पुन्हा एक बळी गेली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आता बळींची संख्या सातवर गेली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 200 पेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे अकोल्यात एकीकडे बाधितांची संख्या कमी असली तरी बघता-बघता मयतांची संख्या सातवर गेली आहे. त्यामुळे, तालुक्यात कोरोनाच्या भितीने वातावरण पसरताना दिसत आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यात शहरातील भाड्यांच्या दुकानात कामाला असणार्‍या व्यक्तीच्या रुपापे पहिला बळी गेला. तर त्यानंतर लहित येथील तरुणाने कोरोनापुढे शरणागती पत्करली. त्या पाठोपाठ एक-एक करुन ही संख्या वाढत राहीली. तर त्यानंतर गेल्या चार दिवसांपुर्वी एका महिला नगरसेवकाच्या बहिनीने अखेरचा श्वास घेतला तर त्यांच्या पाठोपाठ दुसर्‍या दिसशी मोग्रस येथील रुग्णाने नाशिक येथे कोविड समोर हार पत्कारली. हे भय कमी होतेे कोठे नाहीतर लागेच राजूर येतील पीडब्ल्युडी खात्यात कामाला असणार्‍या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. आता त्यातून तालुका सावरतो कोठे नाहीतर लगेच कारखाना रोड परिसरात राहणार्‍या 50 वर्षीय व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात गेल्या चार दिवसात चार जणांचे बळी गेले आहेत. ही सर्वात मोठी शोकांतीका आहे.

दरम्यान मयत झालेला व्यक्ती ट्रॅक्टर चालक होता. त्यांना गेल्या काही दिवसांपुर्वी काही त्रास होऊ लागला असता त्यांना संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. त्यानंतर त्यांना संगमनेर डॉक्टरांनी जिल्हा रूग्णालयात पाठविले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना ते मयत झाले आहेत. आता यात सुदैवाची परंतु धक्कादायक बाब अशी की, घरातील एक व्यक्ती कोरोनाने मयत होतो. मात्र, त्यांना रुग्णालयात स्वत: घेऊन जाणारा व्यक्ती, त्याच्या घरातील आई व पत्नी यांचे रिपोर्ट तपासले असता ते सर्व निगेटीव्ह येतात. ही बाब प्रत्येकासाठी धक्कादायक आहे. त्यामुळे, मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे अनेक प्रश्नांचे जाब विचारले आहेत. मा, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्तर नाही. त्यामुळे, पुन्हा एकदा कोरोनाची संदिग्धता आणि त्याचे अस्तित्व यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.