संगमनेरात 22 तर अकोल्यात देखील कोरोनाचे तीन रूग्ण!

- आकाश देशमुख

सार्वभौम (संगमनेर/अकोले) :-

                                संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 18 रुग्ण मिळून आले आहेत. तर सकाळी चौघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आज दिवसभरात 22 रूग्ण कोरोनाबाधित मिळून आले आहेत. त्यात पिंपारणे, साळीवाडा, वडगाव पान, विद्यानगर, ढोलेवाडी, परदेशपुरा आणि वेल्हाळे यांच्यासह अन्य काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. तर अकोले तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण मिळून आले आहेत. त्यात देवठाण व खिरविरे अशा गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी धाव घेत संबंधित क्षेत्र कंटेनमेंट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

यात संगमनेर तालुक्यात पिंपारणे येथे 50 वर्षीय पुरुष, शहरातील साळीवाडा येथे 45 व 60 वर्षीय महिला तर अवघ्या 3 वर्षाची बालिका आणि 35 वर्षीय तरुण, तर वडगाव पान येथे 55 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे 52 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 26 वर्षीय तरुण, मोघलपुरा येथे 34 वर्षीय तरुणी, जनता नगर येथे 27 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथे 40 वर्षीय पुरूष, परदेसपुरा येथे 61 वर्षीय पुरुष तर 35 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय तरुण तसेच 14, 16, 09 वर्षीय मुलींचा सामावेश आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे 65 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. अशा 18 जणांचे रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर सकाळी सुकेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथे 45 वर्षीय पुरुष, मोगलपुरा येथे 33 वर्षीय पुरुष, अभंगमळा येथे 74 वर्षीय पुरुष यांचे अहवाल आले होते. त्यामुळे संगमनेरात कोरोना बाधितांची संख्या आता 1 हजार 24 पर्यंत जाऊन पोहचली आहे.

तर अकोले तालुक्यात हळुहळू कोरोनाचा प्रदुर्भाव वाढता असल्याचे दिसत आहे. आज (दि.10 ऑगस्ट) दुपारी खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये काही स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर त्यात देवठाण येथील 18 वर्षीय तरुण तर 24 वर्षीय महिला तर खिरविरे येथील 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात आता बाधितांची संख्या 208 झाली असून सात रुग्ण मयत झाले आहेत. तर जिल्हा प्ररशासनाकडून येणारे ४० ते ५० अहवाल अद्याप पेंडींग आहेत.

-  सुशांत पावसे