संगमनेरात आज १६ पॉझिटीव्ह तर अकोल्यात १९ बाधित.! एक मयत.!
- सुशांत पावसे
संगमनेर (सार्वभौम) :- संगमनेरमध्ये कोरोना आता थांबता थांबेना. काल ४० तर आज पुन्हा नव्याने १६ रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये शहरातील पाच रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये शहरातील जनतानगर येथील ४१ वर्षीय पुरुष व इंडिरानगर येथील २६ वर्षीय व ५० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर मालदड रोड येथे २६ वर्षीय पुरुष तर श्रमिकनगर येथे ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज तालुक्यात नव्याने ११रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जोर्वे येथे ६९ वर्षीय वयोवृद्ध व तळेगाव दिघे येथील ३५ वर्षीय महिला व ३४ वर्षीय पुरुष तर नान्नज येथील ६३ वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे २६ वर्षीय महिला व ४७ वर्षीय पुरुष तर कासारा दुमाला येथे दिड वर्षीय चिमुकल्यास कोरोनाची बाधा झाली आहे. तर धांदरफळ खुर्द येथे १९ वर्षीय युवतीला कोरोनाची बाधा झाली आहे. चिखली येथील २३ व ५४ वर्षीय दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर करे येथील ५५ वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील एकूण कोरोना बधितांचा आकडा ९२६ वर जाऊन पोहचला आहे.
दरम्यान, शहरातील गल्ली बोळासह तालुक्यातील ७६ गावांनी कोरोनाचा शिरकाव केला आहे. आजपर्यंत शहरात ४०९ तर तालुक्यात ५१७ रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील घुलेवाडी गाव आज पुन्हा कोरोनाच्या रडारवर आहे. येथे कोरोनाचा आलेख वाढता आहे. येथे पाहिले ६४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. आज त्यामध्ये पुन्हा नव्याने दोघांची भर पडली आहे. त्यामुळे येथे ६६ कोरोनाबाधीत तर एकाचा मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान, कडक लॉकडाऊनच्या काळात जेवढे कोरोनाबधीत रुग्ण आढळून आले नाही. तेवढे जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यात आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या देखील चिंतेत दिवसंदिवस भर पडत आहे.
तर अकोले तालुक्यातील खानापुर येथील कोविड सेंटर येथे आज ६४ व्यक्तीच्या रॅपिड अँन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात तालुक्यातील १९ रुग्ण पॅाझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये लिंगदेव येथील ६५ व ६० वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला तर १२ वर्षाची बालिका. तसेच इंदोरी फाट्याजवळील ७०, ४७ व २६ वर्षीय पुरुष व २२ व २० वर्षीय महिला यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच निब्रळ येथे ५७ व ३५ वर्षीय महिला १७ वर्षीय तरुणी तर धामणगाव आवारी येथील ६५ वर्षीय पुरुष हे बाधित मिळून आले आहेत. या व्यतिरिक्त म्हाळादेवी येथे ६० वर्षीय पुरुष २० व १७ वर्षीय महिला व परखतपूर येथे ३२ वर्षीय पुरुष ५५ व ४३ वर्षीय महीला असे एकुण १९ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहेत. तर मोग्रस येथील ४५ वर्षीय पुरुषाचा नाशिक येथे मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाली आहे. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार १६५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५ हजार ३३३ इतकी झाली आहे. तर रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव ०१, मनपा ०५, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०६, शेवगाव ०१, राहुरी ०१ , कर्जत ०१, नेवासा ०१, पारनेर ०२, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत आज ३२१ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये, मनपा ५०, संगमनेर ३४, राहाता १०, पाथर्डी ३१, नगर ग्रामीण ११, श्रीरामपुर १०, कॅन्टोन्मेंट १८, नेवासा १९, श्रीगोंदा २३, पारनेर १२, अकोले ०५, राहुरी ०४, शेवगाव २४, कोपरगाव ३२, जामखेड ०९ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. त्यामध्ये, मनपा १६५, संगमनेर ११, राहाता ०२, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट ०१, नेवासा ०५, श्रीगोंदा ०३, पारनेर ०२, अकोले ०६, राहुरी ०१, कोपरगांव ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ०७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी ०१, शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १५ अशा तालुकानिहाय रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता बरे झालेले एकूण रुग्ण संख्या ५ हजार ३३३ इतकी तर उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ३ हजार १६५ आणि मृत्यू संख्या ९६ जणांचा झाला आहे. तसेच एकूण रूग्ण संख्या ८ हजार ५९४ इतकी झाली आहे.
- आकाश देशमुख