पतसंस्थेकडून फसवणूक : आजी-माजी नगरसेवक, चेअरमन, संचालक, अधिकारी प्रशासकी अधिकार्‍यांसह 30 जणांवर गुन्हे दाखल!

सार्वभौम (अ. नगर) :

                  नगर शहरातील एका पतसंस्थेत ग्राहकास दामदुप्पट रक्कम करुन देतो असे आश्वासन देऊन विश्वासघात केला. तर त्यांचे 54 हजार 657 रुपये देण्यास टाळाटाळ करण्यात आली. हा प्रकार 10 आक्टोबर 2014 ते 7 ऑगस्ट 2020 या काळात घडला. याप्रकरणी आजी माजी नगरसेवक, शाखाअधिकारी, संचालक, चेअरमन, अधिकारी, पदाधिकारी अशा 30 जणांच्या विरोधात  इस्माईल गुलाब शेख (रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार काल शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात 30 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गुंतागुंतीचे असून त्यात भल्याभल्यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

           

इस्माईल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगर शहरातील रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अ.नगर यांनी फिर्यादी शेख विविध लघु मध्यम व दीर्घ मुदतीत पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवणुक केल्यास व्याजासह मुदत संपल्यानंतर रकमा परत करण्याची खात्री व भरवसा दिला होता. तसेच इतर पतसंस्थेच्या तुलनेत मुदत ठेवीवर ज्यादा व्याजदर देण्याचे व मुदत ठेव रकमेस विमा संरक्षण देण्याचे व केवायसी नंबर व सुविधा देण्याचे व मुदत ठेव रकमेसह व्याज देण्यात येईल असे खोटे आश्वासन व प्रलोभन दिले होते. यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन शेख यांना लगेच भुरळ पडली व त्यांनी त्यावर विसंबून ईस्माईल गुलाब शेख यांनी संबंधित पतसंस्थेमध्ये मुदत ठेव रक्कम गुंतवलेली 54 हजार 657 रुपये मुदत संपलेली असताना परत केली नाही. त्याचप्रमाणे पतसंस्थेचे व ठेवीदार यांची मुदत ठेव रक्कम गुंतवलेली व ठेवलेली रक्कम मुदत संपलेली असताना सुध्दा परत केली नाही. तसेच यातील 28 ते 30 हे सहकारी पतसंस्थेचे अधिकारी असून त्यांनी सदर पतसंस्थेबाबत फसवणुकीची तक्रार देऊन सुध्दा त्यांनी आरोपी सोबत आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांनी सदर आरोपींना वाचविण्यासाठी त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई न करता चुकीची कागदपत्रे तयार करून फिर्यादीस दिले. त्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. असे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेल्या फिर्यादीत शेख यांनी म्हटले आहे. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

           तर यात रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था शाखा, रत्नाकर पंढरीनाथ बडाख, लतीका नंदकुमार पवार, सुभाष विदयाधर रेखी, शेख नशीर अब्दुल्ला, संतोषकुमार कदम, लक्ष्मण सखाराम जाधव, भास्कर सिताराम पवार, शरद शंकरराव धोंडे, शकुंतला भाऊसाहेब चौधरी, आशाताई हरिश भिंगारदिवे, प्रकाश नथ्थु सोनवणे, संजय गंगाधर मंचरे, संजिवनी संभाजीराव पानसंबळ, कुकंलोळ राजेंद्र झुंबरलाल, राजेश शिवलाल भनसाठी, दिपक शिवराम पटारे, रामसुख दामोदर मंत्री, प्रकाश शिवमुर्ती हापसे, संदिप अच्च्युतराव चव्हाण, आप्पासाहेब दशरथ सालपुरे, उषा दिगंबर केदारी, शितल चेतन भुतडा, रूपाली निखील वारे, मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर, भाऊसाहेब नानाभाऊ सरोदे, रावसाहेब नागरी पतसंस्था शाखा प्रोपेसर चौक, जिल्हाउपनिबंधक क सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोड स्टेशन रोड अ. नगर, मा. प्राधिकृत अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्टेशन रोड अनगर, उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका मार्केट यार्ड, अ. नगर यांना आरोपी करण्यात आले आहे.