अकोल्यात कोरोनाचा पाचवा बळी.! आज पुन्हा 19 नवे रुग्ण! इंदोरी नवलेवाडी, लिंगदेव, धामणगाव आणि अकोले पुन्हा बाधित!

- आकाश देशमुख

सार्वभौम (अकोले) :-

                          अकोले तालुक्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन यांच्या मोग्रस गावात चक्क हा प्रकार घडला असून तशी नाशिकच्या रूग्णालयात त्याची नोंद झाली आहे. तर आज पुन्हा नव्याने रॉपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली असता त्यात 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोनाचे 197 रुग्ण झाले असून पाच जणांचा बळी गेला आहे. तर तालुक्यात रोज वाढणाारी संख्या ही एक चिंतेचे कारण ठरली आहे. काल देखील एका महिला नगरसेवकीच्या बाहिनीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर आज पुन्हा मोग्रास गावात 45 वर्षीय पुरुषाचा बळी गेला आहे.

                 याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी मोग्रस येथील एका पुरुषाला श्वास घेण्यासाठी काही त्रास होत होता. त्यानंतर त्यांना संगमनेर येथे हलविण्यात आले होते. तर या व्यक्तीचा मुलगा सिन्नर येथे असल्यामुळे त्यांनी संबंधित रुग्णाची फार काळजी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांनी रुग्णास नाशिक येथे हलविण्याचे ठरविले होते. ते नाशिकला दाखल झाले असता त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला आहेे. संबंधित रुग्णावर नाशिक येथे अंत्ययसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

         तर आज अकोल्यात काही संशयित व्यक्तींची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात तब्बल 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यात लिंगदेव येथे 4, इंदोरी येथे 5, निब्रळ येथील 3, धामनगाव आवारी येथे 1, तर म्हाळदेवी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नवलेवाडी येथे राहणारे 2 तसेच अकोले शहरात परखतपूर रोड येथे 3 अशा 19 जणांना आज कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून यात जिल्हा रुग्णालयातून काही अहवाल येणे बाकी आहे. तर काल पेठेतील जी व्यक्ती मयत झाली आहे. त्यांनी गणती संगमनेर येेथे करण्यात आली आहे. कारण, गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर संगमनेरात उपचार सुरू होतेे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

तर एकेकडे अकोल्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून दुसरीकडे हे रुग्ण बरे होण्याची संख्या देखील चांगली आहे. कारण, गेल्या काही दिवसांपुर्वी ज्या पोलीस कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्या सर्वांना खानापूर येथे कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. आज आवघ्या काही दिवसांच्या चिमुकल्यांनी कोरोनावर मात केली असून तो एक धर्यशिल लढा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. 

- शंकर संगारे